Lion video: अपनी गली मे कुत्ता बना शेर! गल्लीत आलेल्या सिंहाला कुत्र्याने ताणून काढलं बाहेर; पाहा व्हिडिओ..

0

Lion video: सोशल मीडियावर (social media) प्राण्यांसंदर्भातले नवनवीन व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. जंगलावर अतिक्रमण होत असल्याने जंगलातील अनेक प्राणी मानव वस्तीत आल्याचे देखील अलीकडच्या काळात वारंवार पाहायला मिळाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे प्राण्यासंदर्भातले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसंद देखील केले जातात. प्राण्याची लाईफस्टाईल जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. सहाजिकच त्यामुळे हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केले जातात.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ पाहून डोळ्यांना देखील विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “कुत्रा आणि सिंहाच्या लढाईत कुत्रा जिंकेल” असं जर कोणी सांगितलं, तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत चक्क कुत्र्यांनी सिंहाला आपल्या गल्लीतून ताणून लावलं आहे. असं म्हणतात, “अपनी गली मे कुत्ता भी शेर होता है” याच म्हणीचा प्रत्येक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आला आहे.

काय घडलं नक्की? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका गल्लीमध्ये सिंह फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा सिंह आपल्या भक्ष्याच्या शोधात असल्याचे देखील दिसत आहे. आपल्या मानव वस्तीत फिरत असणाऱ्या या सिंहाला पाहून काही कुत्र्यांचा संताप होता. कुत्रा हा प्रचंड इमानदार प्राणी आहे. आपल्या मालकांचे रक्षण करण्यासाठी तो समोर कितीही बलाढ्य प्राणी असला तरी, त्याच्याशी दोन हात करताना मागे पुढे पाहत नाही. या संदर्भातले अनेक व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील.

आपल्या वस्तीत सिंह आला आहे, हे पाहून कुत्र्यांनी या सिंहाचा न घाबरता मोठ्या हिंमतीने सामना केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, काही कुत्र्यांनी सिंहाचा पाठलाग करून थेट त्याला वस्ती बाहेर काढेल. जंगलाचा राजा म्हणून संबोधणारा सिंह यावेळी मात्र खाली मान घालून गपगुमान निघून गेला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ खाली कमेंट करताना अनेकांनी सिंहाची खिल्ली उडवली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ गुजरातच्या ”गीर सोमनाथ” या गावातला आहे. सिंह आपल्या पक्षाच्या शोधात मानव वस्तीत आला होता. हत्ती, वाघ, चित्ता यासारखे बलाढ्य प्राणी सिंह समोर दिसताच आपली वाट बदलतात. परंतु सिंहाच्या वाटेला जात नाहीत. समोर कितीही मोठा प्राणी असला तरी, पराभव सिंहाला कदापिही मान्य नसतो. मात्र या व्हिडिओत वस्तीतून चक्क कुत्र्यांनी सिंहाला बाहेर काढलं, हे व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी आणि सिंहासाठी देखील आश्चर्याचा धक्का बसणारे आहे.

हे देखील वाचा Income Tax Bharti 2023: पदवीधर आणि दहावी पास उमेदवारांसाठी आयकर विभागात मोठी भरती; लगेच असा करा अर्ज..

Viral video: तृतीयपंथी सांगून पैसे मागणाऱ्या तरुणाला बाजारातच केलं नग्न; व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ..

Marriage Tips: लग्नापूर्वी मुलीला हे पाच प्रश्न विचारल्याशिवाय चुकूनही करू नका लग्न; नाहीतर आयुष्यभर..

Couple Viral Video: तरुण-तरुणीने भररस्त्यातच सुरू केला कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..

Serial Kisser Gang Video: ..म्हणून एकटी महिला दिसली की जबरदस्तीने किस करून जायचा पळून; पाहा तो व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.