IND vs AUS: नाचता येईना अंगण वाकडे! संताप व्यक्त करत रोहित शर्माने या दोन खेळाडूंना पराभवासाठी धरले जबाबदार..

0

IND vs AUS: आगामी विश्वचषकाची तयारी म्हणून महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या या वनडे मालिकेत भारतीय संघाकडून सुमार कामगिरी राहिली. पहिला एकदिवसीय सामना जरी भारताने जिंकला असला तरी देखील गेल्या अनेक वर्षांपासून डावखुऱ्या जलदगती गोलंदाजासमोर भारतीय प्रमुख फलंदाजांची शरणागती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात देखील भारतीय फलंदाजी कोलमडली. फिरकीपटूंसाठी मदत असणाऱ्या या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजाला स्पिनरचा सामना करता आला नाही. भारताने 2019 नंतर पहिल्यांदाच मायदेशात मालिका गमावली. पराभवा नंतर रोहित शर्मा (rohit sharma) आपल्या खेळाडूवर संतापला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) घेतला. चांगल्या सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाने देखील ठराविक अंतराने आपले गडी गमावले. मात्र तरीदेखील ऑस्ट्रेलियाला 270 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यानंतर, दोन्हीं एकदिवसीय सामन्याचा हिरो मिचेल स्टार्कला (Michelle starc) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चेंडू स्विंग करण्यात यश मिळालं नाही. याचा फायदा भारतीय सलामीवीरांनी उठवत तुफानी फलंदाजी करत चांगली सुरुवात करून दिली.

चांगल्या सुरुवातीनंतर बेजबाबदार फटका मारत रोहित शर्मा (Rohit Sharma) तंबूत परतला. रोहित शर्मा नंतर ठराविक अंतराने भारतीय फलंदाज सेट होऊन बाद झाले. भारताकडून विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. मात्र विराट देखील चुकीचा फटका मारून बाद झाला. हार्दिक पांड्याने खेळपट्टीवर टिकण्याचा प्रयत्न केला, मात्र ऑस्ट्रेलियाच्या एडम झॅम्पाने (Adam Zampa) त्याचा अडसर दूर केला. ऑस्ट्रेलियाच्या दोन्हीं स्पिनरने आपल्या 20 षटकात केवळ 86 धावा देत भारताचे तब्बल 6 खेळाडू तंबूत पाठवले. आणि ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकून दिली.

पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, आम्ही खराब फलंदाजी केली. या धावांचा सहज पाठलाग करता येऊ शकला असता. दुसऱ्या डावामध्ये खेळपट्टी पहिल्या डावाच्या तुलनेत गोलंदाजासाठी निश्चित अनुकूल होती. मात्र आम्ही ज्या पद्धतीने बाद होत गेलो, हे निराशाजनक आहे. आमचं शॉर्ट सिलेक्शन यापेक्षा चांगले राहिलं असतं, तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. आम्ही खराब फलंदाजी केली हे नाकारता येणार नाही.

दोन खेळाडूंमुळे आमचा पराभव झाला हे नाकारता येणार नाही. असंही रोहीत शर्मा म्हणाला. ऑस्ट्रेलियाच्या स्पिनरने आमच्या फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवलं. मला वाटतं, आमच्या पराभवासाठी एडम झॅम्पा आणि एश्नटन एगर हे जबाबदार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या स्पिनरने उत्तम गोलंदाजी केल्याने आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. असे रोहित शर्मा म्हणाला. रोहित शर्माच्या विधानामुळे सोशल मीडियावर रोहितला क्रिकेट चाहत्यांकडून ट्रॉल करण्यात आले.

पराभवानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी रोहित शर्माला आपल्या निशाण्यावर घेतले. चाहते म्हणाले, संपूर्ण सिरीज भारत भारतीय संघ खराब खेळला. हे मान्य करायला हवं. हीच मालिका सुरू राहिली, तर भारत विश्वचषक जिंकेल असं वाटत नाही. जोपर्यंत आपल्या चुका मान्य करत नाही, तोपर्यंत त्याच्यात इन्क्रिमेंट कशी होणार, असा सवाल देखील अनेक चाहत्यांनी उपस्थित केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दोन्हीं स्पिनरमुळे आमचा पराभव झाला. असं म्हणणं म्हणजे, नाचता येईना आणि अंगण वाकडा असा प्रकार आहे.

हे देखील वाचा IND vs AUS: या तीन कारणांमुळे आजही भारताचा दारून पराभव होण्याची शक्यता..

Viral video: तृतीयपंथी सांगून पैसे मागणाऱ्या तरुणाला बाजारातच केलं नग्न; व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ..

Marriage Tips: लग्नापूर्वी मुलीला हे पाच प्रश्न विचारल्याशिवाय चुकूनही करू नका लग्न; नाहीतर आयुष्यभर..

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट; जाणून घ्या त्वरित..

Couple Viral Video: तरुण-तरुणीने भररस्त्यातच सुरू केला कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..

Central Bank of India Recruitment 2023: सेंट्रल बँकेत पाच हजार पदांची मेगा भरती; या उमेदवारांना करता येणार अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.