Dark circles under eyes: हे चार घरगुती उपाय करून चुटकीसरशी घालवा डोळ्याखाली असणारी काळी वर्तुळे..
Dark circles under eyes: सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीने माणसाला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कामाच्या बापामुळे अनेकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवल्याचे पाहायला मिळतं. खासकरून लॅपटॉप कॅम्पुटर, मोबाईल या साधनाचा वापर करणाऱ्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अलीकडे मोबाईलच्या जगात डोळ्यांची निगा राखणे खूप आव्हानात्मक काम झाले आहे. १० ते १२ तास स्क्रीनमोर बसून राहिल्याने डोळ्यांचे अनेक आजार वाढले आहेत. त्यातच डोळ्यांखालील काळी वर्तुळे हे अगदी सामान्य झाले आहे. जर तुम्हाला देखील हे समस्या असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही डोळ्याभोवती असणारे काळे वर्तुळे क्षणात घालू शकता जाणून घेऊया सविस्तर.
डार्क सर्कल म्हणजे कोणता आजार नव्हे, ते कोणत्याही ट्रिटमेंटविणा आपण घालवू शकतो. मात्र त्यासाठी देखील लागणारा वेळ आपण देऊ शकत नाही. जर तुम्हाला डोळ्याभोवती काळी वर्तुळे असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून कायमस्वरूपी समस्या पासून मुक्ती मिळू शकतात. घरगुती काही उपाय करून तुम्ही अवघ्या ५ मिनिटात डोळ्यांखालची काळी वर्तुळे घालवू शकता.
टोमॅटो आणि लिंबामध्ये अँटीऑक्सीडन्टचे
प्रमाण अधिक असते. एक चमचा टोमॅटोचा रस, एक चमचा लिंबाचा रस हे मिश्रण एकत्र केल्यानंतर डोळ्यांभोवती लावा. लावल्यानंतर 10 मिनिटांपर्यंत हे तसचं कायम ठेवा. आणि त्यानंतर धुवून घ्या. हा उपाय दिवसातून दोन वेळा केल्यानंतर, डार्क सर्कल हळूहळू कमी होऊ लागतात. आठवड्यातून दोन-तीन वेळा हा प्रयोग तुम्ही एक ते दीड महिना नियमितपणे केल्यानंतर, तुमच्या डोळ्याखाली असणारी काळी वर्तुळे नाहीसे होतील.
बटाटा: डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी बटाटा रामबाण उपाय आहे. कच्च्या बटाट्याच्या रसात कापसाचा छोटा तुकडा भिजवून डोळ्याभोवती ठेवा. काळी वर्तुळे असलेल्या संपूर्ण भागावर हा कापूस ठेवा. एका आठवड्याच्या आत तुम्हाला परिणाम दिसायला सुरुवात होईल. हा प्रयोग तुम्हाला आठवड्यातून तीन-चार वेळा एक महिना करायचा आहे त्यानंतर काळसरपणा नाहीसा झाल्याचे दिसून येईल.
बदामाचे तेल: बदामात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन-ई असल्याने बदामाचे तेल त्वचा कोमल बनविण्यास मदत करते. रात्री थोडेसे बदाम तेल डोळ्यांच्या आसपास लावून हलक्या हाताने मसाज करा. सकाळी उठून डोळे थंड पाण्याने धुवून घ्या. एका आठवड्यात याचा परिणाम दिसायला सुरुवात होईल. हा प्रयोग देखील तुम्हाला आठवड्यातून चार वेळा करायचा आहे. एक महिना नियमित हा प्रयोग केला तर तुमच्या डोळ्याच्या भोवती असणारे काळे डाग नाहीसे होतील.
हे देखील वाचा Benefits of morning sex: सकाळी सेक्स करण्याचे हे फायदे जाणून बसेल धक्का; महिलांसाठी प्रचंड फायदेशीर..
Business Idea: कमी भांडवलात महिन्याला लाखों रुपये नफा मिळवून देतील हे चार व्यवसाय..
Relationship Tips: गोष्टी माहीत असायलाच हव्यात; अन्यथा नातं कधीच फार काळ टिकणार नाही..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम