IPPB Recruitment 2023: इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये मोठी भरती; या उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी..

0

IPPB Recruitment 2023: लाखो तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. त्यांच्यासाठी ही बातमी फार महत्वाची आहे. सध्या अनेक ठिकाणच्या भरती सुरू आहेत. त्यातच बॅंकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. नुकत्याच इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. बॅंकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असणार्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने उपलब्ध करून दिलेल्या या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन बॅंकेत नोकरी करण्याचे स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता.

विविध पदांसाठी जाहिरात बॅंकेने नुकतीच प्रदर्शित केली होती. आता IPPB च्या अधिकृत साईटवर फॉर्म देखील उपलब्ध झाले आहेत. एकूण ४१ पदासाठी ही भरती होणार आहे. यासंदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार, खालील पदे भरण्यात येणार आहेत. ज्युनियर असोसिएट या पदासाठी 15 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सोबतच असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 15 जागा भरण्यात येणार आहेत. व्यवस्थापक या पदासाठी 09 तर वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील नमुद पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे. तसेच शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर careers@ippbonline.in या साईटवर पाठवायचा आहे. उमेदवारांनी अर्ज नीट भरणे आवश्यक आहे. अर्जात कोणत्याही त्रूटी आढळल्यास तो अर्ज बाद केल्या जाईल. याची उमेदवारांनी दखल घ्यावी.

अशी होईल निवड

इंडिया पोस्ट बँकेत उमेदवारांची मुलाखतीच्या आणि गटचर्चा त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेच्या आधारे निवड केली जाणार आहे. सर्वाधिकार बँकेला असणार आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील क्रोम वर जाऊन https://www.ippbonline.com/web/ippb/current-openings असं सर्च करायचं आहे. त्यानंतर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवर तुम्ही सविस्तर चर्चा भरून दिलेल्या मेलवर पाठवायचा आहे.

हे देखील वाचा IDBI Bank Recruitment 2023: IDBI बॅंकेत या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी; जाणून घ्या डिटेल्स..

Sara Tendulkar: शुभमन गिल नाही, हा आहे सारा तेंडुलकरचा बॉयफ्रेंड; नाव जाणून व्हाल चकित..

Physical Relationship Tips: या वयात महिलांची सेक्स करण्याची इच्छा असते सर्वाधिक; जाणून बसेल धक्का..

Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..

Relationship tips: पुरुषांमध्ये या प्रकारची देहबोली असेल, तर स्त्रिया होतात आकर्षित..

Benefits of morning sex: सकाळी सेक्स करण्याचे हे फायदे जाणून बसेल धक्का; महिलांसाठी प्रचंड फायदेशीर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.