pregnancy tips: गर्भधारणेसाठी महिलांचे योग्य वय त्वरित जाणून घ्या, अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम..
pregnancy tips: महिलांनी (women) आता सर्वच क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. फक्त चूल आणि मुल या संकल्पनेत न राहता महिला स्वतःच्या पायावर उभा राहू लागल्या आहेत. अनेक क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत देखील आहेत. साहजिकच यामुळे तिच्या जबाबदाऱ्या देखील वाढल्या आहेत. आर्थिक स्थैर्य प्रथम आणि त्यानंतर मातृत्व असा क्रम महिला लावताना पाहायला मिळतात. मात्र कुठेतरी आर्थिक स्थैर्याची जोपासना करताना आरोग्याकडे दुर्लक्ष देखील झाल्याचे दिसून येते. वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीराचीही झीज होत असते. इतकेच नाही, तर वाढत्या वयाबरोबर महिलांची प्रजनन क्षमताही कमी होत जाते. त्यामुळे त्यांना गर्भधारणेच्या समस्या उद्भवतात. साहजिकच यामुळे मूल जन्माला घालण्याचे महिलांचे योग्य वय काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.
याबद्दल तज्ञांचे मत काय आहे
तज्ञ म्हणतात, 20 वर्षाच्या उत्तरार्धात आणि 30 वर्षाच्या सुरुवातीस गर्भधारणा करणे चांगले आहे. योग्य वयात आई होण्याचे फायदे आई आणि बाळ दोघांनाही मिळतात. एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे, पहिले मूल जन्माला घालण्याचे योग्य वय २५ ते ३५ या दरम्यान आहे. आई होण्यासाठी वया व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी आवश्यक असतात, जसे की मुलासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार असणे, कारण हा काळ प्रत्येक स्त्रीसाठी वेगळा असतो.
प्रजनन क्षमतेवर वयाचा प्रभाव
संपूर्ण जीवनात महिलांच्या शरीरात सुमारे 20 लाख अंडी तयार होतात. मात्र वय वाढल्यानंतर अंड्यांची संख्या कमी होत जाते. वयाच्या 37 व्या वर्षी फक्त पंचवीस हजार अंडी शिल्लक राहतात. तर वयाच्या 51 व्या वर्षी 1,000 अंडी उरतात. या अंड्यांचा दर्जाही कालांतराने कमी होत जातो. साहजिकच याचे परिणाम मुल जन्माला घालण्याचा प्रक्रियेवर होतो. आणि म्हणून महिलांना मुल जन्माला घालण्याचे उत्तम वय हे 35 वर्षा पर्यंत मानले जाते.
प्रजनन क्षमता कमी करणारे घटक
एंडोमेट्रिओसिस आणि ट्यूबल रोग यामुळे प्रजनन क्षमतेवर देखील नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वाढत्या वयानुसार त्यांचा धोकाही वाढतो. या घटकांमुळे वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत प्रजनन शक्ती कमी होऊ लागते. 30 ते 37 वयोगटातील प्रजनन क्षमता अधिक वेगाने कमी होते. धूम्रपान, रेडिएशन आणि केमोथेरपी यासारखे कर्करोग उपचार आणि पेल्विक इन्फेक्शन सारखे घटक देखील तुमच्या गर्भवती होण्याच्या शक्यतांवर परिणाम करू शकतात.
काही स्त्रिया आई होण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तयार असतात. परंतु आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या नाही. अशा परिस्थितीत त्यांना आई होण्यासाठी वाट पाहावी लागते. तथापि या परिस्थितीत महिलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, एका वयानंतर गर्भवती होण्याची शक्यता खूप कमी होईल. वयाच्या ५१ व्या वर्षानंतर शरीरातील हार्मोन्समध्ये घट होते, त्यामुळे या वयाच्या आधी गर्भधारणा करावी. वयाच्या 51 व्या वर्षापर्यंत महिला मूल जन्माला घालू शकतात मात्र महिलांचे आणि बाळाचे आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर मूल जन्माला घालायचं हे 25 ते 35 या दरम्यान असल्याचं साशोधनातून समोर आले आहे.
हे देखील वाचा Samsung galaxy S22: सॅमसंगची विशेष ऑफर, २७ हजारात खरेदी करा ८६ हजाराचा हा स्मार्टफोन..
Chanakya Niti: लग्नापूर्वी या तीन गोष्टी जाणून घ्या अन्यथा उध्वस्त होईल आयुष्य..
Prithvi Shaw: पृथ्वी शॉवर जीवघेणा हल्ला, दांडक्याने दोन गटात मारामारी, गाडीचाही चुरा, पाहा व्हिडिओ..
Health Tips: जाणून घ्या एक महिना साखर खाल्लीच नाही तर शरीरावर काय परिणाम होतील..
Beer Benefits: बिअर पिण्याचे शरीरावर होणारे परिणाम जाणून जाल चक्रावून..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम