Beer Benefits: बिअर पिण्याचे शरीरावर होणारे परिणाम जाणून जाल चक्रावून..

0

Beer Benefits: बिअर (beer) हे अनेकांचे आवडते पेय आहे. खासकरून तरुणाई मोठ्या प्रमाणत बिअर पिताना पाहायला मिळते. कोणतेही अल्कोहोलयुक्त पेय हे आरोग्यासाठी घातकच असतं. मात्र बिअर हे एक असं पेय आहे, ज्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र बिअर पिण्याचे काही आश्चर्यकारक फायदेही आहेत. आपल्या रोजच्या आहारात बिअरचा योग्य प्रमाणात समावेश केला तर त्याचा आरोग्याला फायदा होतो. बिअर पिण्याचे फायदे उत्कृष्ट आहेत. द्राक्षे आणि बार्लीपासून तयार करण्यात येत असलेल्या बिअरचे अनेक फायदे आहेत. मात्र बिअर किती प्रमाणात घ्यावी, याकाही काही मर्यादा आहेत. शारीरीक आणि मानसिक ऊर्जेचा स्त्रोत समजली जाणारी बिअर आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्या शरीरावर नेमके काय परिणाम होतात? जाऊन घेऊया सविस्तर. दारू सोबत शेंगदाणे खाण्याचे काही फायदे आहेत, पण दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन ..

बिअर पिण्याचे फायदे 

रक्तातील साखरेची पातळी सुधारू शकते: मधुमेह असलेल्या लोकांसाठी बिअर मोठे वरदान ठरू शकते. मधुमेह असणाऱ्या लोकांना कमी प्रमाणात बिअरचे सेवन केल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण राहण्यास मदत होते. मधुमेह होण्याचा धोका कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. अभ्यासानुसार, दिवसातून एक ते दोन अल्कोहोलयुक्त पेये मधुमेह होण्याचा धोका ५०% कमी करू शकतात. साखर असणाऱ्या लोकांनी नेहमी बिअरमध्ये साखरेचे प्रमाण कमी असेल, याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

हृदयाचा धोका

कोणत्याही प्रकारचे अल्कोहोलयुक्त पेय जेव्हा ते कमी प्रमाणात सेवन केले जाते, तेव्हा हृदयविकाराचा धोका कमी होतो. अशी माहिती बिअरच्या सापेक्ष फायद्यांचे मूल्यमापन करणार्‍या अभ्यासात आढळून आले आहे. मध्यम प्रमाणात बिअर पिल्याने स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराचे आजार हण्याची शक्यता कमी असते.

ब जीवनसत्त्वे समृद्ध

बीअरमध्ये फोलिक अॅसिडसह बी जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी हे घटक खूप उपयुक्त आहे. अनफिल्टर्ड बिअर किंवा कमी फिल्टर केलेली बिअर खूप पौष्टिक असते. बिअरमध्ये विरघळणारे जंतू असतात, जे आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उत्तम मानले जातात. जे चरबी कमी करण्याचे काम देखील करतात. मानसिक आरोग्य: बिअरचे सेवन केल्याने मेंदूतील डोपामाइनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती आणि आराम मिळतो. काही अभ्यासकांनी असा दावा केला आहे, बिअर पार्किन्सन आणि अल्झायमरसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांपासून मेंदूचे संरक्षण करते.

खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त

घुलनशील फायबरचे सेवन केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. निरोगी रक्त-शर्करा आणि रक्त-कोलेस्ट्रॉलची पातळी देखील वाढते. हा विरघळणारा फायबर एलडीएल किंवा खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो. दृष्टीसाठी उपयुक्त: दृष्टी तीक्ष्ण करण्यासाठी देखील बिअरचे फायदे आहेत. वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठाच्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे, दिवसातून एक बिअर प्यायल्याने मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होतो. बिअरमध्ये माइटोकॉन्ड्रियल एन्झाईम्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. जे डोळ्यांना नुकसान होण्यापासून वाचवू शकतात.

हाडे/ किडनी स्टोन 

बिअरचा आपल्या हाडांनाही फायदा होतो. बीअरचे मध्यम प्रमाणात सेवन केल्यास पुरुष आणि रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांची हाडे दुखण्याची समस्या कमी होऊ शकते. अभ्यासानुसार, जे पुरुष आणि महिला मध्यम प्रमाणात बिअर पितात, त्यांना किडनी स्टोन होण्याचा धोका 41 टक्क्यांनी कमी होता. फिकट गुलाबी एल्स सारख्या भरपूर हॉप्स असलेल्या बिअरमध्ये किडनीच्या आरोग्याला चालना देणारे फायटोकेमिकल्स असतात.

बिअर पिण्याचे तोटे

दररोज बिअर पिल्याने माणसाला त्याचे व्यसन लागू शकते. आणि कोणतेही व्यसन माणसाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे बिअरचे अतिसेवन देखील आपल्याला लवकर मृत्युच्या दारात घेऊन जाऊ शकते. जास्त बिअर प्यायल्याने आपले यकृत खराब होण्याची शक्यता असते. अति बिअर किंवा कोणतेही अल्कोहोल अति जास्त प्रमाणात घेतल्यास आपल्याला तोंडाचा घशाचा कर्कगोर होण्याची शक्यता असते. बिअरच्या एका कॅनमध्ये 153 कॅलरीज असतात, त्यामुळे इतक्या प्रमाणात आपण रोज कॅलरिज घेतल्यास आपले वजन देखील वाढते.

हे देखील वाचाRelationship Tips: फॅमिली प्लॅनिंग करताना या गोष्टीची घ्या काळजी अन्यथा क्षणात व्हाल उध्वस्त..

Relationship Advice: बायको रागावली? झटक्यात राग दूर करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स..

IND vs AUS: अखेर दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलचा पत्ता होणार कट..

Chetan Sharma: विराट कोहली खोटारडा, हे खेळाडू घेतात तसले इंजेक्शन; चेतन शर्माच्या विधानाने BCCI मध्ये भूकंप, पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.