mahendra singh dhoni: म्हणून धोनी अचानक पोहचला ड्रेसिंग रूममध्ये; काय झाली चर्चा, पाहा व्हिडिओ..
mahendra singh dhoni: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 3 t20 सामन्याच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. (IND vs NZ T20 series) पहिला टी-ट्वेंटी सामना आज रांचीमध्ये (Ranchi) खेळण्यात येणार आहे. तत्पूर्वी काल भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) अचानक ड्रेसिंग रूममध्ये (dressing room) खेळाडूंची भेट घेण्यासाठी पोहचला. रांचीमध्ये काल टीम इंडिया (Team India) दाखल झाल्यानंतर अचानक महेंद्रसिंग धोनी ड्रेसिंग रूममध्ये (Mahendra Singh Dhoni dressing room) पोहचल्याने अनेक खेळाडूंसह चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.
आपला अनुभव आणि क्रिकेटचे धडे घेण्यासाठी अनेक नवीन खेळाडू महेंद्रसिंग धोनीला भेटण्याचा प्रयत्न करत असतात. यशस्वी कर्णधाराबरोबरच तो एक उत्कृष्ट टीममेंट म्हणून देखील समोर आला आहे. भारताच्या प्रत्येक खेळाडूंच्या मनावर राज्य करण्यात एम एस धोनी यशस्वी झाला. सोशल मीडिया आणि लाईन लाईट पासून कायम दूर राहणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने आज देखील खूप साध्या पद्धतीने ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केल्याने सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
हातामध्ये नारळ घेऊन महेंद्रसिंग धोनी बीसीसीआयचा (BCCI) लोगो असणारा निळ्या रंगाचा टी-शर्ट घालून ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करतात सर्व खेळाडू धोनी भोवती जमा झाल्याचे पाहायला मिळाले. अचानक धोनीचा ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश झाल्यामुळे अनेक खेळाडूंना धोनीशी काय बोलावं हे देखील कळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक नवीन खेळाडू धोनीकडे एकटक पाहत असल्याचे देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
महेंद्रसिंग धोनीने ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केल्यानंतर खेळाडूंशी बातचीत करत असल्याचा एक व्हिडिओ BCCI ने आपल्या ट्विटर अकाउंट वरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करतात अनेक खेळाडू धोनी भोवती जमा झाले. हार्दिक पांड्या (hardik Pandya) महेंद्रसिंग धोनीशी मनमोकळ्या गप्पा मारताना पाहायला मिळत असून, शुभमन गिल (Shubman Gill) इशान किशन (Ishan Kishan) एकटक धोनीच्या चेहऱ्याकडे पाहत असल्याचं दिसत आहे.
धोनी होणार टी ट्वेंटी आणि एकदिवसीय टीमचा कोच
महेंद्रसिंग धोनीचा ड्रेसिंग रूम मधला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, आता आगामी टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय संघाचा कोच महेंद्रसिंग धोनी होणार असल्याचा चर्चांना देखील उधाण आले आहे. टी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये झालेल्या पराभवानंतर वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार आणि कोच निवडीवर बीसीसीआय विचार करत असल्याचं समोर आलं. त्यामध्ये वीरेंद्र सेहवाग महेंद्रसिंग धोनी या दोन नावाविषयी देखील कोच संदर्भात चर्चा झाली असल्याचं वृत्त इनसाईट स्पोर्टने दिले.
Look who came visiting at training today in Ranchi – the great @msdhoni! 😊#TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/antqqYisOh
— BCCI (@BCCI) January 26, 2023
म्हणून पोहचला ड्रेसिंग रूममध्ये
महेंद्रसिंग धोनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. धोनी अचानक हार्दिक पांड्याच्या t20 संघाला भेटण्यासाठी का गेला? असा प्रश्न अनेकांना पडला. यासंदर्भातली अपडेट आता समोर आली असून, नवीन खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्यासाठी महेंद्रसिंग धोनी स्वतःहून ड्रेसिंग रूममध्ये आला असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय संघाच्या कोचसाठी महेंद्रसिंग धोनीचं नाव सातत्याने पुढे येत आहे. त्यातच अचानक महेंद्रसिंग धोनीने ड्रेसिंग रूमला दिलेल्या भेटीमुळे या चर्चा आणखीन जोर धरू लागल्या आहेत.
हे देखील वाचा Bank of Maharashtra Bharti 2023: या उमेदवारांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये विविध पदांची मेगा भरती..
Pathaan: तो सीन सुरू होताच चाहते स्क्रीन समोर बेभान होऊन नाचू लागले; पाहा व्हिडिओ..
Hair fall tips: म्हणून गळतात पुरुषाचे केस; त्वरित थांबवा या चुका तरच टक्कल पडण्यापासून वाचाल..
INDvsNZ T20 series: टी-ट्वेण्टी संघात निवड करूनही पृथ्वी शॉला BCCI चा दणका..
msrtc recruitment 2023: 8वी 10वी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम