Health Tips: घशात खवखव करत असेल तर हे उपाय; झटक्यात मोकळा होईल घसा..
Health Tips: सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे आजारी पडण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढलं आहे. सततच्या बदलणार्या या वातावरणामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. वातावरणात थोडाही बदल झाला की, लगेच आपल्याला सर्दी-खोकल्यासारखे आजार होतात. यातूनच मग घशात खवखव करण्यासारखी समस्या उद्भवते. बर्याचदा दोन-चार दिवसांनंतर आपोआप सर्दी-खोकला किंवा घसा बरा झाल्याचे आपल्याला जाणवते. मात्र बर्याचवेळा घसा खवखव करण्याची समस्या दिर्घकाळापर्यंत आपली पाठ सोडत नाही.
घसा खवखव करण्याच्या समस्येने आपले रोजचे जिवन प्रभावित होते. यातून आणखी काही वेगळ्या स्वरुपाचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे घसा खवखव करणे हे जरी सामान्य लक्षण वाटत असले, तरी त्यावर वेळीच उपाय करणे फायदेशीर ठरते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे एकदम ऊत्तमच, मात्र त्याबरोबरच काही घरघुती उपयांचा वापर करुन सुद्धा तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. अशाच काही घरगुती रामबाण उपयांबाबतची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
चहाच्या मदतीने तुम्ही घशाच्या खवखवीच्या समस्येपासून सुटू शकता. आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र हे खरं आहे. परंतू रोज आपण जो चहा घेतो तो चहा घेतल्यास तुम्हाला थोडाही फरक जाणवणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या चहामध्ये काही घटक मिसळावे लागतील. चहा करतांना त्यामध्ये आले, दालचिनी, पुदिना आणि कॅमोमाईल घालून चहा करावा लागेल. हे घटक चहामध्ये मिसळून चहा घेतल्यास तुमचा घसा मोकळा झाल्यासारखा तुम्हाला वाटेल. त्यामुळे तुम्हाला आराम वाटू लागेल.
घशाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी जेष्ठमध सुद्धा उपयुक्त आहे. जेष्ठमधाचा एक छोटासा तुकडा आपल्या दातांमध्ये ठेवायचा, त्यातून निघणारा रस प्यायचा. जेष्ठमधाच्या काडीतून निघणार्या रसामुळे घशाला आराम वाटू लागतो. लसणामुळे सुद्धा घशातील खवखव कमी होते. कच्च्या लसुणाच्या पाकळ्या खाल्ल्यास घसा मोकळा वाटू लागते. कारण लसणामुळे घशाची खवखव होण्यास कारणीभूत ठरणार्या जिवजंतूंचा नाश होतो. त्यामुळे घशाची खवखव कमी करण्यासाठी लसण सुद्धा कारगर आहे.
घशातील खवखव जर जास्त प्रमाणात असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे हा सुद्धा त्यावरील प्रभावी उपाय आहे. एक ग्लास गरम पाणी करुन त्यात चमचाभर मीठ मिसळायचे. मीठ आणि पाणी चांगले ढवळून घेत त्याच्या गुळण्या करायच्या. किमान चार ते पाच वेळा गुळण्या केल्यानंतर तुम्हाला आराम जाणवू लागेल. असे सलग दोन ते तीन दिवस केल्यास तुमची घशाची खवखव बंद झालेली असेल.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषत: ही समस्या जास्त जाणवते. थंडीचे दिवस असल्याने काही थंड पेय पिण्यात आले किंवा काही थंड पदार्थ खाण्यात आले तर लगेच तुमचा घसा बसतो. तसेच पाण्यात बदल झाला तरी ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात ऍपल सायडर व्हिनेगरचा आहारात समावेश करावा. यामुळे हिवाळ्यात तुमचा घसा खवखव करण्याच्या समस्येपासून वाचू होऊ शकतो.
तसेच हळदीने सुद्धा घसा खवखव करणे थांबू शकते. एक ग्लास गरम पाणी करुन त्यात चमचाभर हळद घाला आणि त्या पाण्याने गुळणे करा तसेच गरम पाण्यासोबत चिमुटभर हळद खाल्ल्यास सुद्धा घशाला आराम मिळू शकतो. अशाप्रकारे हे काही घरगुती उपाय वापरुन सुद्धा तुम्ही घसा खवखव करण्याच्या समस्येपासून स्वत:ची सुटका करु शकता.
हे देखील वाचा Health tips: उकडलेले हरभरे खाण्याचे फायदे जाणून व्हाल चकित; जाणून घ्या हरभरे खाण्याचे शरीरावर होणारे परिणाम..
Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम