PM Kisan Yojana: म्हणून PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या होतेय कमी; आत्ताच जाणून घ्या, अन्यथा मिळणार नाही १३ वा हप्ता..

0

PM Kisan Yojana: आज सुद्धा आपल्या देशाच्या ग्रामीण भागातील ७० टक्के जनतेचा उदरनिर्वाह शेतीवर होतो. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत सुद्धा शेती महत्वाची भूमिका बजावते. ही गोष्ट लक्षात घेऊन भारतातील शेतकरी अधिक समृद्ध व्हावा, शेतकर्‍यांच्या समस्या कमी व्हाव्यात, याकरिता सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा अनेक योजना राबवत असल्याचं पाहायला मिळते. परंतू पाहिजे त्या प्रमाणात या योजनांना यश येत नाही. पी एम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी देखील आता काही अटी आणि शर्ती घालण्यात येत आहेत. जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी PM किसान योजना लॉन्च करण्यात आली. या योजने अंतर्गत शेतकर्‍यांना वर्षभरात ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकर्‍यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार १३ व्या हप्त्यापासून अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना वंचित राहण्याची येऊ शकते.

छोट्या-छोट्या चुकांमुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतो. तेराव्या हप्त्यामध्ये कोणतही अडथळा निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला ही बातमी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. समोर आलेल्या माहितीनुसार असे लक्षात येते की प्रत्येक हप्तावेळी लाभार्थी शेतकर्‍यांची संख्या कमी कमी होत आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या ३१ तारखेला लाभार्थी शेतकर्‍यांना ११ वा हप्ता देण्यात आला होता. ज्यामध्ये 10.45 करोड शेतकरी लाभार्थी होते.

११ व्या हाप्त्यामध्ये 10.45 करोड शेतकर्‍यांच्या बॅंक खात्यात 22,552 करोड रुपये जमा करण्यात आले होते. PM किसान योजनेचे आतपर्यंतचे हे सर्वाधिक सहाय्य असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात लाभार्थी शेतकर्‍यांना १२ वा हप्ता देण्यात आला. ज्यामध्ये लाभार्थी शेतकर्‍यांची संख्या 8.42 करोड होती. यावेळी 8.42 करोड शेतकर्‍यांना 17,443 रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले होते.

आता ११ वा आणि १२ वा हप्ता यामधील फरक जर आपण बघितला, तर आपल्या लगेच लक्षात येईल. ११ वा हप्त्याचा लाभ मिळवणार्‍या शेतकर्‍यांची संख्या १२ व्या हतप्तात चक्क २ कोटींनी कमी झाली. काही राज्यांतून सुद्धा अशीच आकडेवारी समोर आली. ज्यामध्ये महाराष्ट्रात ११ व्या हाप्त्याचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या १.०१ करोड होती तर १२ व्या हप्त्याची संख्या ८९ लाखच होती. हीच परिस्थिती पंजाबमध्ये सुद्धा आढळली. ११ वा हप्ता घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या १७ लाख होती, तर १३ वा हप्ता घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या केवळ २.०५ लाख होती.

PM किसान योजनेच्या ११ व्या आणि १२ व्या हाप्त्याच्या लाभार्थी शेतकर्‍यांच्या संख्येत ही तफावत नेमकी कशी काय निर्माण होते आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, काही बाबी सरकारच्या निदर्शनास आल्या. केंद्रिय डेटाबेसमध्ये शेतकर्‍यांच्या भूमी आणि लाभार्थी रेकॉर्डला अपडेट न केल्यामुळे ही समस्या उद्भवत असल्याचे समजले. यानंतर सर्व राज्यांना त्यासंबंधित आदेश देऊन त्वरीत हा डेटा अपडेट करण्यासाठी सांगण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, पुढच्याच महिन्यात शेतकर्‍यांना १३ वा हप्ता देण्यात येणार आहे. या हप्त्याच्या त्याअगोदर हा डेटा अपडेट करणे जरुरी आहे.

अशा या चुकांमुळे मोठ्या संख्येतील शेतकर्‍यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले. परंतू १३ व्या हप्त्यापासुन पुन्हा ही वेळ येऊ नये, म्हणून शेतकर्‍यांनी तत्काळ आपले भूमी रेकॉर्ड अपडेट करायचे आहे. तसेच पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करायची आहे. यासोबतच बॅंक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही, याची खात्री करुन घ्यायची आहे. आणि शेतकर्‍यांना आपले बॅंक खाते भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम सोबत जोडायचे आहे. उत्तर प्रदेश सरकारने याकरिता वेगाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच वरील गोष्टींची पूर्तता करण्यासाठी उत्तर प्रदेश प्रदेश सरकारकडून मोहीम सुद्धा राबवण्यात येत आहे.

हे देखील वाचा PM Kisan Maandhan Yojana: या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना सरकार देतंय दरमहा तीन हजार; जाणून घ्या लगेच..

BCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्‍या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..

Babar Azam Sexting Video: मित्राच्या गर्लफ्रेंड सोबत बाबर आझमचे तसले व्हिडिओ व्हायरल; क्रिकेट विश्वात एकच खळबळ..

Viral video: शिकार करायला गेलेल्या वाघाचा माकडानेच केला करेक्ट कार्यक्रम; व्हिडिओ पाहून तुम्हीही ठोकाल सलाम..

Flipkart Sale: अर्ध्या किंमतीत मिळवा हे महागडे स्मार्टफोन; Flipkart देत आहे बंपर डिस्काउंट..

Aadhaar card: आधार कार्ड धारकांना मिळणार ४.७८ लाखांचे कर्ज! काय आहे या योजनेची सत्यता? जाणून घेऊया..

Bigg Boss season 16: बिग बॉस 16 च्या विजेत्या स्पर्धकाचे नाव आले समोर; जाणून घ्या धुमाकुळ घालणाऱ्या या स्पर्धकाचे नाव..

Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.