Dhananjay Munde Accident: धनंजय मुंडेंचा भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर; छाती दोन जाग्यावर फ्रॅक्चर; पाहा व्हिडिओ..
Dhananjay Munde Accident: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला रात्री साडेबारा वाजता भीषण अपघात झाला असून, धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईमध्ये (Mumbai) उपचार सुरू आहेत. धनंजय मुंडे यांचा झालेला अपघात सकाळी उशिरा समजला असून, आता धनंजय मुंडे यांच्या अपघाताचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. धनंजय मुंडे यांचा अपघात ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाला असून, धनंजय मुंडे यांच्या छातीला जबर मार लागला आहे.
रात्री परळीकडे (parali) जात असताना धनंजय मुंडे यांच्या गाडीचा साडेबारा वाजता अपघात झाल्याची माहिती आता समोर आली असून, ही बातमी वाऱ्या सारखी पसरली आहे. सुरुवातीला हा अपघात किरकोळ झाल्याची बातमी समोर आली होती, मात्र धनंजय मुंडे यांच्या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमता पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांचा अपघात इतका भीषण होता, की गाडीचा चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
एकीकडे धनंजय मुंडे यांचा भीषण अपघात झाला असला, तरी दुसरीकडे मात्र त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कार्यकर्त्यांना घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं सांगण्यात आलं आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, माझा किरकोळ अपघात झाला आहे. मला छोटीशी दुखापत झाली असून, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं देखील धनंजय मुंडे यांच्या ट्विटर अकाऊंटवरून सांगण्यात आलं आहे.
परळीकडे जाताना धनंजय मुंडे यांच्या गाडीला साडेबारा वाजता अपघात झाला. अपघात भीषण असला तरी धनंजय मुंडे यांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. गाडीचा चक्काचूर झाला असला तरी धनंजय मुंडे यांना फारशी दुखापत झाली नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार, धनंजय मुंडे यांच्या छातीला दोन फॅक्चर आले आहेत. धनंजय मुंडे यांना या व्यतिरिक्त कुठेही जखम झाली नाही. सुदैवाने धनंजय मुंडे यांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसून, ते मुंबई उपचार घेत असल्याची माहिती आहे.
या ठिकाणी घडली घटना
धनंजय मुंडे यांच्या अपघाताची बातमी आता वाऱ्यासारखी पसरली असून, आज रात्री साडे बारा वाजता परळीतील आझाद चौकामध्ये हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर, लगेच धनंजय मुंडे यांना खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत याचा देखील अपघात झाल्याने क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात होती. अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणातले मोठं नाव धनंजय मुंडे यांचा देखील अपघात झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचाSSC CHSL Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये या उमेदवारांसाठी 4,500 पदांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..
Chanakya Niti: या गोष्टीत पत्नीचे समाधान नाही झाले तर पैशाची चणचण सतत भासते..
Cristiano Ronaldo Salary Breakup: रोनाल्डो कमावणार तासाला 21 लाख रुपये, एवढंच नव्हे तर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम