Rishabh Pant: शिखर धवनने ऋषभ पंतला गाडी हळू चालवायला सांगितलं होतं, तरीही ऐकलं नाही; व्हिडिओ झाला व्हायरल..
Rishabh Pant: भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या (Rishabh pant) अपघाताने संपूर्ण देश हळहळला आहे. दिल्लीहून (Delhi) डेहराडूनला (dehradun) जात असताना रुडकीच्या (Roorkee) गुरुकुल नरसन (Gurukul Narsan) परिसरामध्ये आज पहाटे पाच वाजून 21 मिनिटांनी भीषण अपघात झाला. ऋषभ पंतची गाडी डिव्हायडरला धडकल्यानंतर, पलटी झाली. आणि पुढच्या पाच मिनिटात गाडीने पेट घेतला. एक्सीडेंट झाल्यानंतर, पाच मिनिटांत गाडीने पेट घेतला. मात्र मधल्या काळामध्ये ऋषभ पंतने स्वतः वाचवलं. (Rishabh pant car crash divider)
आता या सगळ्यांमध्ये सोशल मीडियावर ऋषभ पंतचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शिखर धवन (Shikhar Dhawan) सोबतचा असून, आयपीएल दरम्यान या दोघांनी एकमेकांसोबत संवाद साधलेला होता. ऋषभ पंत शिखर धवनचा इंटरव्यू घेत असतानाच हा व्हिडिओ आहे. आयपीएलमध्ये (IPL) दोघेही दिल्ली कॅपिटल (Delhi capitals) संघासोबत जोडले असतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत (video) ऋषभ पंत शिखर धवनला मला तू काय सल्ला देशील असा प्रश्न विचारतो. (Rishabh pant car accident)
ऋषभ पंतने विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना शिखर धवन म्हणतो, मी तुला एवढा सल्ला देईन, गाडी सावकाश चालवण्याचा. ऋषभ पंतला भरधाव वेगाने गाडी चालवण्याची सवय आहे. अनेक तरुण मुलांना भरदव वेगाने गाड्या चालवण्याची सवय असते. ऋषभ पंतला देखील ही सवय होती. याच सवयीने कदाचित त्याला हा दिवस पाहिला मिळाला. मात्र शिखर धवनने दिलेला सल्ला ऋषभ पंत देखील ऐकत यापुढे मी गाडी सावकाश चालवील असं या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे.
शिखर धवनने दिलेला सल्ला ऋषभ पंतने मान्य केला असला तरी देखील सोशल मीडियावर वायरल झालेल्या ऋषभ पंतच्या कार एक्सीडेंटच्या व्हिडिओत (Rishabh pant car accident video) ऋषभ पंतची गाडी भरधाव वेगाने डिव्हायडरला आढळल्याचे पाहायला मिळत आहे. ऋषभ पंतच्या गाडीचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) समोर आले असून, या फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता, गाडी प्रचंड वेगाने होती. धवनचा सल्ला ऋषभ पंतने त्याचवेळी ऐकला असता, तर कदाचित आज हे पाहायला मिळाले नसते.
Always Listen to Elders 👀#RishabhPant #RIPPele pic.twitter.com/RJiQZL8arN
— .. (@deadlessguy) December 30, 2022
गंभीर दुखापत
दिल्लीहून आपल्या रुडकी या घरी जात असताना ऋषभ पंतचा रुडकीजवळच अपघात झाला. भरधाव वेगाने येत असलेली पंतची कार डिव्हायडरला धडकल्याने रस्त्याच्या पलीकडे पडली. आणि कारने पेट घेतला. मात्र ऋषभ पंत वेळीच बाहेर आला. गंभीर दुखापत झाली असली, तरी मात्र तो पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. सध्या त्याच्यावर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ऋषभ पंतवर अपडेट देताना बीसीसीआयने सांगितले, ऋषभच्या कपाळावर दोन कट आहेत. उजव्या गुडघ्यातील अस्थिबंधनही फाटले आहे. तसेच उजव्या हाताच्या मनगटाला, घोट्याला, पायाच्या पायालाही दुखापत झाली आहे. पाठीला देखील मोठी दुखापत आहे.
हे देखील वाचा Rishabh pant accident video: घायल होता, अंगावर कपडे नव्हती, तरीही लोकं व्हिडिओ काढत होती; तेवढ्यातूनही पंत म्हणाला बंद कर..; पाहा व्हिडिओ..
Rishabh pant car accident: ऋषभ पंतचा भीषण अपघात; संपूर्ण कार जळाली कसाबसा बाहेर आला पण..पाहा अपघाताचे CCTV फुटेज..
MSRTC Recruitment 2022: एसटी महामंडळात या उमेदवारांसाठी मेगा भरती; त्वरीत असा करा अर्ज..
PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम