Chanakya niti: नैराश्यात आहात, चिंताग्रस्त आहात? काळजी करू नका; चाणाक्य नितीमधील या 3 गोष्टी बदलून टाकतील तुमचे आयुष्य..

0

Chanakya niti: आचार्य चाणाक्य (aacharya Chanakya) हे प्राचीन भारतातले फार मोठे विद्वान होते. भारतीय संस्कृतीतले अनेक आदर्श त्यांनी प्रस्थापित केले आहे. आचार्य चाणाक्य म्हणजे अतिशय चतुर आणि बुद्धीवान असे व्यक्तीमत्व होते. अनेक ग्रंथ त्यांनी लिहीले आहेत. १००० वर्षांअगोदर लिहीलेले ग्रंथ आणि त्यातील माहिती आज सुद्धा तंतोतंत लागू होते. आचार्य चाणाक्य यांच्या ग्रंथांमधील विचारांनाच चाणाक्य निती म्हटले जाते. एका सामान्य कुटुंबातील बालकाला त्यांनी आपल्या बुद्धीचातुर्यच्या जोरावर राजा बनविले होते. चंद्रगुप्त मौर्य असे त्या राजाचे नाव होते. राजकारणात तर चाणाक्यांचा विशेष हातखंडा होता. त्यामुळे आदर्श राजा कसा असवा? प्रजेवर प्रभाव कसा पाडावा? व लोकांच्या मनावर कसे राज्य करावे? हे सर्व चाणाक्यांनी लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे आजचे राजकारणी सुद्धा अनेकदा चाणाक्य नितीचा आधार घेतात.

चाणाक्य नितीमध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टींचा समावेश आपण आपल्या दैनंदिन जिवनात केल्यास अनेक अमुलाग्र बदल आपल्याला जाणवायला लागतात. मोठ-मोठाले अधिकारी, राजकारणी आणि व्यावसायीक सुद्धा चाणाक्य नितीचा आधार घेतात. कारण परिस्थितीनुरुप आपल्या वागण्यात काय बदल घडायला हवा? याचा लेखाजोखाच आचार्य चाणाक्य यांनी मांडून ठेवला आहे. चाणाक्य नितीमध्ये कपटी स्वभाव असणार्‍यांचा साथ किती नुकसानदायी ठरु शकते, याविषयी सुद्धा सांगण्यात आले आहे. त्यामुळे फायद्याबरोबरच आपल्या रोजच्या जिवनातल्या कुठल्या गोष्टी आपल्याला नुकसानदायी ठरु शकतात? यावर देखील चाणाक्य भाष्य करतात.

आजच्या धावपळीच्या जिवनात अनेकदा आपल्या हातून अनावधानाने असे काही घडते, की त्याचा पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येते. बर्‍याचदा काही गोष्टी आपल्या हातुन सुटतात. त्यामुळे ईतरांच्या तुलनेत आपण थोडे मागे पडतो. अशावेळी नैराश्याचा सामना आपल्याला करावा लागतो. कमजोर हृदय असणारे अशावेळी परिस्थितीला सामोरे जाण्याऐवजी जिवन संपवण्याचा विचार सुद्धा करतात. बर्‍याचदा एखाद्या महत्वाच्या निर्णयावर पोहचण्यात आपल्याकडून प्रचंड गोंधळ होतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय न घेऊ शकल्याचे नुकसान सुद्धा आपल्याला सोसावे लागते. अशावेळी गोंधळाची अवस्था देखील आपल्यासाठी नुकसानदायी आहे. त्यामुळे जर तुम्ही नैराश्यात असाल किंवा गोंधळलेले असाल, तर आचार्य चाणाक्य यांनी सांगितलेल्या या काही गोष्टी तुमच्यात मोठे परिवर्तन घडवु शकते. आम्ही तुम्हाला चाणाक्य नितीतल्या याच काही महत्वाच्या गोष्टी याठिकाणी सांगणार आहोत.

शांत स्वभाव

आपण बघतो की बर्‍याच जणांचे फार चलबिचल मन असते. कधी एका जागेवर काही लोकांचं मन स्थिर राहत नाही. परंतू असे चलबिचल मन तुमच्यासाठी नुकसानदायी आहे. याऊलट शांत मन तुम्हाला स्थिर ठेवते. आचार्य चाणाक्य यांनी याबाबत सांगुन ठेवले आहे. माणसाचा स्वभाव शांत असला पाहिजे. शांत स्वभाव असणार्‍यास समाजामध्ये प्रगल्भ मानले जाते. कुठल्याही अडचनींना शांततेत सोडवले जाऊ शकते. याउलट तापट स्वभाव असणार्‍यांना समाजात विशेष महत्व नसते. शांततेत घेतलेले निर्णय दिर्घकाळ हिताचे ठरतात. त्यामुळे शांत स्वभाव प्रचंड लाभदायी ठरु शकते. राग आलेला असताना एखाद्या विषयावर भाष्य करणे म्हणजे त्यावर आपण दिलेली प्रतिक्रिया असते. त्याच विषयावर काही काळानंतर भाष्य केले तर तो निर्णय असतो.

समाधानी स्वभाव

आजचे युग हे स्पर्धेचे झाले आहे. त्यामुळे जिथे-तिथे आपण स्पर्धा बघतो. स्पर्धेपायी द्वेषभावना आणि मत्सर सुद्धा वाढते. तसेच स्वभावातला हावरटपणा वाढतो. त्यामुळे आचार्य चाणाक्य सांगतात, माणसाने समाधानी व्हायला हवे. समाधानी असल्यास आपण मनशांतीचा अनुभव घेऊ शकतो. आपण समाधानी नसल्यास आपल्या जिवनातला आंनदच नाहीसा होतो. कारण आपण कितीही पैसा कमावला तरी त्याचा आनंद आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे समाधानी नसलेली व्यक्ती कायम जिवाची ओढाताण करत राहते. स्पर्धेत टिकण्यासाठी किंवा वाढलेली हाव मिटवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न त्या व्यक्तीकडून केले जातात. मन समाधानी नसल्यास कायम अस्वस्थ जाणवते. त्यामुळे आनंद आणि मनशांतीच्या प्राप्तीसाठी समाधानी असणे फार आवश्यक आहे.

दयाभाव ठेवा

चाणाक्य नितीमध्ये दयाभावनेला फार महत्व देण्यात आले आहे. आचार्य चाणाक्य सांगतात, तुमच्याकडून कुठल्याही व्यक्तीवर कधी अन्याय होता कामा नये. याऐवजी प्रत्येक गरजूंची मदत तुम्ही केली पाहिजे. तुमच्याबाबतीत एखाद्याने चूक केली असल्यास त्यास मनाचा मोठेपणा दाखवत, त्याच्यावर दया दाखवली पाहिजे. दयाभाव तुम्हाला मोठेपणा मिळवून देतो. बर्‍याचदा चुक असूनही, त्यास शिक्षा देण्याऐवजी त्यावर दयाभाव दाखवल्यास संबंधीत व्यक्तीमध्ये बदल घडू शकतो. दयाभाव दाखवल्याने हिंदु धर्मानुसार तुमच्या पदरी पुण्य पडते. त्यामुळे कधीच तुमच्यावर कुठल्या मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ येत नाही.

मोहापासून लांब राहा

आचार्य चाणाक्य यांनी मोहाबाबत पुष्कळ सांगून ठेवलेले आहे. जो व्यक्ती लोभी असतो, त्याला कुठल्याही जाळ्यात अडकवणे फार सोपे असते. विशीष्ट गोष्टींचा मोह दाखवून त्यास अडकवता येते. त्यामुळे शत्रु तुमच्या या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय लोभी माणुस विविध संकटांना सुद्धा आमंत्रन देतो. मोहापायी चुकीच्या मार्गावर चालुन एखाद्या मोठ्या संकटात अडकण्याची शक्यता सुद्धा पुष्कळ असते. खासकरून पैसा आणि ‘स्त्री’चा मोह तर टाळलाच पाहिजे. जो माणुस स्त्री आणि पैश्यांचा मोह करतो, तो ऊध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. असे चाणाक्य यांनी सांगून ठेवलेले आहे. त्यामुळे आयुष्यात आनंद घ्यायचा असेल, शांती मिळवायची असेल, स्थिरता ठेवायची असेल, तर मोहापासून तुम्ही लांब राहिले पाहिजे.

हे देखील वाचा Dangers Of Using GB WhatsApp: GB WhatsApp वापरण्याचे फायदे कदाचित तुम्हाला माहितही असतील, पण हे खतरनाक धोके जाणून तुम्हीही कराल त्वरीत बंद..

RBI Rule On Torn Note: जळालेल्या फाटलेल्या नोटा आता कुठल्याही बँकेत मिळणार बदलून; जाणून घ्या RBI चा नवा नियम..

Social media side effects: सोशल मीडियाचा वापरामुळे होतायत हे गंभीर शारीरिक आणि मानसिक आजार..

Goat milk benefits: म्हशीचे नाही शेळीचे दूध आहे सर्वोत्तम! शेळीच्या दुधाचे हे 6 जबरदस्त फायदे पाहून तुम्हीही जाल चक्रावून..

limbu Pani side effects: गरम पाण्यात लिंबू टाकून पीत असाल त्वरित थांबवा; अन्यथा आरोग्यावर होतील हे गंभीर परिणाम..

ITBP Recruitment: बारावी पास उमेदवारांसाठी या सरकारी विभागात मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Monthly Income Scheme: इंडिया पोस्ट बॅंकेची जबरदस्त योजना लॉन्च; दरमहा मिळणार 5 हजार रुपये, करा फक्त हे काम..

Sarkari Yojana: PM kisan योजनेच्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारकडून मिळणार दिवाळी गिफ्ट; जाणून घ्या या योजनेविषयी सविस्तर..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.