Palmistry: तळहातावर ‘ही’ खूण असेल, तर तुमच्या नशिबात आहे भरपूर पैसा..

0

Palmistry: आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे, किंवा आपले आयुष्य कसे असेल, याविषयी जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. भविष्य बघण्याचे अनेक प्रकार आहेत. याविषयी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मात्र यामध्ये हस्तरेषाशास्त्रात हे एक प्रभावी माध्यम असून, याचा अनेक जण वापर देखील मोठ्या प्रमाणात करताना दिसून येतात. तळहातावरच्या रेषांवर नवग्रहांचा प्रभाव असतो, असं बोललं जातं. प्रामुख्याने आपल्या हातावर मस्तकरेषा, आयुष्यरेषा, हृदयरेषा अशा ठळकपणे दिसणाऱ्या तीन रेषा असतात. आज आपण तळहातावर कोणती खूण असल्यास, आपले करिअर यशस्वी होईल, आणि भरपूर पैसा येईल याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

खरंतर अनेकजण आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल करतात. महाराष्ट्र लोकशाही देखील कर्मा वरच विश्वास ठेवते. मात्र अलीकडे अनेक राजकारणी देखील मुहूर्त पाहून आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल करताना दिसून येतात. महाराष्ट्राच्या राजकारणात नुकताच भूकंप झाला. देवेंद्र फडणीस सरकार सहज सरकार स्थापन करू शकतील, असं चित्र होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांना अमावस्या झाल्यानंतर सरकार स्थापन करायला सांगितले आणि त्यांनी देखील अमावस्या झाल्यानंतरच सरकार स्थापन केले. या संदर्भात्या बातम्याही समोर आल्या होत्या. यावरून जोतिषशास्त्राचा राजकीय लोकांवर देखील प्रभाव आहे हे दिसून येते.

हस्तरेषाशास्त्रानुसार, आपल्या तळहातावर असणाऱ्या रेषा हे आपले भविष्य असते. असं बोललं जाते. आपल्या हातावरच्या रेषाचा आणि आपल्या आयुष्याचा थेट संबंध जोडला गेला आहे. तळहातावर काही खुणा असतात. यातील काही खुणा शुभ तर काही अशुभ मानल्या जातात. यापैकीच आपल्या हातावर ‘एम’ या आकाराची एक खूण आहे, जिच्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशाचा योग असल्याचे हस्तरेषाशास्त्रानुसार, सांगण्यात आले आहे.

‘एम’ हे चिन्ह असल्यास संपतीचा योग

प्रत्येकाला आयुष्यात खूप पैसा असावा, व्यवसायात यशस्वी व्हावं असं वाटतं असतं. आयुष्यात येणाऱ्या अडचणीचा सामना करण्यासाठी अनेकदा आपण ज्योतिषशास्त्राचा सहारा घेतो. मस्तकरेषा, आयुष्यरेषा, भाग्यरेषा या रेषा ज्यांच्या हातावर ‘एम’चा आकार बनवतात. अशी माणसे प्रचंड भाग्यवान असतात. ही लोकं परंपरेने श्रीमंत नसली तरी देखील, अशा लोकांच्या आयुष्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशाचा योग असल्याचे या शास्त्रात म्हंटले गेले आहे.

हाताच्या तळहातावर ‘एम’ हे चिन्ह असल्यास अशा लोकांनी कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकले, तरी देखील अशी लोकं यशस्वी होतात. प्रत्येक व्यवसायात त्यांना यश मिळते. कोणताही व्यवसाय केला, तरी त्या व्यवसायात एक उत्तम आणि यशस्वी व्यवसायिक म्हणून, त्यांच्याकडे पाहिले जाते. साहजिकच यामुळे त्यांना आयुष्यात संपत्ती, वैभव ऐश्वर्य, प्राप्त होते. हातावर ‘एम’ आकाराचे चिन्ह असणारी मंडळी समाजात मानसन्मान मिळवतात. तळ हातावरील नियम या चिन्हाबरोबरच आणखीही काही हातावर खुणा असतात, त्यादेखील खूप भाग्यशाली समजल्या जातात. आपण याविषयी देखील थोडक्यात माहिती घेऊया.

या खुणाही समजल्या जातात, खूप भाग्यशाली

‘एम’ या चीन्हाबरोबरच जर तुमच्या हातावरील मस्तकरेषा, आयुष्यरेषा, भाग्यरेषा या महत्वाच्या तीन रेषांचा मिळून जर तुमच्या हातावरती त्रिकोण बनत असेल, तर अशी मंडळी देखील प्रचंड भाग्यवान असतात. अशा खुणा असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात भरपूर संपत्तीचा योग असतो. शिवाय अशी लोक जीवनात प्रचंड उत्साही आणि आनंदी असतात. अशा लोकांच्या आयुष्यात संपत्तीचा योग येतो, परंतु यासाठी त्यांना थोडीशी वाट पाहावी लागते. याविषयी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, आयुष्याच्या मध्य काळात या लोकांना संपत्तीचा योग असतो.

अशी खूण असणारी लोक आपल्या बुद्धिच्या जोरावर मिळवतात यश

मस्तकरेषा, तसेच हृदयरेषा या दोन महत्वाच्या रेषांमध्ये X अशी खूण असेल, तर अशी लोकं आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर प्रचंड मोठ्या प्रमाणात यश मिळवतात. एक्स अशी खून असणारी लोकं आपल्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड श्रीमंत होतात. पैशाबरोबरच या लोकांना मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देखील मिळते, असं देखील हस्तरेषाशास्त्रात सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा लहानपणीच मुलांना या पाच गोष्टी शिकवल्यास, मुलं पोहोचतील यशाच्या शिखरावर.. 

Aadhar card: आधारकार्डला देखील असते एक्सपायरी डेट; या सोप्या पद्धतीने जाणून घ्या डिटेल्स..

Married Life Problem: हातावर या रेषा असतील तर वैवाहिक जीवनात येतात खूप अडचणी..

 या तीन गोष्टींचे पालन केल्यास, कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्य नांदेल..

Lifestyle: महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.