Ration Card: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! रेशन कार्डधारकांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार मोफत; असा घेता येणार लाभ..

0

Ration card: इंधन आणि गॅसच्या दरात (gas prices) दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, सर्वसामान्यांना आता प्रायव्हेट वाहनांमधून प्रवास वापर करावा लागत आहे, तर स्वयंपाकासाठी देखील पुन्हा चुलीचा वापर करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. २०१४ ते २०२२ या दरम्यान गॅसच्या किंमती जवळपास तिप्पट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता या सगळ्यात रेशन धारकांसाठी मोठी बातमी आहे. रेशन धारकांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार असल्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळात करण्यात आली आहे. (3gas cylinder free)

कोरोनाच्या महामारीत अनेकांचा हातचा रोजगार गेला सर्वसामान्यांना जगण्याची मोठी अडचण निर्माण झाली. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने ही बाब लक्षात घेऊन, रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला. अनेकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ देखील मिळाला. मात्र आता रेशन कार्ड धारकांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने रेशन धारकांसाठी दर वर्षाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. गॅसच्या किंमती हजाराहून जास्त असल्याने सर्वसामान्यांना गॅस ऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र सरकारने घेतलेल्य या निर्णयाने सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

उत्तराखंड मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर, उत्तराखंडचे मुख्य सचिव एसएस संधू यांनी यासंदर्भात निर्णय घेताना म्हटले, आम्ही घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यामधील 1,84,142 अंत्योदय रेशनकार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, राज्य सरकारने काही अटी आणि नियम देखील घातले आहेत.

राज्य सरकारने लागू केलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही गरीब असून चालणार नाही, तर तुमच्याकडे अंत्योदय रेशनकार्ड असणं आवश्यक आहे. निवडणूक काळात काँग्रेसने उत्तराखंड जनतेला आम्ही पाचशे रुपयेला गॅस सिलेंडर देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र यानंतर भारतीय जनता पार्टीने वर्षाला आम्ही उत्तराखंड जनतेला तीन मोफत गॅस सिलेंडर देणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यांनी आता सरसकट गॅस सिलेंडर न देता फक्त अंत्योदय रेशनकार्ड धारकांनाच या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे जाहीर केलं आहे. भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या निर्णयावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाली कॉंग्रेस?

धामी सरकारने घेतलेल्या निर्णयावर कॉंग्रेसने टिका केली आहे. धामी सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे, गरीबांची फसवणूक झाली आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता या घोषणेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी फक्त अंत्योदय कार्डधारक या योजनेचा लाभ घेत आहे. अंत्योदय कार्डधारकांना व्यतिरिक्त देखील लाखो कुटुंबे अशी आहेत, ज्यांचे उत्पन्न 15 हजारांपेक्षाही कमी आहे. मात्र आता भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या या निर्णयामुळे या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

एक लाख 84 हजार लोकांना मिळणार लाभ

धामी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा लाभ राज्यातील एक लाख 84 हजार लोकांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे सरकारवर वर्षी 55 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च पडणार आहे. अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव एसएस संधु यांनी दिली. अन्न आणि पुरवठा मंत्री यांनी देखील आम्ही दिलेले वचन पूर्ण केले असून, या महिन्यांत या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटलं.

हे देखील वाचा dog run behind the bike: धावत्या टू-व्हीलर मागे कुत्रं का पळतं? बाहेरगावी जाताना गाडी स्वच्छ धुवल्याने प्रवासात बाधा येत नाही, असं पुर्वज का म्हणायचे

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

IOCL Recruitment 2022: Indian oil मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी मेगा भरती! पगार ५० हजार; असा करा अर्ज..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.