Maharashtra Police Recruitment 2022: सर्वात मोठी ब्रेकिंग! राज्यात ऑगस्टमध्ये एकाचवेळी तब्बल 13 हजार पोलिस कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती..

0

Maharashtra Police Recruitment 2022: पोलीस भरतीचे (police Bharti) स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. दोन महिन्यांच्या आत तब्बल सात हजार पोलीस कॉन्स्टेबलची (Maharashtra police constable) भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Police Recruitment 2022) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन महिन्यांत म्हणजेच जूलै-ऑगस्टमध्ये पहिल्या टप्प्यात तब्बल सात हजार पोलिस कॉन्स्टेबलची भरती प्रक्रिया पार पाडणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात तब्बल 6 हजार पोलिस कॉन्स्टेबल पदांसाठी देखील भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. दुसरा टप्पा देखील दोन महिन्याच्या अंतरावरच घेतला जाणार असल्याने आता गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या आणि डोळ्यात अंजन घालून वाट पाहत बसलेल्या पोरांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकीय तसेच पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया रखडली गेली. गेल्या दोन वर्षांपूर्वीच राज्यात मेगा भरती करण्याची सगळी तयारी पूर्ण झाली होती, मात्र कोरोनामुळे ही भरती प्रक्रिया रखडली गेली. आणि अनेक उमेदवारांनी पोलिस भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्याचा भ्रमनिरास झाला. मात्र या उमेदवारांना दोन वर्षानंतर पुन्हा सुवर्णसंधी आली आहे. सात हजार पोलिस कॉन्स्टेबल पदाची भरती एकाच टप्प्यात होणार असल्याने, आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे.

तसं पाहायला गेलं तर, या भरतीसंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यात लवकरच मेगा भरती करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. तेव्हापासूनच पोलीस भरतीची चर्चा जोरदार रंगल्याचे पाहायला मिळत होतं. अनेक विद्यार्थ्यांना लवकरच पोलीस भरती होणार आहे, हे माहीत असल्याने अनेकांनी जोरदार तयारी देखील केल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आता अखेर पोलीस भरती प्रक्रियाची आस लावून बसणाऱ्या लाखों उमेदवारांना पोलिस होण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

कशी असेल ही भरती

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पहिल्या टप्प्यात तब्बल सात हजार पोलिस कॉन्स्टेबल पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात दोन महिन्यांच्या अंतराने तब्बल सहा हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. म्हणजेच एकूण 13000 पदांची मेगा भरती राज्यात लवकरच, म्हणण्यापेक्षा दोन महिन्यांत राबवली जाणार असल्याने आता खाकी वर्दी अंगावर चढवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

नुकत्याच झालेल्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आल्यानंतर, अनेकांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. अनेकांवर कारवाई देखील करण्यात आली. मात्र आता या भरती प्रक्रियेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी चांगलीच खबरदारी घेतली असून, ही भरती प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक पद्धतीने केली जाणार असून, याची अधिक खबरदारी घेतली गेली आहे. तसेच ही भरती प्रक्रिया सर्व आरक्षणासहीत होणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत असणारे विद्यार्थी कमालीचे अस्वस्थ होते. हजारो विद्यार्थ्यांनी पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून विविध अकॅडमी तसेच लायब्ररी जॉईन करून जोरदार तयारी देखील केली आहे. सरकारने मेगा भरती आयोजित केल्याने, आता या विद्यार्थ्यांचे स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे.

आर-आर पाटील यांच्यानंतर सर्वात मोठी भरती

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील (RR Patil) यांच्यानंतर आता राज्यात राबवण्यात येणारी पोलीस कॉन्स्टेबल भरती सगळ्यात मोठी असल्याचं सांगितलं जात आहे. माजी गृहमंत्री स्वर्गीय आर-आर पाटील यांनी खेडेगावातल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस भरतीच्या नियमांमध्ये बदल केले, आणि शारीरिक चाचणीला अधिक महत्त्व दिलं. स्वर्गीय आर आर पाटील यांनी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक ठरला. आणि ग्रामीण भागातील मुलांचं पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. स्वर्गीय आर-आर पाटील यांनी केलेल्या मेगाभरती नंतर, ग्रामीण भागातील हजारो मुलं भरती होऊ शकली. ही मुलं आज स्वर्गीय आर आर पाटील यांचा फोटो घरात लावत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

हे देखील वाचा Police Recruitment 2022: बारावी पास उमेदवारांनो राज्यात पोलीस दलात निघाली मेगा भरती! अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जून..

IPL 2022: आयपीएल ला गालबोट! ऋषभ पंतने केली मॅच फिक्सिंग; व्हिडिओ झाला व्हायरल..

Hero Splendor+ XTEC : USB चार्जर, कॉल अलर्टसह अनेक हाय-टेक वैशिष्ट्यांसह नवीन Hero Splendor+ XTEC लॉन्च..

PM kisan Update: मोठी बातमी! अकरावा हप्ता आलेल्या लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; अशी चेक करा यादी..

PM Mudra Yojana: व्यवसाय सुरू करायचाय पण पैसे नाहीत? चिंता करू नका, केंद्र सरकार देतय हमीशिवाय दहा लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या सविस्तर..

Home Remedies: ha घरगुती उपाय केल्यास, एकाच रात्रीत शरीरावर असणारी चामखीळ पडेल गळून..

beauty vibes: मेकअप पेक्षाही सुंदर आणि मुलायम दिसेल चेहरा, फक्त लावा हा फेsलेप लग्नाला जाताना तर हमखास लावा सगळ्यांच्या नजरा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.