Online shopping: ‘या’ सरकारी वेबसाईटवर आहे अनेक वस्तूंवर बंपर ऑफर; लॅपटॉप तर केवळ..

0

Online shopping: अनेकांना शॉपिंग करायला आवडत असतं, त्यातच जर कुठे ऑफर्समध्ये वस्तू मिळत असतील, तर अनेकजण गर्दी करतात. पैसे वाचवणे हा चांगला गुण आहे, त्यात चुकीचं काहीच नाही. त्यामुळे प्रत्येक जण स्वस्तात वस्तू कुठे मिळतात? याची चौकशी करूनच शॉपिंग करत असतो. जर तुम्ही ऑफर्समध्ये शॉपिंग करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तसं पाहायला गेलं तर, मार्केटमध्ये अनेक ऑनलाइन शॉपिंगच्या वेबसाईट उपलब्ध आहेत. या वेबसाईटवर अनेक वस्तू ग्राहकांना मोठ-मोठ्या ऑफर्समध्ये खरेदी करता येतात. मात्र आता तुम्हाला याहूनही स्वस्त वस्तू ‘जेम’ या सरकारी वेबसाईटवरुन खरेदी करता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला याच विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात वाढल्याचे दिसते. मात्र अनेक जण ऑनलाईन शॉपिंग करताना आपण मागवलेल्या वस्तू दर्जेदार आहेत का? याविषयी अशी शंका असते. अनेक ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला ऑफर देण्यात येतात, मात्र वस्तूंच्या दर्जेदारपणा विषयी प्रश्न कायम असतो. मात्र या वेबसाईटवर विकला जाणारा माल दर्जेदार आहे की नाही, याविषयी अनेकांमध्ये शंका असते. मात्र आता तुम्हाला निसंकोचपणे ‘जेम’ या सरकारी वेबसाइटवर दर्जेदार वस्तू अगदी तुमच्या बजेटमध्ये खरेदी करता येणार आहेत.

ॲमेझॉन फ्लिपकार्ट या व्यतिरिक्त अनेकांना कुठल्याही ई-कॉमर्स वेबसाईट विषयी माहिती नाही. मात्र Gem या सरकारी वेबसाइटने ऑफर्सच्या बाबतीत या दोन वेबसाईटला देखील मागे टाकले आहे‌. अनेकांना यावर विश्वास बसत नसेल, मात्र एका सर्वेक्षणात ही माहीती समोर आली आहे. या वेबसाइटवर 10 उत्पादने अशी आहेत, जी इतर वेबसाईटच्या तुलनेत स्वस्त दरात विकली जात आहेत. ही एक सरकारी वेबसाईट असल्यामुळे, या वेबसाइटवर विकली जाणारी उत्पादने दर्जेदार देखील आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात gem या वेबसाईटवरून शॉपिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

कमी किंमत आणि दर्जेदार वस्तू

Gem या सरकारी वेबसाईटवर विकल्या जाणाऱ्या वस्तू दर्जेदार असल्याचं सर्वेत समोर आलं आहे. शिवाय इतर वेबसाईटच्या तुलनेत या वेबसाईटवर अधिक स्वस्त वस्तू देखील मिळत असल्याने, अलीकडच्या काळात या वेबसाइटवरून वस्तू खरेदी करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. या वेबसाईटवर विकल्या जाणाऱ्या वस्तूच्या गुणवत्तेत कुठल्याही प्रकारची तडजोड नसल्याने ग्राहक या वेबसाइटवरून वस्तू खरेदी करण्यास पसंती देत असल्याचे निदर्शनास आले आहे. या वेबसाइटवरील २२ उत्पादकांची इतर वेबसाईटच्या किंमतीची तुलना केली तर, या वेबसाइटवर तब्बल ९.५ टक्क्यांनी दर कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

इतर वेबसाईटच्या तुलनेत लॅपटॉपवर तब्बल २५ टक्‍क्‍यांपर्यंत सूट

जर तुम्हाला लॅपटॉप खरेदी करायचा असेल, तर तुम्ही ‘जेम’ या वेबसाईटवर जाऊन लॅपटॉपच्या किंमती चेक करणं आवश्यक आहे. Gem या सरकारी वेबसाइटवर इतर वेबसाइटच्या तुलनेत अधिक स्वस्त लॅपटॉप आणि कॉम्प्युटर विकले जात आहेत. या वेबसाईटवर लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या किंमतीमध्ये तब्बल 25 टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही एक सरकारी वेबसाइट असल्याने, या वेबसाईटवर विकल्या जाणाऱ्या वस्तू देखील दर्जेदार आहेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यावर क्लिक करून पहा लॅपटॉपच्या किंमती. यावर क्लिक करून पहा अधिकृत वेबसाईट

हे देखील वाचा PM kisan: शेतकऱ्यांच्या खात्यावर या तारखेला पीएम किसान योजनेचा ११ वा हफ्ता जमा होणार, लवकर करा he काम..

धक्कादायक: तासंतास मोबाईल वापरत बसल्याने होतायत हे गंभीर परिणाम, वेळीच सावध व्हा नाहीतर

ई-केवायसी कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; अन्यथा पीएम किसान हप्ता होईल बंद

Onion: शेतकऱ्यांनो कांदा विकण्याची गडबड करू नका; या कारणामुळे महिन्याभरातच कांदा सत्तर रुपये किलोने विकला जाणार..

India Post Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांची अशी केली जाणार निवड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.