wheat: जबरदस्त पौष्टिक आणि भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या शरबती गव्हाला आहे सर्वाधिक मागणी; जाणून घ्या अधिक..

0

wheat: जगात सर्वाधिक गहू भारतात पिकवला जातो. जगात सर्वाधिक गहू उत्पन्न काढण्याच्या यादीत भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारतामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राज्यात गव्हाचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. जगाच्या तुलनेत भारताचा गहू हा सर्वाधिक पौष्टिक मानला जातो. भारताच्या गव्हाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी देखील आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका गव्हाच्या प्रजाती विषयी सांगणार आहोत, ज्याच्याविषयी तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसेल. तुम्हाला शरबती या गव्हाविषयी माहिती आहे का? 

शरबती या गव्हाची अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. या गव्हाचा सोनेरी दाणे असा देखील उल्लेख करतात. याच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आले असेल, या गव्हाचे काय काय गुणधर्म असू शकतात. शरबती हा गहू फक्त दिसायला सोनेरी नाही, तर याची चव देखील अफलातून गोड आहे. हा गहू तुम्ही हातावर घेतल्यानंतर या गव्हाला वजन देखील असल्याचं जाणवतं. चवीला देखील का गहू इतर गव्हाच्या तुलनेत खूप सरस आहे. इतर गव्हाच्या तुलनेत हा गहू अधिक पौष्टिक असल्याने, मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. इतर गव्हाच्या तुलनेत या गव्हाला दर देखील जास्त आहे.

जर तुम्ही गव्हाची शेती करत असाल, तर तुम्ही तुमच्या शेतात, ‘शरबती’ या गव्हाची लागवड करण्यास हरकत नाही. या गव्हाला मागणी तर आहेच, मात्र इतर गव्हाच्या तुलनेत या गव्हाला दर देखील चांगला आहे. याशिवाय इतर गव्हापेक्षा या गव्हाचे उत्पन्न देखील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मिळत आहे. आणि म्हणून, शेतकऱ्यांसाठी हा गहू अलीकडच्या काळात मोठं वरदान ठरत आहे. आता आपण या गव्हाच्या लागवडीविषयी सविस्तर जाणून घेऊया.

देशात शरबती या गव्हाचे उत्पन्न मध्यप्रदेशात सर्वाधिक केले जाते. मध्यप्रदेशमध्ये ओळखला जाणारा हा गहू उत्तम दर्जाचा आहे. या गव्हाची चव इतर गव्हाच्या तुलनेत अधिक गोड असते. शरबती या गव्हाच्या चपात्या/पोळी इतर गव्हाच्या तुलनेत अधिक लालसर होते. शरबती या गव्हापासून बनवलेल्या चपात्या/ पोळ्या अधिक पौष्टिक असतात. मध्य प्रदेशमध्ये काळी तसेच गाळाची सुपीक जमीन असल्याने, शरबती गव्हाचे उत्पादन करण्यास ही माती पोषक ठरते. मध्यप्रदेशामध्ये या गव्हाला सुवर्ण धान्य असे देखील संबोधले जाते. हा गहू मध्यप्रदेशमधील भोपाळ, सीहोर, होशंगाबाद, हरदा, अशोकनगर, नरसिंगपूर, तसेच माळवा जिल्ह्यांत अधिक पाहायला मिळतो‌.

इतर गव्हाच्या पेरणीचा आणि या गव्हाच्या पेरणीचा विचार केला तर, दोन्हीं गावांमध्ये फारसा फरक नाही. शरबती हा गहू ऐकरी साधारण 29 ते 34 किलो गहू लागतो. मात्र या गव्हाच्या हेक्टरी उत्पन्नाचा विचार करायचा झाल्यास, गव्हाच्या तुलनेत या गव्हाचे उत्पन्न अधिक आहे. साधारण या गव्हाचे उत्पन्न 41 ते 47 क्विंटल पर्यंत जाते. या गव्हाला निघायला 140 ते 45 दिवस लागतात. मध्यप्रदेशमधील सिहोर जिल्ह्यात यावर्षी ४० हजार हेक्टरहून अधिक या गव्हाची पेरणी झाली आहे. तर या जिल्ह्यात शरबती या गव्हाचे उत्पादन जवळपास एक लाख दहा हजार दशलक्ष टन आहे.

सामान्य गहू आणि शरबती गव्हात काय फरक?

कुठलेही पीक जमिनीच्या आर्द्रतेवर अवलंबून असतं. मध्य प्रदेशामध्ये पावसाच्या पाण्याचे सिंचन होत असल्याकारणाने तेथील जमिनीत पोटॅशचे प्रमाण अधिक आढळते. पोटॅशचे प्रमाण जास्त आणि आद्रता कमी यामुळे सहाजिकच शरबती या गव्हाचे उत्पन्न मध्यप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात होतं. जमिनीमध्ये आर्द्रता कमी असल्याने, शरबती गव्हातील प्रथिनांचे प्रमाण इतर गव्हाच्या तुलनेत सुमारे २ टक्क्यांनी वाढते. साहजिकच यामुळे या गव्हावर कीडनाशकांची फवारणी करावी लागत नाही. आणि याचमुळे इतर गव्हाच्या पिठापेक्षा शरबती या गव्हाचे पीठ अधिक पौष्टिक आणि लालभडक पाहायला मिळते.

शरबती गव्हाचे काय आहेत फायदे? 

इतर गव्हाच्या तुलनेत शरबती हा गहू अधिक पौष्टिक आणि शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देणारा गहू आहे. या गव्हाला इतर गव्हाच्या तुलनेत मागणी देखील अधिक आहे. शिवाय या गव्हाचा उत्पादन खर्च देखील कमी येतो. या गव्हापासून 113 कॅलरीज मिळतात. जे की, इतर गव्हाच्याच्या तुलनेत अधिक आहेत. तसेच या गव्हामध्ये केवळ 1 ग्रॅम चरबी पाहायला मिळते. तसेच कार्बोहायड्रेट आहारामध्ये 21 ग्रॅम फायबर पाहायला मिळते. तसेच यामध्ये प्रथिने 5 ग्रॅम आढळतात. कॅल्शियम 40 लोह 0.9 आढळते. याचबरोबर सेलेनियम, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम यासारख्या मल्टी-व्हिटॅमिन पौष्टिक तत्वांचा समावेश आढळतो.

हे देखील वाचा India Post Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांची अशी केली जाणार निवड..

SAUR KRUSHI PUMP YOJANA: सौर कृषी पंपासाठी राज्य सरकारकडून आता ९५ टक्के अनुदान; असा करा अर्ज..

Railway job: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड,जाणून घ्या अधिक..

Amazon Great Indian Festival : Redmi कंपनीचा हा स्मार्टफोन फक्त 7,020 मध्ये उपलब्ध

Viral video: माणसांप्रमाणे प्राणी देखील ठेवतात संबंध; २ कोटी ७० लाख लोकांनी पाहिलेल्या या व्हिडीओत आहे तरी काय? पहा तुम्हीच..

Viral video: मृत्यूच्या जाळ्यातून आईने वाचवलं लेकरू; मन सुन्न करणारा हा व्हिडिओ एकदा पहाच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.