SAUR KRUSHI PUMP YOJANA: सौर कृषी पंपासाठी राज्य सरकारकडून आता ९५ टक्के अनुदान; असा करा अर्ज..

0

SAUR KRUSHI PUMP YOJANA: राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी, महाराष्ट्र राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप’ ही योजना सुरू केली असून, आता राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आपल्या शेतातील विहिरीवर सौरपंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी तब्बल 95 टक्के अनुदान देण्यात येत असून, आता शेतकऱ्यांना लाईटीची वाट पाहावी लागणार नाही. राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना आता शेतकऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरत असल्याचं चित्र आहे.

लोडशेडिंगमुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पिक पाण्यावाचून जळून जातं, हे कोणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेकदा आपण पाहतो, विहिरीत पाणी असून देखील, लाईट उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देता येत नाही. केवळ विजेमुळे शेतकऱ्यांना लाखों रुपयांचा फटका बसतो. कधीकधी लाईट असून, देखील तांत्रिक बिघाडामुळे, होल्टेज कमी असल्यामुळे, शेतकऱ्यांची मोटार चालत नाही. हे आपल्याला अलीकडच्या काळात सर्रास पाहायला मिळत आहे. वीज कंपनीच वरून कमी होल्टेज प्रसारित करत असल्याचे शेतकरी वारंवार तक्रार करतात.

या सगळ्या गोष्टींना शेतकरी प्रचंड वैतागतात. पोटच्या पोरासारखं जपलेलं पिक वीज नसल्याने एखाद्या पाण्याला आचकतं आणि सगळं होत्याचं नव्हतं होतं. वेळेवर लाईट नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही, आणि याचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र आता शेतकऱ्यांना वीजेची वाट पाहावी लागणार नाही. आता ज्या शेतकऱ्यांना सौर पंप आपल्या शेतात बसवायचा आहे, अशा शेतकऱ्यांना आता राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेता येणार आहे.

आता आपण ही योजना काय आहे? हे जाणून घेऊ या..

राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप या नावाने एक योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारचे येणाऱ्या तीन वर्षात एक लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना अटल सौर कृषी पंप म्हणून देखील परिचित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ज्या शेतकऱ्यांना या सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्यायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी अर्ज कोठे व कसा करायचा? यासंदर्भातील देखील आम्ही सविस्तर माहिती सांगणार आहोत. 

तब्बल ९५ टक्के अनुदान

राज्य सरकारने सुरू केलेल्या सौर कृषी पंप या योजनेसाठी शेतकऱ्यांना तब्बल 95 टक्के अनुदान मिळणार आहे. जवळपास शेतकऱ्यांना सौर कृषी पंप हा मोफत मिळणार आहे. राज्य सरकारने ही योजना INAC द्वारे सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश हा गरीब शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करायची असेल, तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे. शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेसी वीज मिळत नाही. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना शेती करणं कठीण होऊन बसतं आणि म्हणून, ही गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ एक लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. येणाऱ्या तीन वर्षात राज्य सरकार तब्बल एक लाख सौर कृषी पंप शेतकऱ्यांना देणार आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी 95 टक्के अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना फक्त पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना https://www.mahadiscom.in/solar/index.html या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी तुमच्या मोबाईलवर क्रोमवर जाऊन https://www.mahadiscom.in/solar/index.html असं सर्च करायचं आहे. तुम्ही तुमच्या क्रोमवर जाऊन https://www.mahadiscom.in/solar/index.html असं सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसेल. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी सविस्तर अर्ज करू शकता.

तुम्हाला यासंदर्भात काही अडचणी येत असतील तर तुम्ही Maharashtralokshahi@gmail.com यावर संपूर्ण करू शकता.

 हे देखील वाचा India Post Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांची अशी केली जाणार निवड..

Railway job: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड,जाणून घ्या अधिक..

Onion: शेतकऱ्यांनो कांदा विकण्याची गडबड करू नका; या कारणामुळे महिन्याभरातच कांदा सत्तर रुपये किलोने विकला जाणार..

Amazon Summer Sale: Amazon वर सर्वच किराणा मालावर 50 टक्क्यांपर्यंत सूट; जाणून घ्या सविस्तर..

Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज..

Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

Amazon prime: आता Hotstar, Netflix-Amazon prime सबस्क्रिप्शन न करता मोफत पाहता येणार; फक्त करा हे काम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.