Renu Sharma: पाच कोटीची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा आणि धनंजय मुंडेंचं ‘हे’ आहे कनेक्शन; जाणून तुम्हीही म्हणाल..
Renu Sharma: गेल्या दीड-दोन वर्षांपासून धनंजय मुंडे (dhanajay Munde) चांगलेच चर्चेत आहेत. करुणा शर्मा (karuna Sharma) या धनंजय मुंडेंच्या पत्नी होत्या, हे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र धनंजय मुंडे यांनी करून शर्मा ही आपली पत्नी होती हे मान्य केलं नाही. मात्र त्यांनी या महिलेशी सहमतीने आपण संबंधात होतो, आणि यापासून आम्हाला दोन अपत्ये देखील असल्याचं त्यांनी म्हंटले आहे. एवढेच नाही तर, या मुलांना मी माझं नाव देखील दिलं असल्याचे धनंजय मुंडे यांना सांगितले होते.
आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी या पूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. मात्र त्यानंतर 22 जानेवारीला कौटुंबिक कारणास्तव आपण केलेली तक्रार मागे घेत असल्याचं, त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा ‘रेणू शर्मा’ चर्चेत आल्या आहेत. धनंजय मुंडे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी रेणू शर्मा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी तक्रार दाखल केली होती. आपल्याला आंतरराष्ट्रीय फोन कॉल करून धमकी देण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता पाच कोटी मागणारी ही महिला रेणू शर्मा असल्याचं समोर आलं आहे.
धनंजय मुंडे आणि रेणू शर्माचं हे आहे कनेक्शन
रेणू शर्मा ही दुसरी तिसरी कोणी नसून, धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांच्या बहिण आहेत. तसं पाहायला गेलं तर, धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा ही आपली पत्नी असल्याचं कबूल केलं नाही. मात्र त्यांनी या महिलेपासून आपल्याला दोन मुलं झाली असल्याचं कबूल केलं आहे. करुणा शर्मा यांच्या बहीण रेणू शर्मा यांनीच धनंजय मुंडे यांना फोन करून खंडणी मागत असल्याचं समोर आल्याने, आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.
कोण आहेत रेणू शर्मा
रेणू शर्मा या करुणा शर्मा यांच्या बहीण असून, त्या मुळच्या मध्यप्रदेशमधील आहेत. रेणू शर्मा या गायक देखील आहेत. त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. देसी लव्ह, बेशरम, फुलों तरह खिलते देखा, मी आहे तुझ्या व्हॉट्सअपवर इद्यादी गाणी रेणू शर्मानं गायली आहेत. गेल्या वर्षी धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा यांनी ब ला त्का रा ची तक्रार देखील दाखल केली होती. मात्र नंतर कौटुंबिक कारणास्तव माघारी घेत असल्याचं पोलिसांना त्यांनी लिहून दिलं होतं.
रेणू शर्मा यांना अटक झाल्यानंतर काय म्हणाले धनंजय मुंडे?
मुंबई पोलिसांनी इंदूर मधून रेणू शर्मा यांना अटक केल्यानंतर, धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले, सहनशक्ती संपल्यानंतर मला नाईलाजाने पोलिसात तक्रार द्यावी लागली. या प्रकरणाचं काय करायचं ते पोलीसच करतील. मुंबई क्राईम ब्रांचकडून रेणू शर्माची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात पुढे नेमकं काय होते, हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे देखील वाचा Video: धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांचा तो प्रायव्हेट व्हिडिओ झाला व्हायरल; राज्याच्या राजकारणात खळबळ..
Emergency Led Bulb: लाईट गेली तरी चालूच राहतिल he एलईडी बल तब्बल yevde तास; ॲमेझॉनवर सेल सुरू..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम