Lifestyle: झोपेत अडथळा करणाऱ्या डासांना ‘या’ पाच घरगुती उपाय योजना करुन लावा पळवून..
Lifestyle: उन्हाळा ऋतुमध्ये माणसाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. कडक उन्हामुळे आरोग्याची काळजी तर घ्यावीच लागते, मात्र या व्यतिरिक्त आणखी देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. उन्हाळा म्हटलं की, खूप मोठ्या प्रमाणात डासाची निर्मिती होते. आणि हे डास आपल्याला नेहमी त्रास देतात.जेवढा त्रास आपल्याला उन्हाचा होतो, त्याच्याहून अधिक त्रास आपल्याला डासांचा होतो. मात्र आम्ही तुम्हाला अशा पाच घरगुती उपाय योजना सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही डासांची कायमस्वरूपी विल्हेवाट लावू शकता.
डासामुळे मानवाला अनेक प्रकारचे रोग जडतात. त्यामुळे डासांपासून आपण काळजी घेतली नाही, तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. डासांमुळे आपल्याला डेंगू सारखे भयंकर आजार देखील जडू शकतात. आणि म्हणून डासांपासून आपला नेहमी बचाव केला पाहिजे. आपण डासांपासून संरक्षण मिळण्यासाठी उपाययोजना करत नाही, असं नाही. आपण अनेक उपाययोजना देखील करतो, मात्र डास मुळासकट नाहीसे होत नाही.
मात्र आपण आज डासांना मुळासकट कसे संपवून टाकायचे आणि तेही घरगुती उपाययोजना करून या विषयी आता सविस्तर जाणून घेऊया. आपल्या रोजच्या वापरत अशा अनेक वस्तू असतात, ज्या अनेक गोष्टींवर काम करत असतात. मात्र त्याविषयी आपल्याला फारसं माहीत नसते. लसून, पुदिना, कडुलिंब, सोयाबीन तेल, आणि कॉपी या पाच वस्तूंनी आपण डासांची कायमस्वरूपी विल्हेवाट लावू शकतो.
लसणाच्या रसाने डास परत कधीच येत नाहीत.
अनेकजण डासांना घरातून बाहेर पळून लावण्यासाठी गुड नाईट कॉइल वापरतात. मात्र याने डास पूर्णपणे जात नसल्याचे आपल्या देखील लक्षात येत असेल. आणि म्हणून तुम्ही लसणाचा पाकळ्यापासून स्प्रे बनवा. गरम पाण्यात या पाकळ्या जर तुम्ही उकळल्या तर उत्तमरीत्या स्प्रे तयार होऊ शकतो. तयार झालेला स्प्रे एका बाटलीत भरून संपूर्ण रूममध्ये स्प्रे केला तर, रूममध्ये असणारे सर्व डास पळून जातील, आणि पुन्हा येणारही नाहीत.
कॉफी वापरून डासाची विल्हेवाट लावा.
लसनाप्रमाणे, कॉफीजवळ देखील डास येत नाहीत.
कॉफी वापरून देखील आपण डासांची विल्हेवाट लावू शकतो. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी डासाची पैदास होते असं तुम्हाला वाटतं, त्या ठिकाणी तुम्ही कॉपी पावडर किंवा कॉफी टाकली तर, डासांची अंडी देखील नष्ट होतात. हा एक सोपा आणि साधा घरगुती उपाय तुम्ही वापरून डासांना पळवून लावू शकता.
पुदिन्याच्या सुगंधाने डासांना त्रास होतो
कॉफी, लसुन, यानंतर पुदिनाच्या वासाने देखील डास पळून जातात. जर तुम्हाला डास घरातून बाहेर काढायचे असतील तर, तुम्ही हा मार्ग देखील अवलंबून पाहू शकता.
कडुलिंबाचे तेल देखील आहे प्रभावी
कडुलिंबाच्या तेलानेही डास आपल्या आसपास देखील फिरकत नाहीत. जर आपण हे तेल पाण्यात मिसळून पाणी आपल्या शरीराला लावले तर डास आपल्या जवळ देखील येणार नाहीत. डासांना पळवून लावण्यासाठी कडुलिंबाचे तेल देखील खूप प्रभावी ठरू शकतं.
हे देखील वाचा Viral video: आई ती आईच..! पिल्लांना कोब्राच्या तावडीतून असं वाचवलं कोंबडीचे; अंगावर शहारे आणणारी ही झुंज एकदा पहाच..
Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम