लग्नाची पहिली ‘रात्र’ अविस्मरणीय करायची असेल तर करा ‘हे’ काम; अन्यथा ‘या’ चुकांमुळे पहिली रात्र होईल उद्ध्वस्त..
लग्न (marriage) हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस असतो. या दिवसाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. या दिवसाची जोडपं आतुरतेने वाट पाहत असतं तरी, लग्नाच्या पहिल्या दिवशी दोघांच्याही मनात कमालीची भीती आणि अस्वस्थता असते. लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या मनात आयुष्यभरासाठी कोरला जातो. आणि म्हणून प्रत्येक जण या दिवसाच्या फक्त गोडच आठवणी आपल्या सोबत याव्यात याचाच प्रयत्न करत असतो.
लग्नासाठी अनेक तरुण-तरुणी खुप एक्साइटमेंट असतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र अनेक जण लग्नासाठी उत्साही असला तरी, प्रत्येकाच्या मनात लग्नाच्या अगोदर भिती आणि चिंता असतेच. खासकरून लग्नाच्या पहिल्या रात्री आयुष्याची नवी इनिंग सुरू करणाऱ्या आणि पत्नी (wife) म्हणून समाजात पुढे वावरणाऱ्या आपल्या पत्नीच्या मनात खूप तणाव आणि भिती असते. याविषयी देखील कोणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही. लग्नाच्या पहिल्या रात्री दोघांच्याही मनात भीती असली तरी, तुलनेनं पुरुष अधिक उत्साही असतो, मात्र स्त्री भितीच्या सावटाखालीच जास्त असते.
लग्न म्हणजे दोन मनाचं मीलन असतं, हे प्रत्येकजण पहिल्या रात्री विसरतो, मात्र हे प्रामुख्याने लक्षात ठेवूनच पुरुष म्हणून, आपण पुढचं पाऊल टाकायला हवं. बरेचदा लग्न असल्याने दिवसभर पती आणि पत्नी दोघांनाही थकवा येत असतो. त्यासोबतच आई-वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं, वीस-पंचवीस वर्षे भावासोबत आपण रोज खेळलेलो असतो, या सगळ्यांना सोडून आयुष्याची नवी इनिंग पत्नीला सुरू करायची असल्याने, पत्नी अधिक दबावात असते. लग्नाच्या पहिल्या रात्री तीला या सगळ्या गोष्टींची आठवण येत असल्याने, ती कमालीची प्रेशरमध्ये असते. वीस पंचवीस वर्ष आई-वडिलांनी सांभाळल्यानंतर आता आपल्याला नवीन माणसांसोबत नवे आयुष्य सुरू करावं लागणार असल्याने, याची देखील चिंता तिला सतावत असते.
सहाजिकच पुरुष म्हणून तुम्ही, पहिल्या रात्री लैंगिक संबंधांचा विचार करत असाल, मात्र पत्नीला याच्यापेक्षा जास्त मी या घरात सूट होते की नाही? याची चिंता जास्त असते. आणि म्हणून, पहिल्या रात्री तुम्ही लैंगिक संबंधांपेक्षा तिला हे घर तुझ्यासाठी नवीन नाही. पूर्वीसारखचं या घरात तुला स्वातंत्र्य मिळेल, त्याची पती म्हणून, मी पूर्णपणे जबाबदारी, काळजी घेईन. असं बोलून तुम्ही तिच्यावर अनेक गोष्टींचा असणारा प्रेशर कमी करणे, अत्यंत गरजेचं असतं. ही दोन वाक्य तुम्हाला तिच्या नजरेत खूप महान बनवू शकतात. हे तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्री कदापिही विसरता कामा नये.
लग्नाअगोदर जर तुम्ही लैंगिक संबंध केले असतील, तर या विषयी तुम्हाला फारसं कुतूहल वाटणार नाही. मात्र जर लग्नाची पहिली रात्र हीच तुमच्या आयुष्यातला पहिला लैंगिक संबंध असेल तर, मात्र तुम्ही अधिक सावध असणं गरजेचे आहे. कारण इतर गोष्टींपेक्षा तुम्ही त्याच गोष्टीला अधिक महत्त्व देऊन तुमच्याकडून काही चुकीच्या गोष्टी देखील घडण्याची शक्यता असते. कुतूहलामुळे अनेकदा पुरूष चुका करण्याची दाट शक्यता असते. ज्याची तुमच्या पत्नीला बिलकुलही अपेक्षा नसते. आणि यामुळे तुमच्या लग्नाची रात्र खराब देखील होऊ शकते. जर तुम्हाला आपल्या लग्नाची पहिली रात्र अविस्मरणीय व्हावी असं वाटत असेल, तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
अनेकांना वाटत असेल, लव मॅरेज असलं की पत्नीला या गोष्टीचा काही फरक पडत नसेल, मात्र हे खरं नाही. ‘लव्ह मॅरेज’ असो किंवा अरेंज्ड मॅरेज’, लग्नाची पहिली रात्र ही महिलांसाठी नवीन आव्हानं घेऊन येणारी असते. त्यामुळे ती लैंगिक संबंधांपेक्षा जास्त लग्नानंतर, तिला पुढे येणाऱ्या अनेक अडचणींचा विचार करत असते. आणि बरोबर तुम्हाला हीच बाब लक्षात घेऊन, तिला विश्वासात घेण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे लग्ना अगोदर तुला स्वातंत्र्य होतं, तसेच स्वातंत्र्य तुला या घरात देखील मिळणार असल्याचा विश्वास तुम्ही तिला दिल्यानंतर उर्वरित रात्र तुमची अविस्मरणीय होईल यात शंका नाही.
लग्न झाल्यानंतर पत्नी आपला नवरा कसा दिसतो, यापेक्षा ती लग्नानंतर आपल्याला तो स्वातंत्र्य देणार आहे की, नाही?समजून घेणार आहे की नाही? घरात सगळे समजून घेणार आहेत की नाही? यात अधीक रस असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे तुम्ही कसे दिसताय, याचा अजिबात विचार न करता, तुम्ही अधिक आत्मविश्वासाने समोर जाणं महत्वाचं आहे. आपल्या पत्नीला इम्प्रेस करण्याच्या नादात अजिबात पडू नका. तुम्ही जसे आहात तसेच आत्मविश्वासाने, नैसर्गिकरित्या समोर जा, आणि आपल्या अर्धांगिनीला विश्वासात घ्या. लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही याकडे जास्त भर द्या, म्हणजे मग लग्नाची पहिली रात्र तुमची अविस्मरणीय रात्र होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
हे देखील वाचा ‘या’ कारणामुळे खतांच्या किंमती दुप्पट वाढल्या; दुप्पट किंमत मोजूनही आता मिळणार नाही खत, वाचा सविस्तर…
चित्ता आणि सिंहाची झाली कुत्र्यासारखी अवस्था; व्हायरल झालेले दोन्हीं व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले..
रेल्वे स्टेशनवर जोडप्याचा हजारो लोकांसमोर इम्रान हाश्मी स्टाईल कीस; व्हिडिओ व्हायरल..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम