AFG vs IND 1St T20 match: T20 सिरीजमध्ये या दोन गोष्टी सुधारा, अन्यथा T20 सोडा; विराट, रोहितला BCCI कडून शेवटची संधी..
AFG vs IND 1St T20 match: उद्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील तीन t20 सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. मोहलीच्या मैदानावर उद्या पहिला सामना खेळवण्यात येणार असून, या सामन्याकडे अनेक क्रिकेट विश्लेषक आणि चाहत्यांचेही लक्ष लागलं आहे. विराट कोहली (Virat kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांचाही टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये कमबॅक होत असल्याने, या मालिकेला विशेष महत्त्व आहे.
2022 मध्ये झालेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकानंतर यापुढे T20 संघाचे नेतृत्व तुझ्याकडे देण्यात येणार असल्याचे हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) बीसीसीआयकडून सुचित करण्यात आलं होतं. मात्र आता BCCI ने अचानक यूटर्न घेतला आहे. टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दृष्टीने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat kilohli) सोबत बीसीसीआयने चर्चा केली आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या t20 सिरीजमध्ये दोघांनाही दोन चुका सुधारण्याची शेवटची संधी देखील देण्यात आल्याची माहिती आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रोहित शर्माचा t20 फॉर्म प्रचंड खराब राहिला आहे. 2021आणि 2022 या दोन्ही t20 विश्वचषकात रोहित शर्मा सपशेल अपयशी ठरला आहे. याशिवाय रोहित शर्माला गेले तीन सीजन आयपीएलमध्ये देखील फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. नुकत्याच पार पडलेल्या 50 षटकाच्या विश्वचषकामध्ये रोहित शर्माने खेळण्याचा अप्रोच बदलला. ज्याच्या जोरावर रोहित शर्माला t20 क्रिकेटमध्ये आणखी एक संधी देण्यात आली आहे.
विराट कोहलीने मात्र t20 मध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन केलं आहे. 2022 मध्ये झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने मॅन ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर झालेल्या आयपीएलमध्ये देखील विराटने लगातार दोन शतकेही झळकावली होती. विराट कोहलीचे T20 आकडे देखील दमदार असल्यामुळे, त्याला बाहेर करणं सोप्पं नव्हते. मात्र स्पिन गोलंदाजी करताना विराट कोहलीचा स्ट्राईक रेट फारसा चांगला नाही.
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड करण्यात आली. मात्र हा निर्णय घेत असताना दोघांच्याही खेळाविषयी BCCI कडून काही प्रश्न उपस्थित केले. टी ट्वेंटी विश्वचषक खेळायचा असेल, तर स्पिन गोलंदाजाविरुद्ध आक्रमक खेळ करावा लागेल. असे विराट कोहलीला सुचित करण्यात आले. तर दुसरीकडे रोहित शर्माला t20 फॉर्मेटमध्ये आक्रमक धावा कराव्या लागतील. असे देखील सांगण्यात आल्याची माहिती आहे.
विराट कोहलीचा टी ट्वेंटी करिअर स्ट्राईक रेट 140 च्या आसपास आहे. मात्र स्पिन गोलंदाजी खेळताना हा स्ट्राईक रेट 110 च्या आसपास होतो. याच मुद्द्यावर विराट कोहली सोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मधल्या षटकात स्पिन गोलंदाजी खेळताना विराट कोहलीला आक्रमक खेळ करावा लागेल, असं सांगण्यात आलं आहे. अफगाणिस्तानकडे दमदार स्पिन गोलंदाज असल्याने, विराट कोहली कसा खेळतो, यावर त्याचे टी ट्वेंटी करिअर अवलंबून असणार आहे. दुसरीकडे रोहित शर्माला देखील टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळायचा असेल, तर अफगाणिस्तान सिरीजमध्ये दमदार आणि आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे.
हे देखील वाचा Ishan Kishan BCCI: होय BCCI ला गंडवल्यामुळे इशान किशनला दाखवला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या ते प्रकरण..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम