Weight loss in winter: त्या कारणामुळे हिवाळ्यात वाढते वजन; हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी फक्त करा हे काम..
Weight loss in winter: धावपळीच्या या जीवनात अलीकडे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवताना पाहायला मिळतात. वाढतं वजन ही गंभीर समस्या आहे. वाढत्या वजनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या देखील निर्माण होतात. लठ्ठपणा केवळ तुमचे सौंदर्यच संपुष्टात आणत नाही, तर तुमचे आयुष्य देखील कमी करतो. त्यामुळे वजन वाढायला सुरुवात होताच, तुम्ही वेळेतच सावधान होणे आवश्यक आहे.
इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळा अनेकांना आवडतो. मात्र हिवाळ्यात वजन वाढण्याच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त असतात. हिवाळा चालू होण्यापूर्वी आणि हिवाळा संपल्यानंतर, जर तुम्ही तुमचं वजन केलं, तर तुम्हाला धक्का बसतो. कारण तुमचं वजन पाच-सहा किलो वाढलेलं असतं. हिवाळ्यामध्ये वजन वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे, या ऋतूमध्ये अन्न पचायला उशीर लागतो.
हिवाळ्यामध्ये कॅलरीज बर्न व्हायला उशीर लागतो. हे देखील वजन वाढण्याचं मुख्य कारण आहे. थंडीमुळे अनेक वेळा आपण पाणी कमी पितो. पाणी अधिक पिल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. जास्त पाणी पिण्याने शरीर हायड्रेट राहण्यासही मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात देखील आपण अधिक प्रमाणात पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
हिवाळ्यामध्ये साहजिकच थंड मोठ्या प्रमाणात असते. शरीर उबदार ठेवण्यासाठी आपण चहा देखील मोठ्या प्रमाणात पितो. चहामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट्स असतात. त्यामुळे देखील वजन वाढते. तुम्हाला वजन कमी करायचं असेल, किंवा नियंत्रणात ठेवायचं असेल, तर हिवाळ्यात आहारांमध्ये फळांचा समावेश करणे फार आवश्यक आहे. हिवाळ्यामध्ये आठवड्यातून चार वेळा तुम्ही कार्डिओ व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.
हिवाळ्यामध्ये तळलेले पदार्थ खाल्ले तरी देखील ते पचायला अधिक कठीण जातात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये नेहमी हलका आहार घेण्याचा प्रयत्न करा. हिवाळ्यात थंडीमुळे अनेकदा आपण बाहेर जाणं टाळतो. त्यामुळे शहराची हालचाल देखील कमी होते. हिवाळ्यामध्ये वजन वाढण्याला हे देखील महत्त्वाचं कारण आहे.
हे देखील वाचा Anushka Sharma pregnancy: या महिन्यात होणार ज्युनिअर विराटचं आगमन; अनुष्काने व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती..
Rohit Sharma In CSK: दिल्लीच्या पदरी निराशा! रोहित आता चेन्नई कडून खेळणार? चेन्नईकडून खुलासा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम