Indian cricket team head coach: मोठी बातमी! मुंबईकर Amol Muzumdar भारतीय क्रिकेट टीमच्या कोच पदी विराजमान..

0

Indian cricket team head coach: विश्वचषक 2023 मध्ये (World Cup 2023) भारतीय क्रिकेट संघ दमदार कामगिरी करत आहे. आतापर्यंत पाच सामन्यात पाच विजय मिळवत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातखाली भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. अशातच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईकर आणि माजी खेळाडू अमोल मुजुमदार (amol mujumdar) यांची मुख्य कोच पदावर वर्णी लागली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदकाची कमाई केली होती. भारतीय पुरुष संघाप्रमाणे भारतीय महिलाचा संघ देखील दमदार खेळाचे प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय महिला संघाने दमदार खेळ करत अनेक महत्त्वाचे सामने जिंकले आहेत.

भारतीय महिला संघाला देखील आता पुरुषाइतकेच मानधन देण्याचा मोठा निर्णय बीसीसीआयने घेतला. भारतीय महिला क्रिकेटसाठी आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून, ओळख असणाऱ्या, माजी फलंदाज अमोल मुजुमदार यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख कोच पदी निवड झाली आहे.

बीसीसीआयच्या सल्लागार समितीने अमोल मुजुमदार या नावाला पसंती दिली. सल्लागार समितीमध्ये सुलक्षणा नाईक, जतिन परांजपे, अशोक मल्होत्रा आहेत. या पदासाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीद्वारे फर्स्ट क्लास क्रिकेटचा रेकॉर्ड, अनुभव, या सगळ्या गोष्टीचा विचार करून अमोल मुजुमदार यांची निवड करण्यात आली.

करिअर

अमोल मुजुमदार हे तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखले जायचे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी तब्बल 11 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेटचा मुख्य कोच पदी अमोल मुजुमदार यांची निवड केल्यानंतर, त्यांनी बीसीसीआयचे आभार मानले. माझ्या स्वप्नाबद्दल बीसीसीआयने माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल आभारी आहे. खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक असल्याचे ते म्हणाले.

हे देखील वाचा UT69 : राज कुंद्रा शिल्पा शेट्टी खरंच वेगळे झालेत? झाला मोठा खुलासा..

IND vs ENG: हार्दिक पांड्याच्या दुखपतीविषयी मोठी अपडेट; इंग्लंड विरुद्ध खेळणार की नाही? Playing 11 झाली स्पष्ट..

Shikhar Dhawan video: शिखर धवनला आला पत्नीचा फोन; रडत माफी मागत म्हणाली..; धवनने व्हिडीओही केला शेअर..

Sexual relationship : संबंधासाठी ही वेळ आहे घातक; जाणून घ्या कारण आणि संबंधाची योग्य वेळ..

PAK vs AFG: पाकिस्तानच्या पराभवामुळे सेमी फायनलचे गणित झाले स्पष्ट; भारत, न्युझीलंड आफ्रिका नंतर हा संघ पोहचणार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.