Jaggery Purity : तुम्ही खरेदी करत असलेला गूळ भेसळयुक्त आहे की नाही हे कसं ओळखाल? घ्या जाणून..
Jaggery Purity : साखरेपेक्षा गुळ अधिक पौष्टिक आहे. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र इकडे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त गूळ (Jaggery) विक्री केला जातो. त्यामुळे पौष्टिक गूळ खरेदी करण्याचे अनेकांपुढे मोठं आव्हान असतं. जर तुम्हाला देखील या समस्येपासून सुटकारा मिळवायचा असेल, तर आम्ही तुम्हाला भेसळयुक्त गूळ कसा ओळखायचा या विषयी माहिती देणार आहोत.
पौष्टिक गुळाच्या नावाखाली भेसळ गुळाची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हा भेसळयुक्त गूळ आपल्या शरीरासाठी प्रचंड घातक असून, यामुळे आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. जर तुमच्याही घरात गुळाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असेल, तर तुम्हाला पौष्टिक गूळ आणि भेसोयुक्त गूळ यातील फरक माहीत असणे, फार आवश्यक आहे.
गुळामध्ये हे पदार्थ मिसळतात
गूळ आपल्या शरीराला डिटॉक्स ठेवण्यास मदत करत असतो. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, झिंक, व्हिटॅमिन बी, प्रथिने यासारखे अनेक पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात. गुळामध्ये उष्णता असल्याने, त्याला हिवाळ्यामध्ये अधिक मागणी असते.
बनावट गुळामध्ये कॅल्शियम कार्बोनेट त्याचबरोबर सोडियम बायकार्बोनेट इत्यादी घटक मोठ्या प्रमाणात मिसळतात. ज्यामुळे आपल्याला पौष्टिक आणि भेसळयुक्त गुळामधील फरक समजत नाही. मात्र गुळामध्ये मिसळलेले हे घटक माणसाच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असतात.
बाजार मधून गूळ खरेदी करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा गुळ लाल हा गडद तपकिरी, लाल रंगाचा असेल तरच खरेदी करा. जर तुम्ही पिवळा किंवा हलका सोनेरी रंग असलेला गूळ खरेदी करत असाल, तर तो बनावट गूळ असण्याची दाट शक्यता आहे. गुळ हा उसाचा रस उकळून बनवला जातो. हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे त्यात रासायनिक बदल होऊन गुळाला लाल किंवा तपकिरी रंग चढतो.
हे देखील वाचा WC 2023 semi final scenario: भारत, न्युझीलंड नंतर तिसरा semifinalist मिळाला; इंग्लंडला किती संधी? वाचा सविस्तर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम