Manoj jarange: जे बोलायचंय ते मोठ्याने बोला, कानात कुजबूज कराल तर…; जरांगेंनी भाजपच्या नेत्याला भरला दम, व्हिडिओ तुफान व्हायरल..

0

Manoj jarange: जालन्यात पोलिसांनी (Jalna police) अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केल्यानंतर, संपूर्ण महाराष्ट्रभर आता मराठा (Maratha aarkshn) समाज एकवटला आहे. जालन्यात सुरू असलेले मनोज जरांगे यांचे अन्नत्याग उपोषण (manoj jarange uposhan) मागे घेण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र सरकारला हे आंदोलन पाठीमागे घेण्यासाठी यश येत नसल्याचं दिसत आहे.

गिरीश महाजन (Girish Mahajan) अर्जुन खोतकर (Arjun khotkar) संदिपान भुमरे मनोज जरांगे पाटलांची मनधरणी करण्यासाठी आंदोलनस्थळी पोहचले. कुठल्याही परिस्थितीत अध्यादेश काढल्याशिवाय हे उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचा निश्चय मनोज जरांगे पाटलांनी घेतला आहे. अध्यादेश काढण्यासाठी सरकारला मनोज जारंगे यांनी पाच दिवसाची मुदत दिली आहे. पाच दिवस झाल्यानंतर, मी पाण्याचा एक थेंबही पिणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकार हतबल झाल्याचं दिसत आहे. सरकारच्या वतीने गिरीश महाजन, अर्जुन खोतकर, संदिपान भुंमरे जरांगे पाटलांची मनधरणी करण्यासाठी गेले होते. मात्र जरांगे पाटील यांनी या तिघांना चांगलाच दम दिला. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे या आंदोलनाला अधिक धार प्राप्त झाली. त्यातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला असल्याचे विधान केल्याने, प्रकरण आणखीन चिघळले. पोलिसांच्या अमानुष लाठीचार्ज आणि देवेंद्र फडणीस यांच्या विधानामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटलाय. फक्त मराठाच नाही, तर इतर जातीच्या लोकांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

जरांगे पाटलांचं हे आंदोलन पाठीमागे घेतल्याशिवाय महाराष्ट्र शांत होणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर, सरकारचे आता आंदोलन मागे घेण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गिरीश महाजन, अर्जुन खोतकर, जरांगे पाटलांशी चर्चा करत होते. या चर्चेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अर्जुन खोतकर गिरीश महाजन जरांगे पाटलांशी बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले, जे बोलायचे ते मोठ्याने बोला कानात अजिबात कुजबूज करू नका. माझे कार्यकर्ते येऊ द्या. समजवायला गेलेल्या गिरीश महाजनांवर जरांगे पाटील चांगलेच संपल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. पुढे ते म्हणाले, माझे कार्यकर्ते येऊ द्या. मग आपण चर्चा करू. कानात कुजबूज केल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो. आपण बाहेर जाऊन चहा पिऊ अर्जुन खोतकर यांच्या या वाक्यावर जरांगे पाटील आणखीन चिडले.

हे देखील वाचा Viral video: पाणी म्हणून चित्ता प्यायला भट्टीतली दारू; चीत्यासोबत गावकऱ्यांनी केले अमानुष कृत्य, पाहा व्हिडिओ..

India Squad For ODI World Cup 2023: या तीन खेळाडूंना मिळाला डच्चू; असा आहे वर्ल्ड कपसाठी भारताचा पंधरा सदस्यीय संघ..

PAK vs IND: या दिवशी पुन्हा रंगणार भारत पाकिस्तान थरार; पाकिस्तान विरुद्ध केएल राहुल परतणार, या खेळाडूचा जाणार बळी..

Acharya Chanakya Niti: ..म्हणून सुंदर मुलीशी चुकूनही लग्न करू नका; चाणक्यांनी सांगितलेल्या त्या तीन गोष्टी प्रत्येकाला माहिती असायलाच हव्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.