Chanakya Niti on husband wife: चाणक्यांनी सांगितलेकी ही धोरणे पाळा; पती-पत्नीमध्ये वाद होणारही नाही..
Chanakya Niti on husband wife: अलीकडे पती-पत्नीचा (husband wife) वाद हा गंभीर समस्या बनली आहे. नवीन लग्न झालेले जोडपे देखील एकमेकांसोबत टोकाचा वाद घालताना पाहायला मिळतात. आजच्या युगात पती-पत्नी समोर आनंदी आणि समाधानी राहणं, हे खूप मोठं आव्हान आहे. जर तुम्हाला देखील पती पत्नीच्या वादाला सामोर जावं लागत असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आचार्य चाणक्यांनी (Acharya Chanakya) सांगितलेल्या नीती (Chanakya Niti) मूल्याचा वापर केला तर तुमचे वैवाहिक जीवन सुखकर होऊ शकतं. (Chanakya Niti on husband wife)
चाणक्य हे थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषयांसंदर्भात तत्वे आणि मूल्य सांगितली आहेत. व्यवहार, नातेसंबंध, चारित्र्य, सामाजिक दृष्टिकोन, या सगळ्या गोष्टींवर त्यांनी चाणक्य नीति या ग्रंथाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवनाविषयी देखील आपली मूल्य आणि तत्वे सांगितली आहेत. जाणून घेऊया, आचार्य चाणक्यांनी सांगितलेली मूल्य आणि तत्वे..
जर तुम्ही विवाहित असाल, आणि तुमच्या घरात देखील वाद होत असतील, खास करून पती-पत्नी दोघांमध्ये वाद होत असतील तर, तुम्हाला फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. पती-पत्नीचे वाद हे अलीकडे प्रत्येक घरात होत असतात. या वाद विवादावर तुम्हा स्वता:लाच तोडगा काढून वैवाहिक जीवनाचा गाडा चालवणे आवश्यक असते. आचार्य चाणक्य म्हणतात,
कोणतंही नातं असो, तुम्हाला तुमच्यावर कंट्रोल ठेवता आला पाहिजे. भांडण सुरू असताना, तुम्ही काय बोलणं पाहिजे, काय नको, या गोष्टींचे भान तुम्हाला असणे आवश्यक असते. पती-पत्नी दोघांचे भांडण असताना, तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येणे फार आवश्यक असते. जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाला तर तुम्ही यशस्वी होता. असं आचार्य चाणक्य सांगतात.
कोणतेही क्षेत्र असो, नातं कोणतेही असो, संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला किनारा गाठता येणार नाही. माणसाच्या आयुष्यात संघर्ष हा प्रत्येकालाच असतोच. मात्र तुम्ही संघर्ष न करता हार मानत असाल, तर तुम्ही कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकत नाही, खास करून पती-पत्नीच्या नात्यांमध्ये तुम्हाला संघर्ष करूनच वाद मिटवावे लागतात. नात्यांमध्ये अधिक जास्त सुसंवाद ठेवणे महत्वाचे असते.
वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीचा वाद हा बऱ्याचदा दोघांकडेही पुष्कळ वेळ असल्याने होतो. दोघांनीही जर आपले उद्दिष्ट सेट केले तर वाद व्हायला संधी मिळत नाही. दोघांनीही आपापले काम व्यवस्थित करण्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं, त्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली, तर वाद खूप कमी वेळा होतो. वाद झाला तरी कामात रमल्याने दोघांचाही राग शांत होतो. असं आचार्य चाणक्य सांगतात.
सभोवतालचे वातावरण आणि काळानुसार तुम्हाला बदलावे लागते. आयुष्य जगत असताना तुम्ही दररोज नवीन नवीन गोष्टी शिकण्यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणे आवश्यक असतं. तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत गेल्याने पती-पत्नी दोघेही आपली प्रायोरिटी नवीन ज्ञान अवगत करण्यासाठी देतात. साहजिकच त्यामुळे वादला दोघेही फारसं महत्त्व देत नाहीत.
हे देखील वाचा Jio recharge Plans: जियोचे दोन भन्नाट प्लॅन! Netflix चे Subscription मोफत आणि 3GB डेटा प्रतिदिन..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम