ICC world Cup 2023: कर्णधार चांगला असाल तरी वर्ल्ड कप जिंकण्याचं गणित वेगळं; युवराजने थेट टीमच्या वर्मावरच बोट ठेवलं..
ICC world Cup 2023: भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंगची (Yuvraj Singh) टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात प्रमुख भूमिका होती. 2011 च्या विश्वचषकात युवराज सिंगला मालिकावीर पुरस्कार देखील मिळाला होता. पत्रकार इंद्रनील बासू यांना युवराज सिंगने (Yuvraj Singh) नुकतीच एक मुलाखत दिली. ज्यामध्ये त्याने कर्णधार चांगला असून, काहीही उपयोग नाही, मोठ्या टूर्नामेंट जिकण्याचे गणित वेगळे असल्याचे मत नोंदवत निवड समिती आणि बीसीसीआयला धारेवर धरलं आहे. सध्या युवराज सिंगच्या मुलाखतीची जोरदार चर्चा रंगत आहे.
ऑक्टोंबर पासून एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होत आहे. 5 ऑक्टोंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पार पडणाऱ्या विश्वचषकाची प्रतीक्षा आता सगळ्यांना लागली आहे. विश्वचषक भारतात होणार असल्याने भारत या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात असला, तरी युवराज सिंगने सिलेक्शन कमिटी आणि BCCI वर टीका केली आहे.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टसीमध्ये भारताने अद्याप आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही, रोहित शर्माच्या कॅप्टनसी विषयी काय वाटतं? हा प्रश्न युवराज सिंगला विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना युवराज म्हणाला, कॅप्टन कितीही चांगला असून चालत नाही. तुम्ही त्याला चांगली टीम दिली नाही, तर तो काहीही करू शकणार नाही. रोहित शर्मा हा चांगला कॅप्टन आहे. तो संयमी आहे. संघ दबावात असताना परिस्थिती कशी हाताळायची, याविषयी देखील तो ज्ञात आहे.
महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh dhoni) कॅप्टन चांगला होता. मात्र त्याच्याकडे टीम देखील चांगली होती. भारताने 2011 साली जिंकलेल्या विश्वचषकामध्ये हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, जहीर खान सारखे मॅच विनर खेळाडू धोनीकडे होते. या सर्वांनी 2011 पूर्वी काही विश्वचषक देखील खेळले होते. शिवाय 60-70 एकदिवसीय सामन्या पेक्षा जास्त सामनेही खेळले होते.
युवराज सिंग पुढे बोलताना म्हणाला, यावेळीचा संघ मला समतोल वाटत नाही भारतीय संघाला अजूनही चार आणि पाच क्रमांकाचा खेळाडू शोधायचा आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे दोन्ही खेळाडू दुखापतीतून परतणार की नाही, हे मला माहिती नाही. परतणार असतील तर तर त्यांचा फॉर्म कसा आहे, हे पाहणं देखील महत्त्वाचं असल्याचं युवराज म्हणाला.
रोहित शर्मा कॅप्टन चांगला आहे, मात्र निवड समितीने त्याला एक चांगली टीम देणे आवश्यक आहे. एकीइकडे युवराजने अशी मागणी केली असली तरी दुसरीकडे तो म्हणाला, आपल्याकडे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा खेळाडू कोण असेल हे स्पष्ट झालं नाही. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूंना त्याच क्रमांकावर किमान 50 ते 60 एकदिवशी सामने खेळण्याचा अनुभव असायला हवा. युवराज सिंगने एक प्रकारे बीसीसीआय आणि निवड समितीवर टीका करत टीम इंडियाच्या वर्मावर बोट ठेवलं आहे.
हे देखील वाचा India Post GDS Recruitment 2023: या उमेदवारांसाठी भारतीय टपाल खात्यात 30041 जागांची मेगा भरती; असा करा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम