Jio laptop: Jio ने लॉन्च केला जबरदस्त फीचर्स असणारा लॅपटॉप; किंमत केवळ..
Jio laptop: रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर, अनेक टेलिकॉम कंपन्यांचा अक्षरशः बाजार उठला. जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वर्षभर अनलिमिटेड डाटा आणि कॉलिंगची सुविधा मोफत दिली. मोबाईल निर्मिती बरोबरच लॅपटॉप निर्मितीकडे देखील आता Jio ने आपले लक्ष केंद्रित केलं आहे. जिओने आपला पहिला लॅपटॉप लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे Jio च्या लॅपटॉपची किंमत केवळ 16 हजार रुपये असल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. जाणून घ्या सविस्तर.
रिलायन्स कंपनीने लॉन्च केलेला JioBook लॅपटॉप हा JioOS द्वारे समर्थित आहे. खासकरून हा लॅपटॉप ४ जी डिव्हाइस विद्यार्थ्यां करिता बनवण्यात आला आहे. जिओबुक हा लॅपटॉप मॅट फिनिश असल्याने, हा लॅपटॉप प्रचंड आकर्षक दिसतो. विशेष म्हणजे, या लॅपटॉपचे वजन केवळ 990 ग्रॅम आहे.
जिओने लॉन्च केलेल्या या लॅपटॉपची पावर देखील दमदार देण्यात आली आहे. प्रोसेसर देखील दमदार देण्यात आला आहे. सोबतच 16.6 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. Jio च्या या लॅपटॉप प्रोसेसर विषयी अधिक सांगायचे झाल्यास, MediaTek MT 8788 असा या लॅपटॉपला प्रोसेसर देण्यात आला आहे.
जिओबुक लॅपटॉपचे स्टोरेज देखील उत्तम आहे. 4GB रॅम तसेच 64GB स्टोरेजसह हा लॅपटॉप jio ने बाजारात उतरवला आहे. सोबतच मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या साह्याने तुम्ही या लॅपटॉपचे स्टोरेज 256 GB पर्यंत वाढवू देखील शकता. जियोने लॉन्च केलेला हा लॅपटॉप वायरलेस स्कॅनिंग त्याचबरोबर प्रिंटरला देखील सपोर्ट करतो.
जियोच्या या लॅपटॉप विषयी अधिक जाणून घ्यायचे झाल्यास या लॅपटॉपला दोन यूएसबी पोर्ट, त्याचबरोबर एचडीएमआय पोर्ट, ब्लूटूथ 5.0 अशा सुविधा मिळणार आहेत. सोबतच एक हेडफोन जॅक देखील तुम्हाला या लॅपटॉप बरोबर येणार आहे. 4G ड्युअल बँड Wi-Fi तुम्हाला मिळतो.
या लॅपटॉपकडे आकर्षित करणारी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, या लॅपटॉपची किंमत केवळ 16499 रुपये ठेवण्यात आली आहे. जिओचा हा लॅपटॉप उद्यापासून ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन ई-कॉमर्स वेबसाईटवर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
हे देखील वाचा PM Kisan 14th installment: अजूनही 14 व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत? केवळ करा हे काम, झटक्यात येतील पैसे..
Face fat burning: तुमचाही चेहरा सुजलेला दिसतो? फॉलो करा या चार टिप्स चेहऱ्याची चरबी होईल गायब..
Smartphone Under 15k: 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या दमदार स्मार्टफोनची पाहा ही यादी..
Chanakya quotes: पत्नीचा हे दोन अवगुण माणसाला उठवतात समाजातून..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम