Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचा विचार करताय? जाणून घ्या कमी किंमतीत मिळणाऱ्या या चार दमदार इलेक्ट्रिक स्कूटर..

0

Electric Scooter: इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने, अनेक जण आता इलेक्ट्रिक वाहनांकडे (electric vehicles) वळला आहे. जर तुम्ही देखील इलेक्ट्रिक स्कूटर (electric Scooter) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती जास्त असल्याने अनेकजण इंधनाचे खूप जास्त असले तरीदेखील नाईलाजाने इंधनाच्या वाहनांचाच वापर करतात. मात्र आता तुम्हाला कमी किमतीत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची मोठी संधी आहे. (Electric Scooter)

जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, आणि तुमचं बजेट एक लाख रुपयाच्या आसपास आहे, तर चीता सोडा. कारण आम्ही तुमच्यासाठी अशा चार इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन आलो आहोत, ज्या खूप फायदेशीर आहेत आणि किंमतही कमी आहे. अनेकांना परवडणाऱ्या आणि चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटर विषयी माहिती मिळत नाही. आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर विषयी माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया अधिक..

Hero Electric Optima 

हिरो मोटर कंपनीने अक्षरशः ग्राहकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. कमी किमती बरोबर दर्जेदार गाड्यांच्या निर्मितीमुळे आपली एक वेगळी ओळख भारतीय ग्राहकांच्या मनात हिरोने कमावली आहे. आणि म्हणून या कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर देखील तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. Hero Electric Optima HX असं या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. किमती विषयी सांगायचे झाल्यास, या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत केवळ 67 हजार 190 रुपये ठेवण्यात आली.

Okaya EV-

Okaya EV या कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर देखील एक लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर आहे. Okaya F2F असं या स्कूटरचं नाव आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 83 हजार 999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तुम्हाला ही स्कूटर 6 कलरमध्ये खरेदी करता येते. एकदा चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 80 किमीचा प्रवास पूर्ण करते. महत्वाचं म्हणजे, एका तासात ही स्कूटर 55 किमीचा टप्पा पूर्ण करते. तसेच केवळ चार तासात या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी पूर्ण चार्ज होते.

Okinawa Praise Pro

Okinawa Praise Pro ही इलेक्ट्रिक स्कूटर देखील दमदार आहे. गेल्या वर्षभरात या गाडीची विक्रमी विक्री झाली आहे. या स्कूटरची किंमत 99 हजार 645 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एका तास साथ ही इलेक्ट्रिक स्कूटर 60 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. एका चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल 88 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. तसेच बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ पाच तास कालावधी लागतो.

Lectrix EV LXS

Lectrix EV LXS ही इलेक्ट्रिक स्कूटर देखील दमदार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत थोडीशी जास्त आहे. मात्र गाडी दमदार आहे. 91 हजार 253 रुपये खर्च केल्यानंतर तुम्हाला स्कूटर खरेदी करता येणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी 89 किमी प्रवास पूर्ण करते. Lectrix ही इलेक्ट्रिक स्कूटर एका तासात 50 किलोमिटरचा टप्पा पूर्ण करते. या स्कूटरची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ तीन तासाचा कालावधी लागतो.

हे देखील वाचा India vs West Indies 1st T20I: यशस्वी, टिलक वर्माचा संघात समावेश; असा आहे पहिल्या टी-20 साठी भारतीय संघ..

Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

Sexual health Tips: संबंधानंतर तो अवयव दुखतो, आग, जळजळ होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय..

Chanakya Niti: म्हणून या पुरुषांसाठी महिला काहीही करायला असतात तयार..

PM Kisan: अजूनही 14 वा हप्ता जमा झाला नाही? मग करा या हेल्पलाईन नंबरवर कॉल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.