Ajit Pawar: ब्रेकिंग न्यूज! त्याचमुळे अजित पवारांनी आज अचानक रद्द केले सर्व कार्यक्रम; राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ..

0

Ajit Pawar: गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (ajit Pawar) भाजप (BJP) सोबत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एकीकडे वज्रमूठ सभांमधून महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करत आहे. तर दुसरीकडे अजित पवार भाजप सोबत हात मिळवणी करणार असून, या संदर्भातील बोलणी देखील सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार अचानक नॉटरीचेबल होऊन दिल्लीमध्ये अमित शहांना भेटले. अशी बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली. आज आता पुन्हा अजित पवारांनी आपले सर्व कार्यक्रम अचानक रद्द केल्याने खळबळ उडाली आहे.

एखाद्या चित्रपटाच्या कथेला देखील लाजवेल अशा, घटना 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने घडताना पाहायला मिळत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं. मात्र तत्पूर्वी अजित पवार यांनी भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यासोबत शपथविधी देखील केला. महाविकास आघाडी सरकार स्थापन व्हायच्या अगोदर अजित पवारांनी भाजप सोबत सरकार स्थापन करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे सरकार 48 तास टिकले.

शरद पवारांनीही दिले संकेत

मात्र आता पुन्हा अजित पवार भाजप सोबत जाणार असून, मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे देखील आता राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. चार दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) शरद पवार (Sharad Pawar) यांना घरी जाऊन भेटले. या भेटीमध्ये राष्ट्रवादी आमदार आणि त्यांच्या घरच्यांवर आमच्या सोबत या असा दबाव भाजप टाकत असल्याचं शरद पवार यांनी संजय राऊत यांना सांगितलं असं स्वतः संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

एवढेच नाही, तर शरद पवार यांना ज्यांना भाजप सोबत जायचं आहे. ते जाऊ शकतात, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार नाही. जर कोणाला राजकीय आत्महत्या करायची असेल, तर करू द्या, असे शरद पवार म्हटले. असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. याचा थेट अर्थ आता अजित पवार भाजप सोबत हात मिळवणी करणार असल्याशी जोडला जात आहे.

भाजपच्या सांगण्यावरूनच विरोधकांची चौकशी होते. हे आता काही लपून राहिले नाही. चौकशी पासून मुक्तता मिळावी, यासाठी आता राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि स्वतः अजित पवार भाजप सोबत सरकार स्थापन करणार असल्याचे चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहेत. अजित पवार अमित शहांना भेटल्याचे नाकारत असले, तरी या संदर्भातले वृत्त “इंडियन एक्सप्रेसने” दिले असल्याने, शंका घ्यायला वाव आहे.

प्रफुल्ल पटेल यांचेही मत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपसोबत सत्ता स्थापन करावी. अशी इच्छा प्रफुल्ल पटेल यांची देखील इच्छा असल्याची बातमी समोर आली आहे. मात्र शरद पवार यासाठी अनुकूल नाहीत. शरद पवारांनी भाजप सोबत सरकार स्थापन करण्यासाठी सहमती दर्शवावी. यासाठी अजित पवारांचा आग्रह आहे. आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार देखील बारामती दौऱ्यावर जाणार असल्यासची माहिती होती. मात्र अचानक त्यांनी दिवस भराचे सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईत थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवारांनी अचानक कार्यक्रम रद्द केल्याने आता पुन्हा एकदा अजित पवार आजच सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा देखील आता रंगल्या आहेत. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांच्या आपात्रेची टांगती आहे. सोळा आमदार अपात्र झाल्यानंतर हे सरकार कोसळू नये, यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. अशी माहिती आहे. आणि म्हणून अजित पवार यांना मुख्यमंत्री पद देऊ केलं असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

..म्हणूनच भाषणही केले नाही

काल नागपूरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत अजित पवारांनी भाषण करणे टाळलं. एवढेच नाही, तर माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार म्हणाले, सोळा आमदारा पात्र झाले तरी देखील भाजप सरकार कोसळणार नाही. अजित पवार यांनी नागपूरमध्ये झालेल्या सभेत भाषण करायला हवं होतं. राज्यातील जनता अजित पवार काय बोलणार? याकडे राज्याच्या जनतेचे लक्ष होतं. मात्र त्यांनी भाषण करणे टाळल्याने, अजित पवार भाजप सोबत जाणार, या चर्चा अधिक गडत झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

हे देखील वाचा RR vs GT: हार्दिक पांड्याने पुन्हा दाखवला माज, संजूशी असा भिडला; पाहा व्हिडिओ..

Jiocinema: अंबानींचा ग्राहकांना दणका! फ्री नंतर आता Jio Cinema पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे..

Ration Card: रेशन कार्ड धारकांच्या खात्यावर येऊ लागले पैसे; तुम्हीही घेऊ शकता लाभ, असा करा अर्ज..

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलंय? तर चिंता करू नका; दोन मिनिटात असं करा डाऊनलोड..

Second Hand Bike: नवी कोरी Hero HF Deluxe मिळतेय 25 हजारात, तर Hero passion Pro मिळतेय 30 हजारात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.