RCB vs LSG: ..म्हणून सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरने दिल्या शिव्या, विराट सोबतही केले…; पाहा दोन्हीं व्हिडिओ..
RCB vs LSG: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु royal (challengers Bangalore) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow super giants) या दोन संघात काल चिन्हस्वामी क्रिकेट स्टेडियमवर (chinnaswamy cricket stadium) आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील (IPL season 16) पंधरावा सामना खेळवण्यात आला. हाय स्कोरिंग मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केएल राहुलने घेतला. रंगतदार सामन्यांमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाने अखेरचा चेंडूवर एक धाव घेत रॉयल चॅलेंजर बंगलोर संघावर एक विकेट राखून विजय प्राप्त केला. (Gautam Gambhir viral video)
प्रथम फलंदाजी करताना आरसीबी (RCB) संघाने तब्बल 212धावांचा डोंगर उभारला. पुन्हा एकदा आरसीबी संघाच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. विराट कोहलीने (Virat kohli) चार चौकार आणि चार षटकारांच्या मततीने 44 चेंडूत 61 धावांची खेळी केली. कर्णधार डुप्लेसी (Faf du Plessis) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) डावाची सूत्रे आपला हातात घेत केवळ 50 चेंडूत 115 धावांची भागीदारी करत RCB संघाला 212 धावांचा डोंगर उभा करून दिला. ग्लेन मॅक्सवेलने 29 चेंडूत 59 तर कर्णधार डुप्लेसीने 46 चेंडूत 79 धावा केल्या.
213 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाची सुरुवात फारच निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात धोकादायक समजल्या जाणाऱ्या डावखुऱ्या काइल मेयर्सचा अडथळा सिराजने दूर केला. लखनऊ संघाची एकवेळ 4 षटकात तीन बाद 23 अशी दयनीय अवस्था झाली होती. मात्र मार्कस स्टॉइनिसने वादळी खेळी साकारली. त्याने अवघ्या 30 चेंडूत 65 धावांची केली करत या सामन्यात लखनऊ संघाला जिवंत ठेवले.
मार्कस स्टॉइनिसने (Marcus Stoinis) बाद झाल्यानंतर निकोलस पूरनने (Nicholas Pooran) डावाची सूत्रे आपला हातात घेत सामना जवळपास संपुष्टात आणला. त्याने 19 चेंडूत 62 धावांची वादळी खेळी केली. लखनऊ संघाला 18 चेंडूत 24 धावांची आवश्यकता असताना तो बाद झाला. आणि सामना पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे झुकला.
लखनऊ संघाला अखेरच्या षटकात पाच धावांची आवश्यकता होती. अखेरच्या षटकात हर्षल पटेलने लखनऊ संघाचे दोन फलंदाज बाद केले. मात्र रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. एका चेंडूत एका धावेची आवश्यकता असताना नॉन स्ट्राइकरवर असणाऱ्या रवी बिश्नोईला हर्षल पटेलने धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला.
Gautam Gambhir 😂😂😂🔥🔥#RCBvsLSG pic.twitter.com/12692zVhZn
— 𝗦𝗨𝗠𝗜𝗧 𝗦𝗜𝗡𝗛𝗔 (@BeingSumit007) April 10, 2023
या सामन्याची जितकी चर्चा रंगली, त्याहून अधिक चर्चा लखनऊ संघाने विजय संपादन केल्यानंतर गौतम गंभीरने केलेल्या सेलिब्रेशनची झाली. (Gautam Gambhir celebration) एका चेंडूत एका धावेची आवश्यकता असताना हर्षल पटेलने रवी बिश्नोईला मंकड करण्याचा प्रयत्न केला. सामना जिंकण्यासाठी अशा प्रकारे फलंदाजाला बाद करण्याची निती हर्षल पटेल आणि संघाने अवलंबल्यामुळे गौतम गंभीर प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळालं. आणि म्हणून विजय संपादन केल्यानंतर गौतम गंभीरने शिवी देखील दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#RCBvsLSG
Gautam Gambhir to the Chinnaswamy crowd after the match.pic.twitter.com/PrGOrB1Uny— 👌⭐👑 (@superking1815) April 10, 2023
विराटशी हस्तोदंलन
लखनऊ संघाने विजय संपादन केल्यानंतर, गौतम गंभीर मैदानामध्ये आला. विजयाचा आनंद साजरा करण्याबरोबरच त्याने अनेक खेळाडूंशी हस्तोदंलन केलं. गौतम गंभीरने मैदानात आल्यानंतर चाहत्यांकडे पाहून तोंडावर बोट ठेऊन गप्प बसण्याचा इशारा केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. याच व्हिडिओत विराट कोहलीशी हस्तोदंलन करताना देखील गंभीर पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा Shikhar Dhawan Viral video: पहिल्याच भेटीत प्रेम, लगेच हॉटेलमध्ये घेऊन गेलो..; शिखर धवनच्या त्या व्हिडिओने खळबळ..
Free Silai Machine Yojana: महिलांना मिळतेय मोफत शिलाई मशीन; या पध्दतीने करा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम