couple romance viral video: कपलचा बाईकवर जबरदस्त रोमान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल; पोरीचं कृत्य पाहून धराल डोकं..

0

couple romance viral video: सध्याच्या युगात प्रसिद्धीसाठी कोण काय करेल? याचा भरोसा राहिलेला नाही. त्यात सध्याची तरुणाई ही प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी काहीही करताना पाहायला मिळते. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी या तरुणाईला आपल्या खाजगी गोष्टी आपण किती सार्वजनिक करत आहोत, याचे कुठलेही भान राहत नसल्याचे पाहायला मिळते. आपल्या खाजगी गोष्टी ज्या चार भिंतीच्या आतमध्ये करणे आवश्यक आहे, त्याच गोष्टी रस्त्यावर करत असल्याने अनेकांचा संताप देखील होतो. मात्र याची कसलीही पर्वा या लोकांना नसते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. एक तरुणी तरुणासोबत नको ते चाळे करत असल्याचा हा व्हिडिओ आहे.

मागील वर्षी एक कपल रिक्षामध्ये रोमान्स करत असताना शेजारून जाणाऱ्या एका दुचाकी स्वराने त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले होते. त्यानंतर त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, छत्तीसगढ आणि लखनौ या दोन शहरांमधून देखील असेच दुचाकीवर रोमान्स करतानाचे व्हिडीओ समोर आले होते. हे व्हिडीओ समाजमाध्यमांवर आल्यानंतर नेटकऱ्यांनी या व्हिडिओना विशेष पसंती देऊन त्यांना चांगलेच डोक्यावर घेतले होते. कदाचित त्यामुळेच पुन्हा एकदा असा प्रकार करण्याचे धाडस या जोडप्यांनी केले आहे.

टू-व्हीलरवर रोमान्स करताना वायरल झालेल्या व्हिडिओत मुलगी मुलाच्या मांडीवर पुढे बसून प्रवास करताना पाहायला मिळत आहे. स्त्रियांमध्ये ती पाठीमागे वळून आपल्या पार्टनरला किस देखील करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ हरदाईच्या सीतापुर मधील असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे या कपलवर आजूबाजूचे लोक कमेंट देखील करत आहेत मात्र तरी देखील या दोघांना याचा काही फरक पडत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ, या कपलच्या बाजूने प्रवास करणाऱ्या काही लोकांनी चित्रित केला आहे. हा व्हिडिओ एका रिक्षा मधून चित्रित केला असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे टू व्हीलरचा वेग देखील प्रचंड होता. अशामध्ये दुर्घटना होण्याची शक्यता देखील अधिक होती. सुदैवाने दुर्घटना झाली नाही हा भाग वेगळा, मात्र अशा कृत्यामुळे बाईकवरचा ताबा देखील सुटण्याची शक्यता अधिक असते.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओ खाली कमेंट करताना अनेकांनी या जोडव्यांना जेरबंद करायला पाहिजे असा संताप व्यक्त केला. तर काही नेटकऱ्यांनी प्रेमाला मर्यादा नसतात, हे जोडपं देखील पक्षांप्रमाणे आपल्याच दुनियेत असल्याचा पाहायला मिळत आहे. या दोघांवर कारवाई करण्याची मागणी येत असून, पोलीस देखील या दोघांचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा Healthy Physical Life: सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर काय करायला हवं जाणून घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

Sexual Relationship Tips: तुमच्यामध्ये या गोष्टी होत नसतील तर समजून जा तुमचे लैंगिक आयुष्य आहे खूपच खराब..

Bajaj electric scooter: बजाज कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर मिळतेय अवघ्या 15 हजारांत; ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड..

Shikhar Dhawan: सॉरी आपलं लग्न होऊ शकत नाही.., हुमा कुरेशीने शिखर धवनला नकार दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..

Smartwatch: जबरदस्त फीचर्स असणारे हे स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर मिळतेय फक्त 1199 रुपयांमध्ये..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.