OnePlus: OnePlus चा तगडा स्मार्टफोन मिळतोय केवळ 13,500 रुपयांत; जाणून घ्या डिटेल्स..

0

OnePlus: स्मार्टफोन (smartphone) ही आता प्रत्येकांची प्राथमिक गरज बनली आहे. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांच्याच जगण्याचा भाग हा स्मार्ट फोन बनला आहे. त्यामुळे बाजारात स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यातच उत्तम कॅमेराचा, कमी बजेटचा स्मार्टफोन जर आपल्याला मिळत असेल, तर आपण नक्कीच त्याकडे धाव घेतो. हल्ली वनप्लसची खूप क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळते. अशा सर्व वनप्लस फोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सर्वात स्वस्त फोन मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे.

OnePlus Nord CE 2 Lite 5G असं या स्मार्टफोनचे नाव आहे. Oneplus च्या या पोर्टफोलिओ मधील हा सर्वात स्वस्त फोन आहे. हा फोन तुम्हाला १३,५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळत आहे. वनप्लसच्या या दर्जेदार फोनची किंमत ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, मात्र हे खरे आहे. जर तुम्ही देखील या फोनचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. जाणून घेऊया, या फोन आणि ऑफर विषयी सविस्तर.

‘अमेझॉन’ या वेबसाईटवर ऑफरमध्ये विक्री होत असणारा हा स्मार्टफोन 6GB आणि 12GB स्टोरेज मिळणार आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. मात्र अमेझॉनवर हा स्मार्टफोन केवळ 13500 रुपयांमध्ये मिळत आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन तुम्हाला तब्बल साडे पाच हजार रुपये डिस्काउंटमध्ये मिळत आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला तर तुम्हाला तब्बल 12 हजार रुपये डिस्काउंटमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

या फोनमध्ये काय विशेष आहे?

‘वन प्लस नॉर्ड सीई २ लाइट ५ जी’ फोन हा आतापर्यंतचा वनप्लसचा सर्वात स्वस्त फोन आहे. या फोनमध्ये ५जी सपोर्टसोबतच ६.५९ इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याला १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळतो. या फोनमध्ये ३३ वॉट सुपर व्हीओसी चार्जिंग सपोर्ट दिला आहे. तसेच 5000 mAh बॅटरी दिलेली आहे. या फोनचा कॅमेरा सुद्धा एकदम दमदार आहे. ६४ मेगापिक्सलता ट्रिपल रियर कॅमेरा सेट अप दिला असल्याने फोटोग्राफीसाठी उत्तम फोन मानला जात आहे.

‘वनप्लस’ च्या स्मार्टफोनचा सेल्फी देखील दमदार आहे. या स्मार्टफोनला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. जो जबरदस्त मानला जात आहे. या स्मार्टफोनच्या प्रोसेसरचा विचार करायचा झाल्यास, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर देण्यात आला आहे. जो अँड्रॉइड १२ वर आधारित काम करतो.

हे देखील वाचा Tips For Married Couple: पती पत्नीच्या नात्यात कायम ओलावा ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स..

Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..

Age for marriage: लग्न करण्याचे योग्य वय जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

IOCL Recruitmet 2023: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये या उमेदवारांसाठी मोठी भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

IND vs AUS: याला म्हणतात कॅप्टन; आपला त्याग करत रोहितने पुजाराची विकेट वाचवली, पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.