Vastu Tips: घरामध्ये चुकूनही या 3 वस्तू आणू नका, अन्यथा रस्त्यावर याल..
Vastu Tips: वास्तुशास्त्राला आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. आपल्या स्वप्नातील घर बांधताना ते वास्तुशास्त्रानुसार असावे यासाठी आपण आग्रही असतो. यामागे तशी काही कारणेही असतात, जी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची ठरतात. वास्तुशास्त्रानुसार आयुष्य जगण्याची संख्या पुष्कळ आहे. घर बांधण्यापासून ते घरातील वस्तू कशा सगळ्या यासाठी देखील अनेक जण वास्तुशास्त्राचा आधार घेतात. जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या तीन वस्तू ठेवू नयेत.
घराच्या दरवाजापासून ते देवघराची जागा कोणत्या दिशेला असावी. घरातील मोठ्या वस्तुंची मांडणी कशी असावी. कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवावी, अशी माहिती आपण तज्ञांकडून घेतो. तज्ञाच्या सल्ल्याने आपण आपल्या वास्तुची रचना करतो. त्याचप्रमाणे घरात कोणत्या ठिकाणी कोणत्या वस्तू असाव्यात किंवा कोणत्या वस्तू नकोत याचेही काही नियम शास्त्रांत सांगितले आहेत. आजच्या लेखात आपण अशा तीन वस्तुंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या घरात आणल्याने आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात.
अनेकवेळा जाणून बुजून किंवा नकळत आपण अशा काही वस्तू घरात आणतो, ज्याची आपल्याला फारशी गरज नसते. मात्र कुठेही गेलो आणि नवीन काही पाहायला मिळाले तर आपण ते लगेच घेतो, आणि घरत आणून ठेवतो. परंतू, धार्मिक शास्त्रानुसार काही वस्तू कधीही घरात आणू नयेत. असे केल्याने आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा शिरते. साहजिकच याचा घराच्या वातावरणावर परिणाम होतो.
आचार्य अनुपम जॉली यांच्या मते, वास्तुशास्त्र आणि धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक उपयुक्त गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यांच्या मते, व्यक्तीने आपल्या घरात काही वस्तू आणल्या पाहिजेत आणि काही वस्तू कधीही आणू नयेत. वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे सहा इंचापेक्षा मोठी मूर्ती घरात कधीही आणू नये असं सांगण्यात आला आहे. एकदा का मूर्ती घरात ठेवल्यानंतर ती पुन्हा उचलू नये, असे देखील नमूद करण्यात आलं आहे.
शालिग्राम हा नेपाळच्या गंडकी नदीतून उगम पावणारा दगड आहे. जो गुबगुबीत, अतिशय आकर्षक, सुंदर, गुळगुळीत आणि चमकदार असतो. शास्त्रामध्ये ही भगवान विष्णूची प्रतिकृती मानली जाते. जर तुम्ही हा दगड घरी आणला तर तुम्हाला पूजेसाठी कठोर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र यादव गडाची व्यवस्थित पूजा झाली नाही तर मात्र तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात, असं वास्तुशास्त्र नमूद करण्यात आलं आहे.
ज्या झाडाला काटे असतात, अशी झाडे घरात चुकूनही आणू नयेत असं देखील सांगण्यात आले आहे. अशा झाडांची घरात लागवड करू नये. घरामध्ये निवडुंग, बाभूळ, एकूणच ज्या झाडांना कटे असतात अशी झाडे चुकूनही लावू नयेत. त्यांना घराबाहेर ठेवणेच कुटुंबासाठी चांगले असते. काटे असणारे झाडे घरामध्ये ठेवल्यास त्याचा घरातील सदस्यांवर वाईट परिणाम पडतो. असं सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा Vastu Shastra: या दिशेला भिंतीवरचे घड्याळ लावल्यास तुमची वेळ होईल सुरू; जाणून घ्या या मागचे शास्त्र..
Relationship Tips: ती हे इशारे करत असेल तर समजून जा तुमच्या प्रेमात झालीय पागल..
Prithvi Shaw: पृथ्वी शॉवर जीवघेणा हल्ला, दांडक्याने दोन गटात मारामारी, गाडीचाही चुरा, पाहा व्हिडिओ..
Samsung galaxy S22: सॅमसंगची विशेष ऑफर, २७ हजारात खरेदी करा ८६ हजाराचा हा स्मार्टफोन..
Child development: लहानपणीच मुलांना शिकवा या गोष्टी; भविष्यात करतील आई-वडिलांचे नाव उज्वल..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम