Online SBI Account: आता घरबसल्या काढता येणार SBI Bank account; जाणून घ्या साविस्तर प्रोसेस..
Online SBI Account: कोणत्याही बँकेचे खाते (bank account) काढणे हे प्रत्येकासाठी खूप मोठी डोकेदुखी असते. किचकट कागदपत्रांची जुळवाजुळव आणि वेळ खाऊपणा यामुळे अनेक जण त्रस्त असल्याचे पाहायला मिळते. मात्र तरी देखील तुमचे व्यवहार सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला बँक अकाऊंट हवेच. एसबीआयने यासंदर्भात एक मोठी सुविधा सुरू केली आहे. ज्या ग्राहकांना स्टेट बँक ऑफ इंडियाचे बँक खाते उघडायचे आहे, अशा ग्राहकांना आता घरबसल्या ऑनलाईन खाते काढता येणार आहे.
देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक म्हणून ओळखली जाणाऱ्या एसबीआय मध्ये आता तुम्हाला खाते काढण्यासाठी प्रत्यक्ष जावं लागणार नाही. तुमच्याकडे एक स्मार्टफोन असेल, तर तुम्ही घरबसल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते सहज काढू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बँक खाते काढण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतात? यासह ऑनलाइन पद्धतीने बँक खाते कसे काढायचे? याविषयी जाणून घेऊया सविस्तर.
कोणाला काढता येणार खाते?
सर्वप्रथम आपण कोणत्या ग्राहकांना खाते काढता येणार हे पाहू. जर तुम्ही अठरा वर्षावरील नागरिक असाल, तर तुम्हाला या बँकेत खाते काढता येणार आहे. जर तुम्ही या बँकेचे नवीन ग्राहक असाल, आणि तुमच्याकडे सीआयएफ नसेल, तरच तुम्हाला या बँकेत ऑनलाईन खाते काढता येणार आहे.
असं काढा खातं
एसबीआय बँकेत खाते काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन मधून ‘योनो’ हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. यानंतर तुम्ही व्हिडिओ केवायसीच्या माध्यमातून तुमचे बँक खाते काढू शकता. बँक खाते काढण्यासाठी तुम्हाला या ‘ॲप’ मधून ‘न्यू टू’ SBI हा पर्याय निवडायचा आहे. यानंतर तुम्हाला ‘सेविंग अकाउंट’ हा पर्याय निवडायचा आहे. तुम्हाला तुम्ही कोणत्या ब्रँचमध्ये तुमचं बँक खाते काढू इच्छित आहात, तो पर्याय निवडायचा आहे.
इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक पुढील रकान्यांमध्ये व्यवस्थित भरायचा आहे. संबंधित माहिती व्यवस्थित भरल्यानंतर, तुम्हाला व्हिडिओ कॉल करावा लागणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून केवायसी प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे. एसबीआयच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भात पडताळणी करण्यात येईल. आणि डेबिट व्यवहारांकरिता इस्टाप्लस बचत खाते उघडले जाईल. त्यानंतर तुम्ही एसबीआयच्या सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहे.
ही आहेत एसबीआयची ऑनलाइन वैशिष्ट्ये
एसबीआयची ऑनलाईन वैशिष्ट्ये काय आहेत? हे देखील जाणून घेऊ. व्हिडिओ KYC च्या माध्यमातून तुम्ही SBI Insta Plus हे बचत खतं उघडू शकता. यामध्ये NEFT, IMPS, UPI व्यतिरिक्त, तुम्ही तुमचे पैसे YONO ॲप तसेच ऑनलाइन SBI इंटरनेट बँकिंग अशा इतर मार्गांनी देखील तुम्ही तुमचे व्यवहार करू शकता.
हे देखील वाचा India Post Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोस्ट विभागात सर्वात मोठी भरती; जाणून घ्या साविस्तर..
Chanakya niti: कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होण्याचे चाणक्य यांचे हे चार मूलमंत्र माहीत असायलाच हवे..
IND vs AUS: T20 नंतर कसोटी संघातूनही केएल राहुलचा पत्ता कट..
IND vs NZ: सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने जाहीर केली धक्का बसणारी प्लेइंग इलेवन..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम