Marriage Tips: ..म्हणून लग्नाआधी लावतात हळद; हळद लावण्याची सहा करणे जाऊन तुम्हालाही बसेल धक्का..

0

Marriage Tips: लग्न (marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. लग्न जमल्यानंतर लग्न होईपर्यंत नवरा आणि नवरी तसेच नातेवाईकांसाठी देखील हा आव्हानाचा काळ असतो. भारतामध्ये लग्न सोहळा हा पाच दिवसांचा असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये साखरपुडा, हळदी समारंभ, अशा महत्त्वाच्या कार्यक्रममांचा देखील समावेश आहे. अलीकडे आता लग्नाच्या दिवशीच सर्व कार्यक्रम पार पाडले जातात. मात्र लग्नाआधी हळदी का लावतात (Haldi Ceremony) याविषयी तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया सविस्तर. (Why Haldi ceremony important after marriage)

लग्नापूर्वी वधू-वरांना हळद लावण्याचे अनेक उद्देश आणि महत्व आहे. असं मानलं जातं, हळद लावल्याने वधू-वरांचे वाईट आत्म्यांपासून संरक्षण होते. वधू-वरांना हळद लावल्यानंतर लग्न होईपर्यंत कुठेही घराबाहेर जाऊ दिलं जात नाही. याबरोबरच वधू-वरांना एक लाल धागा बांधतात. ज्याच्यामुळे वधू-वर दोघांनाही वाईट दृष्टी पासून संरक्षण मिळते, असा देखील समज आहे.

हळदीचा रंग हा प्रचंड शुभ मानण्यात आला आहे. भारतीय परंपरेत हळदला विशेष महत्त्व दिलं जातं. हळद हे समृद्धीचे प्रतीक असल्याचे देखील बोललं जातं. म्हणूनच लग्नापूर्वी वधू-वर पिवळे वस्त्र परिधान करतात. लग्नापूर्वी वधू-वरांना हळद लावण्याचे कारण म्हणजे, पूर्वी अनेक सौंदर्यप्रसाधने उपलब्ध नव्हती. हळद त्वचा उजळवण्याचं खूप मोठे काम करते. पूर्वी मेकअप, सौंदर्यप्रसाधने उपलब्ध नसल्याने चेहरा उजळवण्यासाठी हळदीचा वापर केला जायचा.

हळदीचे अनेक गुणधर्म आहेत. चेहरा उजळवण्याबरोबरच हळद अनेक जंतुनाशकांपासून त्वचेचं संरक्षण देखील करते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अनेक जण दुधात हळद मिसळून सेवन देखील करतात. लग्न समारंभात वधू-वरांचे आरोग्य निरोगी राहावं, यासाठी देखील हळदीचा वापर करण्यात येतो. असं देखील सांगितलं जातं.

आयुर्वेदामध्ये हळदीचे अनेक गुणधर्म सांगितले आहेत. सौंदर्याबरोबरच आरोग्याच्या अनेक आजारांपासून मनुष्याचं संरक्षण हळद करत असते. शरीराला शुद्ध देखील करण्याचं काम हळद करते. शरीरावर असणाऱ्या मृतपेशी हळद काढून टाकण्याचे काम करते. लग्नापूर्वी वधू-वरांना हळदीने आंघोळ घातली जाते. चिंता दूर करण्याचे काम देखील हळद करते, असं सांगितलं जातं. शरीराला हळद लावल्याने तणाव आणि डोकेदुखीची समस्या दूर होते. आणि म्हणून लग्नापूर्वी हळद लावली जाते.

लग्नाच्या तयारीचे प्रतीक म्हणून देखील हळदीकडे पाहिलं जातं. हळद लावण्याचा उद्देश म्हणजे, लग्न करण्यासाठी वधू-वर तयार आहेत असं देखील मानलं जातं. पिवळा रंग हा नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणून नवीन आयुष्याला वधू-वर सुरुवात करत असल्याचा हा एक संकेत हळदीच्या माध्यमातून दिला जातो. याबरोबरच पिवळा रंग हा शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. वधू वर देखील शांती आणि समृद्धीचा संदेश देत आहेत, हे भासवण्यासाठी देखील लग्नापूर्वी हळद लावली जाते.

हे देखील वाचा mahendra singh dhoni: म्हणून धोनी अचानक पोहचला ड्रेसिंग रूममध्ये; काय झाली चर्चा, पाहा व्हिडिओ..

INDvsNZ T20 series: टी-ट्वेण्टी संघात निवड करूनही पृथ्वी शॉला BCCI चा दणका..

Pathaan: तो सीन सुरू होताच चाहते स्क्रीन समोर बेभान होऊन नाचू लागले; पाहा व्हिडिओ..

Bank of Maharashtra Bharti 2023: या उमेदवारांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये विविध पदांची मेगा भरती..

Gautami Patil: गौतमी पाटीलला कोर्टाचा दणका; अखेर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.