Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

0

Virat Kohli: आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकाची आत्तापासूनच बीसीसीआयने तयारी सुरू केली आहे. 2023 मध्ये खेळण्यात येणाऱ्या t20 विश्वचषकासाठी आत्तापासून संघ बांधणी करायला सुरुवात केली असून, अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात येत आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli) भुवनेश्वर कुमार ( bhuvneshwar Kumar) रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यासारख्या अनेक खेळाडूंना टी-ट्वेंटी संघातून वगळण्यात आलं आहे. हार्दिक पांड्याला (hardik Pandya) टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व देण्यात आले असून, पांड्याच्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली नसणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली यासह अनेक सिनियर खेळाडूंशिवाय भारतीय टी-ट्वेंटी संघाची संघ बांधणी सुरू आहे. परंतु यामुळे यावरून बीसीसीआय आणि निवड समितीवर मोठ्या प्रमाणात टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सलग दोन टी-ट्वेन्टी विश्वचषकमध्ये खराब प्रदर्शन झाल्यानंतर भारतीय टी ट्वेंटी संघात मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिनियर खेळाडूंच्या अप्रोचवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना टी-ट्वेंटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. मात्र केएल राहुल आणि रोहित शर्मामुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीला देखील याचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये असताना त्याला टी-ट्वेंटी संघातून बाहेर ठेवणं योग्य आहे? का असा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकात विराट कोहली सर्वोत्तम फलंदाज म्हणून समोर आला. असं असताना देखील त्याला टी-ट्वेंटी संघातून दूर राहावं लागत आहे. निवड समिती विराट कोहलीला निवडण्याच्या बाजूने सकारात्मक आहे. मात्र केएल राहुल, रोहित शर्मा या दोघांना वगळून एकट्या विराट कोहलीला संघात घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतील आणि त्यांना या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील. म्हणून BCCI या तिघांनाही टी-ट्वेंटी क्रिकेट संघातून बाहेर ठेवत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

रोहित शर्माचा फिटनेस, खेळाचा अप्रोच त्याचबरोबर मोठ्या सामन्यात केल राहुल सतत अपयशी ठरल्याने या दोघांनाही BCCI टी ट्वेंटी संघातून कायमस्वरुपी बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहे. मात्र दुसरीकडे फिटनेस आणि जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीला देखील इच्छा नसताना टी-ट्वेंटी संघातून वगळावे लागत आहे. यासंदर्भातली खात्रीलायक माहिती आता समोर आली असून, टी-ट्वेंटी संघातून फक्त रोहित शर्मा आणि राहुलला बाहेर ठेवता येणार नाही. या दोघांबरोबर विराट कोहलीला देखील सीनियर खेळाडू म्हणून बाहेर ठेवावे लागेल.

फिटनेस आणि जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीला रोहित शर्मामुळे एकप्रकारे आपला बळी द्यावा लागणार आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असून सुद्धा विराट कोहलीची टी-ट्वेंटी क्रिकेट संघात निवड केली जात नसल्याने आता चाहते चांगलेच भडकले आहेत. न्युझीलंड विरुद्ध होणाऱ्या तीन टी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेत देखील विराट कोहली रोहित शर्मा या दोघांना वगळण्यात आलं आहे. केएल राहुलला वगळलं असलं तरी देखील वगळण्याचे कारण निवड समितीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र या दोघांना का वगळले? हे अद्याप स्पष्ट केलं नसल्याने आता या दोघांची कायमस्वरूपी टी-ट्वेंटी संघातून हकालपट्टी केली गेली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे देखील वाचाBabar Azam Sexting Video: मित्राच्या गर्लफ्रेंड सोबत बाबर आझमचे तसले व्हिडिओ व्हायरल; क्रिकेट विश्वात एकच खळबळ..

BCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्‍या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..

Sex Life Tips: सेक्स लाईफचा आनंद द्विगुणित करायचाय? फॉलो करा या चार गोष्टी..

Sex Mistakes: सेक्स केल्यानंतर चुकूनही करू नका हे काम अन्यथा..

Amruta fadnavis: मकर संक्रांतीच्या या शुभेच्छामुळे अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडिओ..

Chanakya Niti: स्त्री-पुरुषांना लग्नापूर्वी या चार गोष्टी माहीत असायलाच हव्या अन्यथा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.