Rohit Sharma and Rahul Dravid: कर्णधार पदानंतर रोहित शर्माची T-20 संघातूनही हकालपट्टी; राहुल द्रविडही T-20 मधून आऊट..

0

Rohit Sharma and Rahul Dravid: लगातार दोन T-20 विश्वचषकात झालेल्या दारून पराभवानंतर, बीसीसीआय (BCCI) आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे. आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी आतापासूनच संघ बांधणी सुरू करण्यात आली आहे. भारतीय संघ आगामी विश्वचषक हार्दिक पांड्याच्या (hardik Pandya T-20 captain) नेतृत्वाखाली खेळणार असून, रोहित शर्मासह अनेक सीनियर खेळाडूंना (senior player) या संघात स्थान दिले जाणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून सूत्रांना देण्यात आली आहे. रोहित शर्मा बरोबरच T20 संघाच्या प्रशिक्षण पदावरून राहुल द्रविडला (Rahul Dravid) देखील पाय उतार व्हावं लागणार आहे.

बीसीसीआयच्या Apex Council सदस्यांची (BCCI Apex Council Meeting) मीटिंग उद्या 21 डिसेंबर रोजीला होणार आहे. भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी या मीटिंगमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. या मीटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय रोहित शर्मा टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधार पदावर घेण्यात येणार आहे. एवढच नाही, तर टी ट्वेंटी संघातून देखील रोहितला वगळण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. इंग्लड क्रिकेट (England cricket) प्रमाणेच BCCI देखील वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये तीन वेगवेगळे कर्णधार आणि प्रशिक्षक नेमण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

उद्या होणाऱ्या BCCI Apex Council Meeting मध्ये रोहित शर्माचा कर्णधार पदावर त्याचबरोबर सीनियर खेळाडूंना टी-ट्वेंटी संघात ठेवायची की नाही, याचा देखील निर्णय होणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मासह भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) मोहम्मद शमी यासह आणखी काही सीनियर खेळाडूंना टी-ट्वेंटी संघातून कायमची विश्रांती देण्यात येणार आहे.

रोहित शर्माला निर्णयाची माहिती दिली

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा देखील टी-20 संघाच्या नवीन कर्णधार आणि प्रशिक्षक पदासाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात आलं आहे. टी ट्वेंटी क्रिकेटसाठी आम्ही काही बदल करणार असल्याचं रोहित शर्माला सांगितले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आगामी विश्वचषकासाठी संघ बांधणी सुरू केली असून, आम्ही मोठे निर्णय घेण्यापर्यंत पोहचलो आहे. असं देखील रोहित शर्माला सुचवलं असल्याचं BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

या तारखेला होणार नवीन कर्णधार आणि प्रशिक्षकांची निवड

भारतीय संघाला जानेवारीमध्ये श्रीलंके विरुद्ध T 20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी अनेक सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. याच मालिकेत भारतीय टी-ट्वेंटी संघासाठी नवीन प्रशिक्षक आणि नवीन कर्णधाराची कायमस्वरूपी निवड केली जाणार असल्याची माहिती BCCI च्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. अनेक सीनियर खेळाडूंनी टि-20 संघाच्या कर्णधारपदी राहुलची निवड करण्याची विनंती बीसीसीआयला केली होती. मात्र बीसीसीआयने ही विनंती फेटाळून लावली आहे.

सुरुवातीला सीनियर खेळाडूंच्या विनंतीनुसार, बीसीसीआय केएल राहूलची निवड करणार होती. मात्र केएल राहुलच्या तुलनेत हार्दिक पांड्या सरस वाटत असल्याने हार्दिक पांड्याकडे टी-ट्वेंटी संघाची धुरा देण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. उद्या फक्त औपचारिकता पूर्ण केली जाईल. संघातील खेळाडूंची आपला नवीन टि ट्वेण्टी कर्णधार कोण असणार आहे? याची माहिती देण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हे देखील वाचाChanakya Niti: हे चार गुण तुमच्याकडे असतील तर समाज करतो मुजरा..

ICC World Cup 2023: ICC चा BCCI ला नारळ; या कारणामुळे भारतात होणाऱ्या वर्ल्डकपचे यजमानपद घेतले काढून..

FIFA world cup final: अर्जेंटिना जिंकताच तरुणी झाली पूर्णपणे उघडी; पाहा व्हिडिओ..

Bride dance with boyfriend: आपल्या लग्नात बॉयफ्रेंडला नाचताना पाहून नवरीचा सुटला ताबा; कडकडून मिठी, हंबरडा अन्..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.