Pan Card: लागलीच करा ‘हे’ काम, अन्यथा पॅन कार्डतर होईल बाद परंतु..; वाचा आयकर विभागाचा नवा नियम..

0

PAN Card: पॅन कार्ड (Pan Card) धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने देशातील नागरिकांना वारंवार आधार कार्ड (Adhar card) आणि पॅन कार्ड लिंक करण्याचे आवाहन केले आहे. बऱ्याचदा आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे प्रत्येक पॅन कार्ड वापरकर्त्याला अनिवार्य आहे. या अगोदर देखील केंद्र सरकारने वारंवार पॅन कार्डला आधार कार्ड (Adhar card) लिंक करण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारने आता आधार पॅन कार्डला लिंक करण्यास शेवटची संधी दिली आहे. आधार (Adhar card) आणि पॅन कार्ड (Pan Card) लिंक करण्यास शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. गेल्या काही महिन्यांपासून पॅनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी आयकर विभागाने (Income Tax Department) तशा सूचना देखील वारंवार दिल्या आहेत. या प्रोसेससाठी आयकर विभागाने मुदत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे ज्या पॅन कार्ड धारकांचे अद्याप पॅन कार्ड आधार कार्डला जॉईन केले नसेल, त्यांचे पॅन कार्ड बंद केले जाणार आहे. अर्थात ते बाद होणार आहे. हेही वाचा:Online Fraud: अशी होतेय ऑनलाईन फसवणूक, एकदा वाचा नाहीतर नेहल साठवलेले गाठोळे बया..

बऱ्याच सरकारी किंवा बँकिंग क्षेत्रात पॅन कार्ड शिवाय पुढे प्रक्रिया होत नाही. आर्थिक व्यवहार करण्यासाठी देखील तुम्हाला पॅन कार्ड गरजेचे आहे. त्यामुळे जर तुमचे पॅन कार्ड बंद केले, तर तुम्हाला अनेक अडचणी येतील, यात काही शंका नाही. यावर एकच उपाय म्हणजे तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी जॉईन करावे. या संदर्भात आयकर विभागाने एक ट्विट करत पॅन कार्ड धारकांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. हेही वाचा: Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

आयकर विभागाच्या कार्यालयीन Income Tax India या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट करत या संदर्भात माहिती दिली आहे. लोकांना 31 मार्च 2023 पर्यंत आपले पॅन कार्ड आधारला लिंक करण्याचा इशाराच दिला आहे. “प्राप्तिकर कायदा, 1961 नुसार, आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख 31.3.2023 आहे, सर्व पॅन धारकांसाठी जे सवलत श्रेणीत येत नाहीत, तसे न केल्यास, अनलिंक केलेला पॅन निष्क्रिय होईल. उशीर करू नका, आजच लिंक करा!” अशा प्रकारचे ट्विट करण्यात आले आहे. हेही वाचा: Pornography Case: राज कुंद्रा, पूनम पांडे, शर्लीनने  बनवले अश्लील व्हिडीओ; व्हिडिओ व्हायरल..

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने ३० जून 2022 पासून आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी १ हजार रुपये दंड आकारला जात आहे. या 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये दंड आकारण्यात येत होता.  दंड भरल्यानंतर आधारला पॅन लिंक करता येणार आहे. 1 हजार रुपये दंड भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया देखील या आर्थिक वर्षापर्यंत चालू असणार आहे.

31 मार्च 2023 पर्यंत लिंकिंग प्रक्रिया चालू असणार आहे. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्णपणे बंद असणार आहे. त्यानंतर ज्यांनी आधार पॅन लिंक केले नाही, अशांचे पॅन निष्क्रिय करण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे बंद झालेले पॅन कार्ड कुठेही वापरता येणार नाही. जर पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरले तर त्यासाठी दंड ठोठावला जाऊ शकतो. आयकर कायदा (Income Tax law) १९६१ च्या कलम २७२B अंतर्गत आयकर विभागाकडून तब्बल १० हजारांपर्यंत दंड ठोठाण्यात येऊ शकतो.

पॅन आधारशी जोडण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे. तुम्हाला जर थोडेसे टेक्निकल ज्ञान असेल तर तुम्हीदेखील तुमच्या मोबाईलचा वापर करून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तुमच्या मोबाईलच्या ब्राउझरवर  http://www.incometax.gov.in ही वेबसाईट ओपन करावी लागेल.

ही लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला e-pay Tax हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर सर्वात खाली Click here to go to NSDL (Protean) tax payment page for other banks असा पर्याय सर्वात खाली पाहायला मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Income Tax & Corporation Tax
<span;>(Challan 280) या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Tax Applicable  > (0021) Income Tax (Other than Companies) आणि Type of Payment>  (500) Other Receipts या दोन पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्ही कुठल्या पर्यायाने पेमेंट करणार आहात, हा पर्याय क्लिक करावं लागेल. त्यांनतर तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाईप करावा लागेल. त्यानंतर Assessment Year मध्ये 2023-24 पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर पत्ता आणि पिनकोड तुम्हाला टाईप करावे लागेल. पेमेंट जमा करत असताना एक महत्वाची बाब लक्षात घ्या, ती म्हणजे 1000 रुपयेच असावे, म्हणजे एकाच टप्प्प्यामध्ये तुम्हाला रक्कम भरायची आहे. त्यापेक्षा कमी किंवा जास्त रक्कम भरल्यास ती रक्कम ग्राह्य धरली जाणार नाही.

पेमेंट केल्यानंतर 4 ते 5 कार्यालयीन दिवस थांबावे लागेल. त्यानंतर पुन्हा http://www.incometax.gov.in या वेबसाईटला भेट देऊन, तुम्ही लिंक आधार (Link Adhar) या पर्यायावर क्लिक करून पॅन कार्ड क्रमांक आणि आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल क्रमांक टाईप करुन पुढील प्रक्रिया करू शकता. काही समस्या आल्यास आयकर विभागाच्या  orm@cpc.incometax.gov.in मेलवर मेल करा.

हेही वाचा: Couple Romance Video Viral: तरुणी नको म्हणत असतानाही सिग्नलला थांबून तरुणाचा इम्रान हाश्मी स्टाईल Kiss; शेजारी पाहत असताना.. 

Google Search: लग्न जमल्यावर मुलं या पाच गोष्टी Google वर करतात सर्वाधिक सर्च; चौथी आणि पाचवी वाचून जाल चक्रावून.. 

कोटीची लॉटरी लागली, प्रियकराने पत्नीसह पैसेही पळवले; पुढं जे झालं ते वाचून थक्क व्हाल..

Pornography Case: राज कुंद्रा, पूनम पांडे, शर्लीनने  बनवले अश्लील व्हिडीओ; व्हिडिओ व्हायरल..

Online Fraud: अशी होतेय ऑनलाईन फसवणूक, एकदा वाचा नाहीतर नेहल साठवलेले गाठोळे बया..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.