Talathi Bharti 2022: चार हजार तलाठी पद भरती प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
Talathi Bharti 2022: गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या नोकर भरतीकडे (Nokar Bharti) विद्यार्थी (students) आस लाऊन बसले आहेत. राज्यात लवकरच २९ विभागामध्ये एकूण २ लाख ७५ हजार रिक्त पदान पैकी 75 हजार रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील आहे. या सगळ्यांमध्ये आता तलाठी भरती (talathi bharti) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे.
राज्यातून २९ विभागामध्ये एकूण ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर, राज्याच्या महसूल विभागाने (Department of Revenue) देखील तलाठी भरतीची घोषणा केली आहे. राज्यात तलाठ्यांच्या तब्बल चार हजार जागा रिक्त असल्याने शासकीय कामांना (Government work) ब्रेक लागला. त्यामुळे शेतकऱ्यासह (farmers) अनेक सामान्य लोकांचे (common man) हाल होऊ नये यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी राज्यातील तलाठ्यांची बैठक आपल्या कार्यालयात बोलावली होती. एकाच तलाठ्याकडे अनेक गावांचा कारभार देण्यात आला असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत असल्याने ही बैठक बोलावण्यात आली होती.
मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तलाठ्यांना रिक्त असणाऱ्या 4 हजार पदांची डिसेंबर अखेर भरती केली जाणार असल्याचा शब्द देखील दिला आहे. राज्यातील एकूण 12 हजार पाचशे पदे आहेत. मात्र त्यापैकी तब्बल एक हजार 28 पदे मोकळी आहेत. सोबतच पुनर्रचित सजानुसार तीन हजार 165 पदे देखील रिक्त आहेत. एवढेच नाही, तर 528 मंडल अधिकाऱ्याची देखील पदे रिक्त आहेत. सहाजिकच यामुळे मंडलाधिकारी आणि तलाठ्यांवर या सगळ्यांचा अतिरिक्त भार पडला आहे. ही बाब लक्षात घेऊन, या सर्व रिक्त पदांची भरती डिसेंबर अखेर केली जाणार असल्याची माहिती देखील या बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विभागणीय आणि जिल्हा तलाठी संवर्गाच्या एकूण 12636 पदे आहेत त्यापैकी केवळ 8574 पदांवरच कर्मचारी कार्यरत आहेत. म्हणजेच उर्वरित 4 हजार 65 पदे रिक्त आहेत. महत्त्वाचं म्हणजे, राज्य विभागीय आयुक्त कार्यालया अंतर्गत 465 ही रिक्त असणारी पद सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे नमूद केले आहे. यामुळे आता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त बोजा पडत असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
प्रत्येक गावातील नागरिकांना शेतकऱ्यांना आपल्या जमिनी संदर्भात चौकशी करण्यासाठी तलाठ्याकडे नियमितपणे काम असतं. मात्र तलाठ्यांची संख्या कमी असल्याने अनेक गावांचा कारभार एकाच तलाठ्याकडे देण्यात आला असल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचायत होत असल्याचं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. शेतकरी, सर्वसामान्यांना संकटाचा सामना करावा लागू नये, अधिकाऱ्यांवर देखील अधिक बोजा पडू नये, यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत 4065 रिक्त जागा भरण्यात येणार असल्याचं आश्वासन देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील तलाठ्यांना पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट केलं.
Sexuality tips: वारंवार सेक्स केल्याने खरचं महिलांचा तो अवयव सैल पडतो? जाणून घ्या समज गैरसमज..
Flipkart चा धमाका: Samsung redmi सह अनेक स्मार्टफोनवर ८० टक्क्यांची सूट; वाचा कधी सुरू होतोय सेल..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम