India post office recruitment 2022: या उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट विभागात 98 हजार 83 रिक्त जागांसाठी मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..
India post office recruitment 2022: दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरी (government job) करण्याची खूप मोठी संधी आहे. भारतीय पोस्ट विभागात (India post office) तब्बल 98 हजार 83 रिक्त जागा भरण्यात येणार असून, यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी (nokari) मिळत नसल्याचे चित्र सध्या देशभर असल्याचं पाहायला मिळतं. सहाजिकच अशा वातावरणात नोकरी मिळणं फार आवश्यक आहे. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, आणि तुमची दहावी, बारावी पूर्ण असेल, तर तुम्हाला भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची खूप मोठी संधी आहे.
भारतीय पोस्ट विभागांमध्ये एकूण 98 हजार 83 रिक्त पदांची भरती निघाली असून, यासंदर्भातली आधीसूचना देखील जारी करण्यात आली आहे. अनेक विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्या, तरी जागांची खूप कमी मर्यादा असते. त्यामुळे अनेकांना संधी मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळतं. मात्र भारतीय पोस्ट विभागामध्ये एकूण 98 हजार 83 रिक्त जागांची मेगा भरती असल्याने, अनेकांना नोकरी करण्याची खूप मोठी संधी आहे. भारतीय पोस्ट विभागाअंतर्गत कोणकोणत्या विभागात किती रिक्त पदांची भरती केली जाणार आहे? त्याचबरोबर उमेदवारांची पात्रता? ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याविषयी जाणून घेऊया सविस्तर.
भारतीय डाक विभागामध्ये निघालेल्या 98 हजार 83 रिक्त जागांचे पुढील प्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे. ‘पोस्टमन’ (Postman) या पदासाठी 59 हजार 99 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तर ‘मेलगार्ड’ (Mel guard) या पदासाठी एकूण 1446 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. आणि मल्टीटीस्किंग स्टाफ (multi tasking staff) म्हणून 37539 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पोस्ट विभागाकडून भरण्यात येणाऱ्या या जागा संपूर्ण देशभरातील 23 ठिकाणी असणार आहेत. आता आपण जागा निहाय उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा? हे सविस्तर जाणून घेऊ.
शैक्षणिक पात्रता
भारतीय डाक विभागाकडून करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी पोस्टमन या पदासाठी एकूण 59 हजार 99 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी बारावी उत्तीर्ण अशी ठेवण्यात आली आहे. बरोबर मेलगार्ड या पदासाठी भरण्यात येणाऱ्या चौदाशे 45 रिक्त जागांसाठी उमेदवारांचे कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी बारावीचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच कॅम्पुटरचे ज्ञानदेखील उमेदवारांना अवगत असणे गरजेचे आहे.
‘मल्टीटीस्किंग स्टाफ’ या पदासाठी भरण्यात येणाऱ्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची दहावी आणि बारावी कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून होणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवारांना कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान अवगत असणे, देखील आवश्यक असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. आता आपण भारतीय डाक विभागाकडून भरती करण्यात येणाऱ्या जागांसाठी उमेदवारांची पात्रता काय आहे? हे देखील सविस्तर जाणून घेऊ.
वयोमर्यादा
भारतीय डाक विभागाकडून भरण्यात येणाऱ्या 98 हजार 83 रिक्त जागांसाठी उमेदवारांची पात्रता वेगवेगळी ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये ओपन उमेदवारांसाठी 33 वयाची मर्यादा असणार आहे. एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 38 वयाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. ओबीसी उमेदवारांसाठी वयाची मर्यादा ही 35 वर्ष ठेवण्यात आली आहे. जर तुम्ही pwd कर्मचारी असाल तर तुम्हाला 10वर्ष अतिरिक्त मिळणार आहेत. म्हणजेच 43 वयापर्यंत अर्ज करू शकता. pwd चे कर्मचारी आणि तुम्ही ओबीसी कॅटेगरीतून अर्ज करणार असाल, तर तुमची वयाची मर्यादा ही 46 असणार आहे. आणि जर तुम्ही एससी एसटी कॅटेगरीमधून अर्ज करणार असाल तर तुम्हाला 53 वयापर्यंत अर्ज करता येणार आहे.
पगार आणि परीक्षा फी
भारतीय डाक विभागाकडून करण्यात येणाऱ्या या जागांसाठी वेगवेगळ्या पदासाठी वेलवेगळा पगार देण्यात येणार आहे. यामध्ये 33718 ते 35370 इतका पगार देण्यात येणार आहे. पात्र असणाऱ्या आणि अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी काही फी देखील आकारण्यात येणार आहे. यामध्ये ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी शंभर रुपये अर्ज फी ठेवण्यात आली आहे. तर इतर कॅटेगरी आणि महिलांसाठी या परीक्षेसाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क करण्यात येणार नाही. आता आपण ऑनलाईन अर्ज कसा कार्याचा हे देखील घेऊ.
असा करा ऑनलाईन अर्ज
भारतीय डाक विभागाकडून करण्यात येणाऱ्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.indiapost.gov.in असं सर्च करणे आवश्यक आहे. त्यांनतर तुमच्यासमोर या विभागाची अधिवृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला india post office recruitment 2022 या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही वेवस्थित वाचून अर्जच्या लिंकवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
हे देखील वाचा Sexuality tips: वारंवार सेक्स केल्याने खरचं महिलांचा तो अवयव सैल पडतो? जाणून घ्या समज गैरसमज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम