Sexuality tips: वारंवार सेक्स केल्याने खरचं महिलांचा ‘तो’ अवयव सैल पडतो? जाणून घ्या समज गैरसमज..
Sexuality tips: लैंगिक विषयावर (Sexuality) आजही आपल्याकडे उघडपणे बोलले जात नाही. खरंतर लैंगिकते विषयी तुम्हाला सर्व काही माहीत असणे आवश्यक आहे. अनेकांना या विषयाविषयी समज गैरसमज आहेत. या विषयाच्या समज गैरसमजामुळे अनेकदा अनेक संकटाचा सामना देखील करावा लागतो. एवढंच नाही, तर नातं संपुष्टात येण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. साहजिकच त्यामुळे तुम्हाला लैंगिक या विषयाविषयी जाणून घेणे फार गरजेचे आहे. आज देखील आपण अशा एका विषयाविषयी जाणून घेणार आहोत, ज्याचा वैवाहिक जीवनामध्ये प्रत्येकाला फायदा होऊ शकतो.
महिलांसमोर (Women) सतत संबंध ठेवल्यामुळे महिलांचा तो महत्त्वाचा अवयव सैल पडतो, असं अनेकांना वाटतं. मात्र वस्तुस्थिती काही वेगळी आहे. महिलांचा तो भाग अतिशय लवचिक असतो. वारंवार संबंध ठेवल्याने महिलांचा तो भाग लवचिक होतो, हे अजिबात वास्तव नसून, संबंधानंतर महिलांचा भाग पुन्हा पूर्वस्थितीत यायला फारशा वेळ लागत नाही. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, महिलांच्या त्या भागाला शिथिलपणा नक्की येतो कशामुळे? तर याला काही शास्त्रीय कारणे आहेत, आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी सर्वप्रथम आपण शिथिलता म्हणजे काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ. Benefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..
तो भाग सैल होतो म्हणजे नक्की काय होतं?
महिलांचा महत्त्वाचा भाग हा विविध स्नायूंनी बनलेला असतो. जो प्रचंड लवचिकता प्रदान करत असतो. साहजिक संबंधा दरम्यान हवा तितका लवचिक होतो. मात्र त्यानंतर तो काही वेळानंतर पुन्हा आपल्या मूळ स्थितीत परत देखील येत असतो. या भागाजवळील स्नायूंना फ्लोर मसल्स असे देखील म्हटले जाते. लवचिकता आणि महिलांचा अवयव हा वयानुसार सैल पडत जातो. महिलांचे वय जसजसं वाढत जातं, तसं तसं हे स्नायू देखील सैल पडतात. साहजिकच यामुळे संबंध करताना पूर्वी पेक्षा अवयव लवचिक असल्याचं जाणवतं.
संबंध काही प्रमाणात जबाबदार असतो?
महिलांचा हा अवयव वारंवार संबंध ठेवल्याने सैल पडतो असा, असा अनेकांचा समज आहे. मात्र यात अजिबात तथ्य नाही. किंवा असा काही पुरावा देखील कुठे नाही. एखादी महिला जेव्हा लैंगिकरित्या क्षीण होत असते, तेव्हा तिच्या या भागांमधील स्नायू आपोआप आराम करत असतात. जे आतमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप मदत देखील करतात. जेव्हा महिला उत्तेजित होत असतात, तेव्हा हे स्नायू शिथिल देखील होण्याचे काम करतात. जे संबंधानंतर आपल्या मूळ आकारात परत देखील येण्याचे काम करतात. साहजिकच यामुळे वारंवार संबंधामुळे महिलाचे स्नायू सैल पडतात, याला अजिबात अर्थ नाही.
मुल जन्मामुळे असं होत का?
महिला प्रेग्नेंट असताना, तीच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात. साहजिकच बाळाला जन्म दिल्यानंतर, देखील महिलांच्या शरीरामध्ये खूप सारे बदल होतात. जसे की पायांना सूज येण्याचे प्रकार, वजन वाढतं. महिलांच्या अनेक अवयवांचे देखील आकार बदलतात. महिलेची जर सामान्य डिलिव्हरी झाली असेल, तर महिलांचे स्नायू खूप मोठ्या प्रमाणात विस्तरले जातात. मात्र असं असलं तरी, काही काळानंतर महिलांचा हा भाग पूर्वस्थितीत देखील येतो. महिला देखील प्रसूतीनंतर, आपला भाग सैल पडल्याचे सांगतात. मात्र हे काही ठराविक काळापुरते असते. महिला पुन्हा सामान्य स्थितीत येतात.
वाढते वय आहे महत्वाचं कारण
फक्त महिलाच नाही, तर पुरुषांच्या वाढत्या वयानुसार देखील त्यांच्या शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात. साहजिकच वाढत्या वयामुळे महिला देखील आपल्या स्नायूंची लवचिकता गमावताना पाहायला मिळतात. त्यामुळेच महिलांचा हा भाग अनेकांना सैल वाटतो. आम्हाला आशा आहे, तुम्ही या लेखाला सकारात्मक घेऊन ‘महाराष्ट्र लोकशाही’चा सन्मान कराल. अनेकांना याविषयी असणारे गैरसमज दूर व्हावेत, हाच आमचा एकमेव हेतू आहे. ही माहिती सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे.
हे देखील वाचाOnion Rate: आवक घटल्यामुळे कांद्याने गाठला उच्चांक; या महिन्यानंतर कांदा होणार 80 रुपये किलो..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम