Electric Scooter: Flipkart वरून १२ हजारांत खरेदी करू शकता ही इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

Electric Scooter: इंधनाचे (fuel price) दर दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने, आता अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांचा (electric vehicles) वापर करण्याकडे वळाल्याचे पाहायला मिळतात. इंधनावरच्या गाड्या वापरणं आता परवडत नसल्याने अनेक जण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती इंधनाच्या किमती पेक्षा जास्त असल्या तरी देखील इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचा खर्च इंधनाच्या तुलनेत खूप कमी असल्याने अनेकजण इलेक्ट्रिक गाड्यांनाच पसंती देत असल्याचं चित्र आहे. साहजिकच यामुळे अनेक बड्या कंपन्यांनी देखील आपल्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश केला आहे.

तुम्ही देखील इंधन दरवाढीमुळे हैरान असाल, आणि तुम्हाला इंधनावरच्या टू-व्हीलर गाड्या फिरवणे परवडत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आपण अशा एका इलेक्ट्रिक स्कूटर विषयी जाणून घेणार आहोत, जी तुम्ही केवळ बारा हजार रुपयांत घरी आणू शकता. विशेष म्हणजे, ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईटवरून (Flipkart e-commerce website) देखील खरेदी करू शकता. महत्वाचं म्हणजे, या इलेक्ट्रिक स्कूटरने आपल्या विक्रीत वर्षामध्ये तब्बल २४७ टक्क्यांनी वाढ केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटर (electric scooter) विषयी सर्व डिटेल्स.

Ather 450X असं या इलेक्ट्रिक स्कूटरचं नाव आहे. या कंपनीची ही स्कूटर प्रचंड लोकप्रिय असून, इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत या कंपनीने अव्वल स्थान पटकावले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, Ather 450X ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही Flipkart वरून देखील खरेदी करू शकता. इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील, तर तुम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीसाठी ईएमआय हा पर्याय देखील उपलब्ध आहे. आज आपण Ather 450X या इलेक्ट्रिक खरेदीसाठी किती रुपयांचा EMI असणार आहे. त्याचबरोबर डाउन पेमेंट काय असणार आहे? याविषयी जाणून घेऊया सविस्तर.

Ather 450X डाउन पेमेंट त्याचबरोबर EMI

कंपनीने आपल्या Ather 450X या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत एक लाख सतरा हजार ते एक लाख ४० हजारापर्यंत ठेवली आहे. BikeDekho.com या वेबसाईटनुसार तुम्ही ईएमआय तीन वर्षासाठी घेतला, तर तुम्हाला 9.7 टक्के व्याज दराने तब्बल एक लाख दहा हजार रुपये कर्ज दिलं जाईल. त्याचबरोबर तुम्हाला दर महिन्याला 3562 रुपये इतका ईएमआय भरावा लागणार आहे. जो खूप उत्तम मानला जातो. आपण दर महिन्याला एमआय किती भरावा लागेल, हे जाणून घेतलं. मात्र ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला डाऊन पेमेंट म्हणून, केवळ बारा हजार रुपये भरायचे आहेत.

म्हणजेच Ather 450X ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला केवळ बारा हजार रुपये भरावे लागणार आहेत. आता आपण या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्स विषयी सविस्तर जाणून घेऊया. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला दोन प्रकारांमध्ये पाहायला मिळते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला Ather 450 Plus Gen3 ही बाईक मिळते. तर दुसरीकडे तुम्हाला Ather 450X Gen 3 ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करता येऊ शकते. दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या ईएमआय विषयी थोडासा फरक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही यावर क्लिक करून अधिक जाणून घेऊ शकता. BikeDekho.com हे देखील वाचाMarried life tips: वैवाहिक जीवनातल्या या तीन गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका, अन्यथा व्हाल बर्बाद..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

PM Kisan Yojana: अजूनही PM Kisan योजनेचा बारावा हप्ता जमा झाला नसेल तर फक्त करा हे काम, झटक्यात होईल जमा..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.