Google India Recruitment: पदवीधर उमेदवारांसाठी गूगल इंडियामध्ये निघाली मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..
Google India Recruitment: महागाई (Inflation) बरोबरच बेरोजगारीचा (unemployment) दर देखील दिवसेंदिवस वाढत चालला आहे. साहजिकच यामुळे नोकरी (Job) मिळवणे खूप आवश्यक आहे. महागाईच्या या जमान्यात नोकरी मिळवणं खूप आवश्यक असलं, तरी बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नोकरी मिळवणे खूप मोठं आव्हान आहे. काही विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्या तरी उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात येत असल्याने, प्रत्येकाला नोकरी मिळेलच हे ठामपणे सांगता येत नाही.
गुगल (Google) हे माध्यम माहिती नाही, असा शोधूनही सापडणार नाही. गुगलच्या माध्यमातून प्रत्येकाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे क्षणात मिळतात. आता गुगल कंपनीने (Google company) काही जागांची भरती आयोजित केली असून, पदवीधर उमेदवारांना (graduation students) भरतीचा लाभ घेता येणार आहे. या भरती प्रक्रिया संदर्भात गुगलकडून अधिसूचना जारी करण्यात आली असून, विविध विभागामधील “अप्रेंटीशीप” या पदांसाठी भरती आयोजित केली आहे. या भरतीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोंबर देण्यात आली आहे.
गुगल इंडियाकडून (Google India) अप्रेंटीशीप या पदांसाठी करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी माहिती तंत्रज्ञान डेटा, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग या पदांसाठी अप्रेंटिसशिप या पदासाठी जागा भरण्यात येणार आहेत. गुगलकडून भरण्यात येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांची काय पात्रता असणार आहे? त्याचबरोबर आवश्यक असणारी कागदपत्रे? आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ. सर्वप्रथम आपण गुगलकडून भरण्यात येणाऱ्या पदांसाठी उमेदवारांची पात्रता काय असणार याविषयी जाणून घेऊ.
उमेदवारांची पात्रता
गुगल इंडियामध्ये डिजिटल मार्केटिंग, डेटा अॅप्रेंटिसशिप, माहिती तंत्रज्ञान प्रोजेक्ट मॅनेजमेंट या पदासाठी निघालेल्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवार त्या विभागातील पदवीधर असणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागासाठी वेगवेगळी पात्रता ठेवण्यात आली आहे. “डिजिटल मार्केटिंग अप्रेंटिसशिप” या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन होणं आवश्यक आहे. डिजिटल मार्केटिंग या विभागात एका वर्षाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे.
“माहिती तंत्रज्ञान अप्रेंटिसशिप” या पदासाठी उमेदवारांची पात्रता जाणून घ्यायची झाल्यास, या विभागात एक वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून बॅचलर डिग्री घेणे आवश्यक आहे. “डेटा अॅप्रेंटिसशिप” या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायची झाल्यास, उमेदवार हा कोणत्याही शाखेतून बॅचलर डीग्री संपादन केलेला असावा. सोबतच त्याला या विभागातील किमान एका वर्षाचा अनुभव असावा.
आवश्यक कागदपत्रे
गुगल इंडियाने आयोजित केलेल्या भरतीसाठी उमेदवारांना लागणारी आवश्यक कागदपत्रे काय असणार, हे देखील पाहू. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडे दहावी, बारावी त्याचबरोबर ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. सोबतच शाळेचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन आणि दोन पासपोर्ट साईजचे फोटो आवश्यक आहेत. आपण या भरती प्रक्रिया संदर्भात ऑनलाईन अर्ज कसा करायचा? हे देखील जाणून घेऊ.
असा करा ऑनलाईन अर्ज
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://careers.google.com/jobs/results/?distance=50&q=#modal_open असं सर्च करणे आवश्यक आहे. क्रोमवर जाऊन तुम्ही हे सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर या भरती प्रक्रिया संदर्भात अधिकृत वेबसाईट ओपन झालेली असेल. यानंतर तुम्हाला “Search Job” या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, Locations, Skills & qualifications, Degree, Job types, Organizations, असे पर्याय पाहायला मिळतील.
या सर्व पर्यायमधील प्रथम तुम्ही “लोकेशन” या पर्यायावर क्लिक करून तुमचं लोकेशन सबमिट करायचं आहे. Locations, Skills & qualifications, Degree, Job types, Organizations, या सर्व पर्यायावर तुम्हाला योग्य माहिती लिहायची आहे. या सर्व पर्यायावर क्लिक करून तुम्ही योग्य माहिती लिहिल्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची तुमची प्रोसेस पूर्ण होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
हे देखील वाचा Arrest Kohli: रोहित शर्माच्या चाहत्याची डोक्यात बॅट घालून ह त्या; विराट कोहलीला होणार अटक..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम