Arrest Kohli: रोहित शर्माच्या चाहत्याची डोक्यात बॅट घालून ह त्या; विराट कोहलीला होणार अटक..
Arrest Kohli: भारतातच नव्हे तर जगभरात देखील क्रिकेट (cricket) हा खेळ कमालीचा लोकप्रिय झाला आहे. जगभरात क्रिकेटचे असंख्य चाहते पाहायला मिळतात. क्रिकेटच्या खेळाबरोबरच प्रत्येकाचे काही आवडीचे खेळाडू देखील असल्याचं दिसून येतं. प्रत्येकाला वेगवेगळे खेळाडू आवडतात. यात विशेष देखील काही नाही, मात्र काही जणांना आपल्या आवडत्या खेळाडूला कोणी काही बोललं तर सहन देखील होत नसल्याचे पाहायला मिळते. अशीच एक घटना अलीयालूर जिल्ह्यामधील पोय्युर गावामध्ये घडली आहे. रोहित शर्माच्या चाहत्याने विराट कोहलीच्या चाहत्यावर टीका केली. मात्र कोहलीच्या चाहत्याला राग अनावर झाला, आणि या रागातून त्याने आपल्या मित्राच्या चक्क डोक्यात बॅट घालून ह त्या केली.
मीडिया रिपोर्टनुसार एस धर्मराज (s dharmraj) आणि पी विघ्नेश (p vighanesh) हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. पीडित विघ्नेश हा मुंबई इंडियन्सच्या (Mi) चाहता होता. तर पी. एस धर्मराज हा रॉयल चॅलेंजर बंगलोर (RCB) या संघाचा चाहता होता. आयपीएलचे (ipl) हे दोन्ही संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. या दोन्ही संघांचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग असल्याचे दिसून येते. एवढेच नाही, तर या संघाचे फॅन्स देखील एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. या दोन्ही संघांचे चाहते एकमेकांच्या संघावर टीका करतात.
एस धर्मराज आणि पी विघ्नेश या दोघांनी देखील एकमेकांच्या संघावर टीका करायला सुरुवात केली. मात्र रोहित शर्माचा चाहता पी व्ही गणेश याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघावर आणि विराट कोहलीवर टीका केल्याने, आरसीबीचा चाहता असणारा एस धर्मराज याला विघ्नेशने केलेली टीका सहन झाली नाही. विराट कोहलीवर टीका केल्यामुळे त्याचा राग अनावर झाला, आणि यश धर्मराज याने आपल्याच मित्राच्या डोक्यात चक्क बॅट घालून त्याची हत्या केली. विघ्नेशच्या डोक्यात बॅट घातल्यानंतर, तो घटनास्थळावरून पळून देखील गेला.
ही घटना सोशल मीडियावर (social media) पसरताच खळबळ उडाली आहे. ट्विटरवर आज दिवसभर विराट कोहली या नावाचा हॅशट्रॅक ट्रेंड देखील केला गेला. “विराट कोहलीला अटक करा” या संदर्भातला हॅशटॅग ट्रेंड देखील झाला. विराट कोहलीला नक्की अटक करण्याची मागणी का करण्यात येत आहे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडल्याचं मिळालं. यामुळे अनेकांनी विराट कोहली संदर्भात येणाऱ्या बातम्या देखील सर्च केल्या. साहजिकच यानंतर विराट कोहलीला अटक करण्याची मागणी का केली जातेय? या प्रश्नाचे उत्तर मिळालं.
बॉलीवूडनंतर भारतामध्ये क्रिकेटला खूप मोठी क्रेझ आहे. क्रिकेटचा खूप मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं. एवढेच नाही, तर अनेकांनी आपापला आवडता खेळाडू आणि आयपीएल संघांची निवड केली आहे. आयपीएलमध्ये जर आपला आवडता संघ प्रतिस्पर्धी संघाकडून पराभूत झाला, तर अनेकांना ही गोष्ट सहन देखील होत नसल्याचे पाहायला मिळतं. यामध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघांचे चाहते एकमेकांना कट्टर विरोधक समजतात. या दोन संघाच्या चाहत्यांमध्ये वाद देखील झाल्याचे पाहायला मिळते. मात्र यापूर्वी अशी दुर्दैवी घटना कधीच घडली नव्हती.
हे देखील वाचाSecond Hand Car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti Suzuki Alto मिळतेय केवळ 65 हजारांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम