sunlight benefits: उन्हामुळे आरोग्यावर होतात हे गंभीर परिणाम; जाणून घ्या उन्हाचा आणि माणसाच्या आरोग्याचा थेट संबंध..

0

sunlight benefits: माणसाचे आरोग्य (Human health) हे निरोगी आहार (Healthy diet) आणि नियमित व्यायाम (regular exercise) यावर अवलंबून असतं. असं आपण नेहमी ऐकत आलो आहोत. मात्र निरोगी आहार नियमित व्यायाम याबरोबरच काही नैसर्गिक गोष्टी देखील आपले निरोगी आयुष्य ठेवण्यास फायदेशीर ठरतात. जास्त उन्हात जाऊ नये, असं आपण अनेकांकडून ऐकत आलो आहे. मात्र निरोगी आरोग्य ठेवायचं असेल, तर उन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे आपल्याला माहीत आहे का? अनेकांना यावर विश्वास बसणार नाही, मात्र आपली हाडे, त्याचबरोबर मधुमेह, हार्ट-अटॅक, कर्करोग या आजारांपासून आपल्याला दूर राहायचं असेल, तर नियमितपणे काही तास उन्हामध्ये आपण थांबणे आवश्यक आहे.

संशोधनानुसार भारतामधील एकूण लोकसंख्या पैकी तब्बल 90% लोकांना ‘ड’ या जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचं समोर आलं आहे. उन्हामुळे भरपूर प्रमाणात ‘ड’ जीवनसत्व मिळते. हे तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल. शरीरामध्ये ‘ड’ या जीवनसत्वाची कमतरता असल्यामुळे, हाडे त्याचबरोबर स्नायू कमकुवत होतात. एवढेच नाही, तर शुगर, हृदयविकाराचा झटका, कर्करोग, यासारखे गंभीर आजार उद्भवण्याची देखील शक्यता अधिक असते. उन्हामुळे सौंदर्यावर परिणाम होतो, असा अनेकांचा समज आहे. मात्र यामुळे आपण आपले आरोग्य धोक्यात टाकत आहोत, हे देखील समजण्याची आवश्यकता आहे. जाणून घेऊया या विषयी सविस्तर.

सन क्रीम मुळे देखील होतो परिणाम

उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेतली जाते. मात्र यामुळे देखील आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये अधिक तापमान असल्याने उन्हापासून संरक्षण होण्यासाठी अधिक कपड्यांचा वापर केला जातो. त्वचा काळी पडू नये, म्हणून अनेकजण सन स्क्रीमचा देखील वापर करतात. मात्र यामुळे उन्हाचा आणि त्वचेचा संपर्क येत नसल्याने शरिरामध्ये ड जीवनसत्व जात नसल्याचे डॉक्टर सांगतात. भारतामध्ये सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असताना देखील भारतीय लोकांमध्ये जीवनसत्त्वाची कमी असल्याने, आश्चर्य व्यक्त केलं जातं.

या दोन कारणामुळे भासते ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता

भारतीय लोकांच्या शरीरामध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता असण्याची प्रमुख दोन कारणे असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. सौंदर्यावर परिणाम होऊ नये, म्हणून अनेकजण उन्हात प्रवास करताना शरीराचा संपूर्ण भाग कपड्याच्या साह्याने झाकतात. शरीराला ‘ड’ जीवनसत्व न मिळण्याचे हे एक महत्त्वाचं कारण असल्याचे डॉक्टर सांगतात. अलीकडच्या काळात बसून काम करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने, ‘ड’ जीवनसत्वाचे प्रमाण कमी झाले आहे. हे देखील एक प्रमुख कारण असल्याचे डॉक्टर सांगतात.

ऑफिस वर्क करणाऱ्या लोकांचा आणि उन्हाचा फारसा संबंध येत नाही. सकाळी नऊ पर्यंत ऑफिसमध्ये पोहचावं लागत असल्याने, साहजिकच उन्हाचा फारसा संबंध येत नाही. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर देखील सूर्य मावळेला असतो. तर दुसरीकडे ऑफिस मधील बैठ्या कामामुळे देखील ड जीवनसत्वाची कमतरता निर्माण होते. याव्यतिरिक्त देखील आणखी काही कारणे आहेत, आपण ते देखील जाणून घेऊ. शरीराचा रंग खूपच गडत असेल तरी देखील ड जीवनसत्वाची कमतरता निर्माण होते. शहराचा गडद रंग सूर्यप्रकाशाची किरणे शोषून घेण्यापासून रोखतो. हे देखील एक कारण असल्याचे सांगितले जाते.

उन्हामुळे शरीरावर नेमका काय परिणाम होतो?

ऊन आणि तापमानामुळे उष्माघाताचे बळी गेलेले तुम्ही अनेकदा ऐकलं देखील असेल. साहजिक यामुळे तुम्हाला उन्हाचे तोटे काय आहेत, हे माहिती असेल. मात्र उन्हाचे फायदे जाणून तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल. सूर्याची किरणे शरीरावर पडण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, तुमच्या शरीरामधील हाडे आणि स्नायू खूप बळकट होतात. आपल्या शरीरामधील हाडे आणि स्नायूचा विकास होण्यासाठी ऊन खूप आवश्यक आहे. सकाळची कोवळी किरणे जर तुमच्या शरीरावर पडली तर तुम्हाला मुडदूस सारखा आजार देखील उद्भवत नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये उन्हाचे शरीरावर होणाऱ्या फायद्याचे नव्याने संशोधन करण्यात आले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. जर तुमच्या शरीरावर नियमितपणे ऊन पडत असेल, तर तुम्हाला शुगर त्याचबरोबर हृदयविकाराचा झटका, कर्करोग या सारख्या गंभीर आजारांपासून स्वतःचे संरक्षण होण्यास मदत होते. त्याबरोबरच नियमितपणे जर तुम्ही तुमच्या अंगावर उन घेतलं, तर क्षयरोग पासून देखील तुम्ही दूर राहता. फक्त शारीरिक आरोग्यावरच नाही तर उन्हामुळे माणसाच्या मानसिक आरोग्य देखील सुधारते.

शरीरावर उन घेण्याची योग्य पद्धत

उन्हाचे परिणाम आपण सविस्तर जाणून घेतले, मात्र अनेकांना प्रश्न पडला असेल, नक्की उन घेण्याची योग्य वेळ कोणती आहे? तर आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ. नियमितपणे तुम्ही सकाळी दहा वाजेपर्यंत उन आपल्या शरीरावर घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तुम्ही उन्हात थांबणं देखील आवश्यक आहे. या कालावधीमध्ये जर तुम्ही सूर्यप्रकाश अंगावर घेतला, तर याचा खूप मोठा फायदा तुमच्या शरीराला होतो. शिवाय डोळ्यांमधील रेटीनाचा काही भाग देखील सक्रिय होण्याचे काम होते.

हे देखील वाचा Good news for onion farmers: ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होणार चांदी; जाणून घ्या किती रुपयांनी वाढणार कांदा..

Correct process of cooking rise: भात शिजवण्याची ही आहे योग्य पद्धत; या चुकीच्या पद्धतीने भात शिजवत असाल तर होतोय कॅन्सर आणि हार्ट अटॅक..

Right Age to Get Pregnant: आई होण्याचे योग्य वय जाणून तुम्हाला देखील बसेल धक्का..

Amazon Job: Flipkart नंतर अमेझॉन मध्येही निघाली मेगा भरती! चार तास काम करून मिळतोय ३० हजार महिना; असा करा अर्ज..

Extra Marital Affairs: या सहा कारणांमुळे महिला ठेवतात विवाहबाह्य संबंध; चौथं कारण आहे खूपच भयंकर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.