limbu Pani side effects: गरम पाण्यात लिंबू टाकून पीत असाल त्वरित थांबवा; अन्यथा आरोग्यावर होतील हे गंभीर परिणाम..
limbu Pani side effects: आपल्याकडे जेवणात लिंबूला विशीष्ट महत्व प्राप्त झालेले आहे. जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी लिंबू ऊपयुक्त ठरते. तसेच एखाद्या पदार्थास चविष्ट करायचे असल्यास सुद्धा त्यामध्ये लिंबाचा रस घातला जातो. अनेकांना भाजीमध्ये लिंबू पिळून खाण्याची सवय असते. खाण्याच्या पदार्थांसाठी तर लिंबूला खूप महत्व आहेच, मात्र लिंबूतील पोषक घटकांमुळे त्याचे महत्व अधिक वाढुन जाते. लिंबू आरोग्यासाठी सुद्धा प्रचंड फायदेशीर आहे. त्यामुळे रोजच्या जेवणात लिंबूचा समावेश करावा असा सल्ला सुद्धा अनेकदा दिला जातो.
ऊन्हाळ्यात तर लिंबूला विशेष महत्व आहे. लिंबू शरबताने शरीरातला कोरडेपणा नाहीसा होतो. याशिवाय ऊन्हाळ्याच्या दिवासांमध्ये शरीर कायम थकल्यासारखे जाणवते. आणि ताजेतवाने वाटायला लागते. लिंबूमध्ये जिवनसत्वांची मात्रा पुष्कळ असते, जे आरोग्यासाठी प्रचंड लाभदायी ठरते. वजन कमी करण्यात सुद्धा लिंबू खुप मोठे योगदान देते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन बी ६,व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए या जिवनसत्वांचा समावेश असतो. तसेच फोलेट, नियासिन, थायामिन, रिबोल्फेविन या घटकांचा सुद्धा लिंबूमध्ये समावेश असतो. त्यामुळेच लिंबू आरोग्यासाठी प्रचंड लाभदायी आहे.
लिंबू हे बहुगुणी आहे. अनेक पदार्थांना आणखी चविष्ट बनवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो याबरोबरच आरोग्यासाठी देखील लिंबू खूप उपयुक्त आहे. याशिवाय सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा लिंबाचा ऊपयोग होतो. चेहर्यावरील काळे डाग घालवण्यासाठी, तसेच चेहर्याला नेहमी ताजेवतवाने ठेवण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करु शकता. महिला वर्ग केसांची विशेष काळजी घेण्यासाठी देखील लिंबाचा वापर करतात. . केस गळती थांबवण्यासाठी वापरण्यात येणार्या मिश्रणांमध्ये सुद्धा लिंबाचा रस घातला जातो. परंतू बहुगुणी असणार्या लिंबाचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. लिंबू आरोग्यासाठी लाभदायी आहे, म्हणून पाहिजे तसे वापरणे चुकीचे आहे. कारण लिंबू हे बर्याचदा तुमच्यासाठी धोकादायक सुद्धा ठरु शकते. तज्ज्ञांच्या मते लिंबू गरम पदार्थात मिसळून घेतल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम तुमच्या शरीरार बघायला मिळतात. लिंबू गरम पदार्थांमध्ये घेतल्याने नेमक्या कुठल्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल याविषयी जाणून घेऊया सविस्तर.
लिंबापासून आरोग्याला होणारे विशेष फायदे लक्षात घेता, लिंबुला रोजच्या आहाराचा भाग बनवण्यात प्राधान्यक्रम देण्यात येतो. मात्र ज्या पौष्टीक घटकांसाठी किंवा जिवनसत्वांसाठी तुम्ही लिंबू रोजच्या जेवणात खाता, त्याचा खरोखरच ऊपयोग होतो का? हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. गरम पदार्थांमध्ये लिंबू घातल्यास त्याचा काहीही फायदा होत नाही. लिंबामध्ये व्हटॅमिन सी हा भाग सर्वाधिक असतो. मात्र गरम पदार्थांमध्ये व्हिटॅमिनसीचा प्रभाव कमी होतो. व्हिटॅमिन सी थंड असते. व्हिटॅमिन सी ऊष्णतेच्या संपर्कात आल्याने त्याच्यातील पोषक तत्वे कमी होऊन जातात. व्हिटॅमिन सी मध्ये एस्कॉर्बिक ऍसीड असल्यामुळे ते पातळ होते. परिणामी त्याचा प्रभाव कमी होतो.
बरेच लोक गरम पाण्यामध्ये लिंबू पिळुन पितात. अपचनाची समस्या दुर करण्यास हे प्रभावी ठरु शकते. मात्र ज्या पोषक तत्वांसाठी लिंबू ओळखले जाते. त्या पोषक तत्वांचाच प्रभाव गरम पाण्याने नाहीसा होतो. त्यामुळे अपचनाच्या समस्येवर जरी ते प्रभावशाली ठरत असले, तरी लिंबामुळे शरीराला होणारे ईतर फायदे मात्र त्यामुळे होत नाही. काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते शरीरावर त्याचे दुष्परिणाम सुद्धा जाणवू शकतात. पोटावरील चरबी करण्या साठी गरम पाण्यात लिंबू पिळून पिण्याची सवय असते. त्यामुळे तुम्हाला काही फायदे होऊ शकतात. मात्र अनेक शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या जीवनसत्त्वाला मात्र आपण गमावून बसतो आहोत. हे मात्र विसरून जातो.
आयुर्वेदामध्ये लिंबाला विशेष स्थान देण्यात आलेले आहे. घशातील संसर्ग, ऍसीडिटी, पाययुरिया, ताप, लठ्ठपणा यावर लिंबू प्रचंड फायदेशीर आहे. अनेक औषधीगुण लिंबामध्ये आहे. वजन कमी करण्यात अथवा नियंत्रित ठेवण्यात लिंबू फार महत्वाची भूमिका बजावते. तसेच त्वचा व केसांसाठी सुद्धा लिंबू ऊपयोगाचे आहे. बहुगुणी असणार्या लिंबाचे मात्र गरम पदार्थांमध्ये महत्व राहत नाही. गरम पदार्थांमुळे लिंबातील पोषक घटक नाहीसे होतात.
हे देखील वाचा Health tips: उभा राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम वाचून बसेल धक्का; जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत..
Astrology 2022: तब्बल ५९ वर्षांनी जुळुन आलाय हा योग; या राशींना होणार हे जबरदस्त फायदे..
Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..
Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.