Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..
Marriage tips: लग्नानंतर एका नव्या आयुष्याला सुरुवात होते. आपल्या रोजच्या जिवनमानातल्या बर्याचशा गोष्टी बदलुन जातात. नव्या जवाबदार्या येतात, नाते संबंद्ध वाढतात, या सर्व बाबींचा समतोल राखत वैवाहिक जिवनाचा आनंद आपल्याला घ्यावा लागत असतो. महिलांना मात्र पुरुषांपेक्षा जास्त बदलांना सामोरे जावे लागते. नवे लोक, नवी नाती असतात, त्यांनी या अगोदर कधीच बघितलेले नसते. त्यांच्याशी नव्याने संबंध येतो. महिलांवर सुद्धा काही नवीन जवाबदार्या येऊन पडतात. या सर्व गोष्टींना महिलांना सामोरे जावे लागते.
लग्नानंतर काहीच दिवसांत मात्र महिलांच्या चिंतेत भर होते. एका सर्वेक्षणातून या संदर्भातली माहिती समोर आली आहे. लग्नाच्या १ ते २ वर्षांनतर नवविवाहीत स्त्रियांच्या चिंता वाढतात. पुरुषांच्या बाबतीत सुद्धा असे होते. मात्र महिलांबाबत हे जास्त प्रमाणात घडते. महिलांच्या चिंता वाढण्यामागे विविध कारणे असु शकतात. पतीसोबत येणारे संबंध किंवा सासरच्या मंडळींबाबत असणार्या काही अडचनी अशा एक ना अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. मात्र याशिवाय महिला एका कारणास्तव जास्त चिंता करायला लागतात.
वजन वाढीचे टेन्शन
आपण बघतो की लग्नाच्या काही दिवसांनंतरच महिलेचे वजन वाढायला लागते. महिलेला या वजन वाढण्याची चिंता होत असते. वजन वाढण्याचा परिणाम थेट त्यांच्या सुंदरतेवर होत असतो. कुठल्याही महिलेला सुंदर दिसणं आवडते. त्यासाठी शक्य ती सर्व काळजी त्यांच्याकडून घेतली जाते. परंतू खाण्यापिण्याचे काही नियम ठरवून सुद्धा त्यांचे वजन नियंत्रित राहत नाही. त्यामुळे या वाढत्या वजनाला घेऊन महिला कायम चिंतेत असतात.
घरातल्या लोकांनुसार जेवन
लग्ना अगोदर मुली स्वतःच्या मर्जीनुसार जगत असतात लग्नापूर्वी मुलींचा डाइटवर देखील विशेष लक्ष असतं मात्र लग्न झाल्यानंतर मुलींना डायटचं पालन होईलच असं नाही. अनेकदा सासरच्या मंडळी सोबत लग्न झाल्यानंतर महिलांना जेवण करावं लागतं. अन्न वायाला जाऊ नये, म्हणून सासरची मंडळी अनेकांना जास्त प्रमाणात जेवण वाढतात. नाईलाजाने महिलांना देखील सासरच्या मंडळींनी वाढलेले जेवण खाल्ल्याशिवाय पर्याय नसतो. या गोष्टीचं देखील महिलांना लग्नानंतर टेन्शन येते.
हार्मोनल बदल
वाढत्या वयाबरोबर पुरुष असो वा महिला दोघांमध्येही काही हार्मोनल्स बदल होतात. बर्याचदा या हार्मोनल्स बदलांचा थेट आपल्या दैनंदिन जिवनावर सुद्धा परिणाम होतो. पुरुषांपेक्षा महिलांच्या शरीरामध्ये होणारे बदल दिसुन येतात. त्यामुळे मुलगी पौगांडावस्थेत आली की तिच्यात अमुलाग्र बदल होतांना आपण बघतो. लग्नानंतर सुद्धा हे बदल सुरुच असतात. शारिरीक संबंध आणि या बदलांचा विशेष असा संबंध नाही. परंतू हार्मोनल्स बदल स्त्रिमध्ये सुरुच असते. बर्याचदा या बदलांमुळे स्त्रियांच्या शरिराचे वजन वाढते. याचं देखील महिलांना टेन्शन येते.
शरीराकडे दुर्लक्ष
महिला आपल्या शरीराची विशेष काळजी घेतात. कारण महिलांना सुंदर दिसायला आवडत असते. त्यामुळे चेहर्यासोबतच पूर्ण शरीराची ठेवण व्यवस्थित राहावी यावर त्यांचा भर असतो. त्या अनुषंगाने व्यायाम करणे किंवा खाण्यापिण्याच्या काही नियम व अटी ठरवून डायट घेणे हा प्रकार केला जातो. लग्नाअगोदर या सर्व गोष्टी नियमित केल्या जातात. परंतू लग्नानंतर यावर परिणाम जाणवायला लागतो. काही नविन जवाबदार्यांमुळे शरीराकडे पुरेस लक्ष देणे होत नाही. बाहरे काम करत असल्यास, बाहेरचे काम आणि घरकाम यांचा व्याप वाढतो. परिणामी शरीराकडे दुर्लक्ष होते. याचे देखील टेन्शन महिलांना असते.
तणावाचे टेन्शन
मुलींच्या बाबतीत आपण बघतो की, अपेक्षेप्रमाणे वागणूक सासरच्या मंडळींकडून मिळत नाही. काहींना तर त्यांच्या पतीकडून सुद्धा त्रास सहन करावा लागतो. बाहरे काम करत असल्यास बाहेरच्या कामांचा ताण असतो, त्यात घरी आल्यावर घरची कामे सुद्धा करावी लागतात. यामुळे महिलांना ताण येतो. बर्याचदा काही महिला ताणतणावात असतात. त्यामुळे शरीर आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते. याचा परिणाम थेट शरीरावर दिसायला लागतो. याचं देखील टेन्शन महिलांना असते.
हे देखील वाचा ्
Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..
ITBP Recruitment: बारावी पास उमेदवारांसाठी या सरकारी विभागात मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
PMMVY: या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मिळतात पाच हजार रुपये; जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ..
Google pay loan: आता Google pay देणार एक लाखापर्यंतचे लोन; जाणुन घ्या कसा करायचा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.