Viral Video: किरकोळ कारणासाठी बैलाने तरुणाला तुडवलं; कारण जाणून तुम्हालाही येईल राग; पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडिओ..

Viral Video: बैल (bull) हा खुप शांत प्राणी आहे. हे तुम्हाला माहीत आहे. मात्र बैलाच्या मनात कधी काय येईल? हे काही सांगता येत नाही. मालकाने सांगेल ते काम करणारा बैल अचानक आपल्या मालकावर देखील अचानक धावून जातो. जर तुम्ही खेडे गावातून येत असाल, तर याविषयी तुम्हाला माहित असेल. बैल कधी कधी मालकावर धावून जात असले तरी, मालकाला जीव लावणारे बैल देखील तुम्ही अनेक पाहिले असतील. खासकरून असे व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल देखील होतात. (Video viral)

माणसांपेक्षा प्राण्यांना अधिक संवेदना असतात. हे आपल्याला मान्य करावेच लागेल. प्राण्यांना प्रेम दिले की प्राणी त्याची व्याजासकट परतफेड करतात. मात्र विनाकारण त्यांची खोड काढली, तर शांत असणारे प्राणी आपले रौद्ररूप धारण देखील करतात. याच संदर्भातलाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. रस्त्याच्या मध्यभागी एक बैल शांत उभा राहिला असताना अचानक एका तरुणाने बैलाची खोड काढली. आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

काय घडलं नेमकं

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ स्पेन मधील असल्याचचं बोललं जात आहे. या व्हिडिओत एक बैल रस्त्याच्या बाजूला शांत उभा असल्याचं दिसत आहे. इतक्यात एक तरुण हातात काठी घेऊन या बैलाच्या दिशेने येतो. आणि बैलाच्या शिंगाना एका हाताने पकडण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात या बैलाची तळपायाची आग मस्तकात जाते. आणि काही कळायच्या आत या तरुणाला आपल्या शिंगाने बैल धडक देतो. तरुण या धक्क्यात जमिनीवर कोसळतो.

या तरुणावर बैलाने हल्ला केलेला पाहून, जवळ उभा असणारे लोक मोठमोठ्याने ओरडू लागतात. मात्र बैल कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. शिंगाने जोरदार धडक दिल्यानंतरही बैलाचा राग शांत होताना दिसत नाही. बैल नंतर खाली पडलेल्या तरुणाला आपल्या पायाने तुडवताना देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. विनाकारण बैलाची खोड काढणं तरुणाला प्रचंड महागात पडलं. तरुण जमिनीवर कोसळल्यानंतर, त्याची हालचाल देखील बंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या मंडळींनी धावत येऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. अनेक लोक धावत आल्यानंतर बैल देखील त्या ठिकाणाहून निघून गेला.

विनाकारण खोड काढल्याने बैलाने तरुणाला धडक दिली. हे करून देखील बैलाचा राग शांत झाला नाही. आणि म्हणून त्याने नंतर तरुणाच्या पोटावर आणि तोंडावर देखील पायाने तुडवल्याचे पाहायला मिळत आहे. काळजाचे पाणी करणाऱ्या या प्रसंगावर नेटकऱ्यानी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तरुणाला दोषी ठरवलं आहे. तर काहींनी बैल रस्त्यावर कसा काय फिरू शकतो? याला प्रशासन जबाबदार असल्याचे म्हंटले आहे. शांत उभा राहिलेल्या बैलाची विनाकारण खोड काढण्याची आवश्यकता नव्हती. जैसी करणी वैसी भरणी. असं देखील काही युजर्स बोलताना पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा Virat Kohli: वाईट काळात फक्त धोनीने साथ दिली, अडचणीत असताना अनेकांनी मजा घेतली; कोहलीच्या विधानाने खळबळ..

Viral Video: रस्त्यावर बिबट्या गाईची शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल; व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा उडेल थरकाप..

Driving licence: आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO ऑफिसला जायची गरज नाही; असा करा ऑनलाईन अर्ज 7 दिवसांत मिळेल घरपोच..

MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.